हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ई-कॉमर्स वेबसाइट असलेल्या Amazon वर सध्या Oppo Fantastic Sale सुरु आहे. या सेलमधून अगदी कमी किंमतीत Oppo चे स्मार्टफोन खरेदी करता येतील. त्याचबरोबर, या सेलमध्ये Oppo A सीरीजचे फोन देखील मोठ्या सवलतीमध्ये उपलब्ध आहेत. Oppo च्या A सीरीज मध्ये Oppo A54, Oppo A31, Oppo A55, आणि Oppo A74 5G सारखे फोन सामील आहेत. हे फोन तुम्ही सेलमधून स्वस्तात घरी आणता येतील.
Oppo A74 5G या फोनमध्ये 6.49 इंचाचा डिस्प्ले आहे. तसेच या सेलमध्ये त्याची किंमत 17898 रुपये आहे. या फोनमध्ये 5000mAh बॅटरी तसेच, 48MP क्वाड रिअर कॅमेरा सेटअपही उपलब्ध आहे. या 5G फोनमध्ये कंपनी कडून Qualcomm Snapdragon 480 5G प्रोसेसर दिला जात आहे. हा फोन 6GB रॅम आणि 128GB वेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.
तसेच या सेलमध्ये Oppo A54 स्मार्टफोन 10,990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या फोनमध्ये 6.51 इंचाचा डिस्प्ले आहे. या फोनमध्ये 5000mAh बॅटरी तसेच फोटोग्राफीसाठी 13MP रिअर कॅमेरा सेटअपही उपलब्ध आहे. या फोनमध्ये कंपनी कडून MediaTek Helio P35 प्रोसेसर दिला जात आहे.
या Oppo Fantastic Sale मध्ये Oppo A55 स्मार्टफोन 14,499 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या फोनमध्ये 6.51 इंचाचा डिस्प्ले आहे. या फोनमध्ये कंपनी कडून MediaTek Helio G35 प्रोसेसर दिला जात आहे. तसेच यामध्ये कंपनी कडून 5000mAh ची बॅटरी तसेच, 6GB पर्यंत रॅम मिळते.
या Oppo Fantastic Sale मध्ये Oppo A31 स्मार्टफोनची किंमत 11,490 रुपये आहे. Oppo च्या या फोनमध्ये 6.5-इंचाचा डिस्प्ले आहे. तसेच कंपनी यामध्ये 12MP ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देत आहे. त्याच बरोबर या फोनमध्ये 4230mAh बॅटरी देण्यात आली आहे. या फोनमध्ये कंपनी कडून MediaTek 6765 octa core प्रोसेसरदिला जात आहे. तसेच या फोनमध्ये 6GB पर्यंत RAM आणि 128GB पर्यंत स्टोरेज उपलब्ध आहे.
याशिवाय Oppo Fantastic Sale सेलमधून Oppo फोन खरेदी करणाऱ्यांना बँड ऑफ बडोदा क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करण्यावर 1400 रुपयांपर्यंतची सूटही मिळू शकेल. याशिवाय कंपनीकडून हा फोन सुलभ हप्त्यांवरही उपलब्ध करून देत आहे. याशिवाय यासाठी एक्सचेंज ऑफरही उपलब्ध आहेत.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या :
हे पण वाचा :
HDFC Bank ने ग्राहकांना दिला धक्का !!! आता EMI साठी मोजावे लागणार जास्त पैसे
Redmi Clearance Sale : फक्त 4,499 रुपयांमध्ये घरी आणा Redmi चा ‘हा’ पॉवरफुल फोन
Multibagger Stock : सॉक्स बनवणाऱ्या ‘या’ कंपनीने गुंतवणूकदारांना एका वर्षात दिला 3 पट नफा !!!
Bandhan Bank च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!!! FD वर मिळणार 8% पर्यंत व्याज
Aadhar Card मधील माहिती अपडेट करण्यासाठी किती खर्च येतो हे जाणून घ्या