OPPO F27 5G | भारतात पहिल्यांदाच लॉन्च झाला OPPO F27 5G फोन, 32MP सेल्फी कॅमेरासह मिळणार ही वैशिष्ट्ये

OPPO F27 5G
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

OPPO F27 5G | पूर्वी अन्न वस्त्र निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा होत्या. परंतु आता यामध्ये मोबाईल हा देखील समाविष्ट झालेला आहे. कारण आज काल प्रत्येकाकडे मोबाईल आहे. मोबाईल अगदी एक तास जरी स्वतःपासून लांब राहीला, तरी लोकांना करमतच नाही. त्यामुळे अनेक मोबाईल कंपन्या देखील बाजारात विविध मोबाईल फोन लॉन्च करत असतात. ज्याचे वेगवेगळी वैशिष्ट्ये देखील असतात. अशातच आता एक OPPO चा नवीन स्मार्टफोन बाजारात लॉन्च झालेला आहे. पहिल्यांदाच हा फोन भारतात लाँच झालेला आहे. OPPO F27 5G हा स्मार्टफोन भारतात लॉन्च झालेला आहे. हे या कंपनीचे फ्लॅगशिप मॉडेल आहे.

याआधी कंपनीने भारतात OPPO F27 Pro+ हे फीचर लॉन्च केले होते. मोबाईलच्या या फीचरबद्दल सांगायचे झाले, तर हा फोन 6.67 इंचाचा Aamold डिस्प्ले सह होता. या फोनला 50 MP कॅमेरा आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32 MP फ्रंट कॅमेरा आहे. आता या फोनची किंमत नक्की काय असणार आहे? तसेच तो कुठे उपलब्ध असणार आहे?तुम्हाला कशाप्रकारे खरेदी करता येईल? आणि या फोनची विविध वैशिष्ट्ये आज आपण जाणून घेणार आहोत.

OPPO F27 भारतात किंमत | OPPO F27 5G

कंपनीने OPPO F27 5G हा फोन दोन प्रकारांमध्ये लॉन्च केलेला आहे. या फोनच्या 8 जीबी रॅम आणि 28 जीबी स्टोरेज आहे. या फोनची किंमत 22999 रुपये आहे. त्याचप्रमाणे 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज असलेल्या फोनची किंमत 2499 एवढी आहे. हा फोन तुम्हाला भारतात ऑनलाईन पद्धतीने खरेदी करता येईल. कोणत्याही शॉपमध्ये जाऊन तुम्हाला याची खरेदी करता येत नाही. सध्या या फोनची विक्री फ्लिपकार्ट, ॲमेझॉन आणि ओपो इंडियावर चालू झालेली आहे. तसेच या फोनवर तुम्हाला 2500 रुपयांची सूट देखील मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जर एखाद्या चांगल्या फोनच्या शोधात असाल, तर हा फोन तुमच्यासाठी अत्यंत उत्कृष्ट आहे.

OPPO F27 फोनची वैशिष्ट्ये

OPPO F27 या फोनच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे झाले तर या फोनमध्ये 6.67 इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले आहे. तसेच या फोन मीडियाटेक डेन्सिटी 6300 प्रोसेसरने सुसज्ज आहे. यामध्ये 8 जीबी रॅम आणि 8 जीबी व्हर्च्युअल रॅमचा सपोर्ट आहे तसेच या फोनचे स्टोरेज 256 जीबी एवढा आहे.

फोनची कॅमेरा क्वालिटी

फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 50MP OV50D कॅमेरा आहे. यासोबत 2MP दुय्यम कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP सेल्फी कॅमेरा आहे. फोनची बॅटरी 5000mAh आहे, ज्यामध्ये 45W SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे. फोनची परिमाणे 163.05 × 75.75 × 7.69 मिमी आणि 187 ग्रॅम आहेत.