Oppo Reno 8T 5G : 108MP कॅमेरा असलेल्या ‘या’ नवीन स्मार्टफोनची मार्केटमध्ये जोरदार एंट्री, पहा किंमती अन् फीचर्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही महिन्यांपासून Oppo Reno 8T 5G या स्मार्टफोनबाबत सातत्याने नवनवीन माहिती समोर येत आहे. हो नाही करत शेवटी एकदाचे 2 फेब्रुवारी रोजी, Oppo कडून या नवीन Reno स्मार्टफोनचे अनावरण करण्यात आले. हे जाणून घ्या कि, व्हिएतनाममध्ये Oppo Reno 8T 5G हा स्मार्टफोन Reno 8T 4G सोबत लॉन्च करण्यात आला आहे. या Oppo Reno 8T 5G स्मार्टफोनमध्ये प्रीमियम डिझाइन आणि कर्व्ह डिस्प्ले दिला गेला आहे. चला तर मग या नवीन स्मार्टफोनच्या किंमती आणि त्याच्या फीचर्सबाबतची माहिती जाणून घेउयात …

Oppo Reno 8 Pro 5G colour options, storage variants tipped

Oppo Reno 8T 5G चे फीचर्स

Oppo चा हा 5G स्मार्टफोन Android बेस्ड ColorOS 13.0 वर काम करेल. यासोबतच 8 GB रॅम आणि 256 GB इनबिल्ट स्टोरेजचा पर्याय देखील उपलब्ध आहे. जर आपल्याला आणखी स्टोरेज हवा असेल तर तो मायक्रोएसडी कार्डद्वारे वाढवता येईल. Oppo Reno 8T 5G मध्ये 6.7-इंच फुलएचडी + (1,080×2,412 पिक्सेल) कर्व्ह OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. याच्या स्क्रीनचा रिफ्रेश रेट 120 Hz पर्यंत आहे. 93 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशो असलेल्या या फोनचा टच सॅम्पलिंग रेट 360 Hz आहे. यामध्ये octa-core 6nm Snapdragon 695 प्रोसेसर दिला गेला आहे.

या Oppo Reno 8T 5G मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच या फोनमध्ये अपर्चर F/1.7 सहीत 108 मेगापिक्सेल प्रायमरी, अपर्चर F/2.4 सहीत 2 मेगापिक्सेल आणि अपर्चर F/3.3 सहीत 2 मेगापिक्सेल मॅक्रो सेन्सर दिला गेला आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ऍपर्चर F/2.4 सहीत 32-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देखील उपलब्ध आहे.

OPPO Reno 8T 5G launch date in India confirmed: expected price,  specifications

कनेक्टिव्हिटीसाठी, Oppo Reno 8T 5G मध्ये USB Type-C पोर्ट, 5G, GPS/A-GPS, USB OTG, Wi-Fi 5, Bluetooth 5.1 सारखे फीचर्स उपलब्ध आहेत. स्मार्टफोनमध्ये एक्सीलरोमीटर, ई-कंपास, जिओमॅग्नेटिक सेन्सर, लाईट सेन्सर, ग्रॅव्हिटी सेन्सर, पेडोमीटर आणि प्रॉक्सिमिटी सेन्सर देण्यात आले आहेत. तसेच यामध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर आणि फेस रेकग्निशन फीचर देखील उपलब्ध आहेत.

या फोनचे डायमेंशन 162.3×74.3×7.7 मिलीमीटर आणि वजन 171 ग्रॅम आहे. या स्मार्टफोनमध्ये, 4800mAh बॅटरी देण्यात आली आहे जी 67W SuperVOOC चार्जिंगला सपोर्ट करते. तसेच हा फोन फक्त 44 मिनिटांत शून्य ते 100 टक्के चार्ज होईल असे कंपनीचे म्हणणे आहे. याशिवाय फक्त 5 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये 5.5 तासांपर्यंत कॉलिंग टाइम देखील उपलब्ध होईल.

Oppo Reno 8T 4G: A Closer Look through Leaked Renders - Gizchina.com

Oppo Reno 8T 4G चे फीचर्स

Oppo Reno 8T 4G या फोनमध्ये 6.43 इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे जो फुलएचडी+ रिझोल्यूशन ऑफर करतो. तसेच स्क्रीनचा रिफ्रेश रेट 90Hz पर्यंत आहे. यामध्ये डिस्प्लेच्या प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 देण्यात आला आहे. MediaTek Helio G99 प्रोसेसर LTE व्हर्जनमध्ये देण्यात आला आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये 8 GB रॅम आणि 256 GB इनबिल्ट स्टोरेज देण्यात आली आहे.

हा स्मार्टफोन Android 13 बेस्ड ColorOS 13 वर काम करेल. या फोनमध्ये 5000mAh बॅटरी दिली गेली आहे जी SuperVOOC चार्जिंगला सपोर्ट करेल.
या स्मार्टफोनमध्ये 100-मेगापिक्सलचा प्रायमरी रिअर कॅमेरा आहे. याशिवाय 2 मेगापिक्सेल डेप्थ आणि 2 मेगापिक्सेल मायक्रोस्कोप सेन्सर देखील उपलब्ध आहेत. यासोबतच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32-मेगापिक्सलचा फ्रंट सेंसर देखील आहे.

OPPO Reno 8T price in India, launch and sale dates tipped

दोन्ही स्मार्टफोनच्या किंमती

Oppo Reno 8T 5G हा स्मार्टफोन व्हिएतनाममध्ये लॉन्च करण्यात आला आहे. ज्याच्या 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत VND 9,990,000 (सुमारे 35,000 रुपये) आहे. तसेच व्हिएतनाममध्ये हा फोन ब्लॅक स्टारलाइट आणि डॉन गोल्ड रंगांमध्ये उपलब्ध आहे. मात्र याच्या , 256 GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत अद्याप उघड करण्यात आलेली नाही.

Oppo Reno 8T 4G च्या 8 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत VND 8,490,000 (सुमारे 29,800 रुपये) आहे. हा फोन ब्लॅक स्टारलाइट आणि सनसेट ऑरेंज कलरमध्ये उपलब्ध आहे. व्हिएतनाममधील विविध रिटेल प्लॅटफॉर्मवरून हा स्मार्टफोन खरेदी करता येईल.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.oppo.com/in/smartphones/series-reno/reno8-5g/

हे पण वाचा :
Budget 2023 : विदेशी खेळणी महागणार, खेळण्यांवरील आयात शुल्कात झाली 70% वाढ
IRCTC North East Tour Package : ईशान्येला फिरायला जाण्यासाठी रेल्वे देत आहे सुवर्ण संधी, जाणून घ्या सर्व तपशील
LIC Dhan Varsha Plan मध्ये गुंतवणूक करून मिळवा 10 पट नफा, अशा प्रकारे तपासा यासाठीची पात्रता
आता Driving Licence शिवाय चालवता येणार गाडी !!! सरकारने सुरु केली ‘ही’ सुविधा
IRCTC North East Tour Package : ईशान्येला फिरायला जाण्यासाठी रेल्वे देत आहे सुवर्ण संधी, जाणून घ्या सर्व तपशील