Thursday, March 30, 2023

पेटीएमद्वारे मिळणार मोठी कमाई करण्याची संधी, कंपनी आणणार आतापर्यंतचा भारतातील सर्वात मोठा IPO

- Advertisement -

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी ई-वॉलेट कंपनी असलेली पेटीएम आपली बॅग इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) ने भरण्याचा विचार करीत आहे. IPO च्या माध्यमातून ही कंपनी गुंतवणूकदारांना मोठी कमाई करण्याची संधी देणार आहे. प्रायमरी मार्केटमधून 3 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 22 हजार कोटी रुपये जमा करण्याची कंपनीची योजना आहे. यासाठी सप्टेंबर 2021 पूर्वी कंपनी आपला IPO बाजारात आणणार आहे.

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, देशातील सर्वात मोठी पेमेंट सर्व्हिसेस प्रोव्हायडर पेटीएमची मूळ कंपनी कंपनी वन97 कम्युनिकेशन्स (One97 Communications)च्या संचालक मंडळाची IPO मंजूर करण्यासाठी येत्या 28 मे रोजी म्हणजेच उद्या बैठक होणार आहे. या IPO द्वारे पेटीएमने त्याचे मूल्यांकन 25 ते 30 अब्ज डॉलर्स म्हणजेच 1.80 लाख कोटी रुपये ते 2.20 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

- Advertisement -

बार्कशायर हॅथवे, सॉफ्टबँक आणि अँट ग्रुप हे पेटीएमचे टॉप गुंतवणूकदार आहेत
पेटीएमच्या अव्वल गुंतवणूकदारांमध्ये वॉरेन बफे यांची बार्कशायर हॅथवे, जपानची इन्व्हेस्टमेंट कंपनी सॉफ्टबँक ग्रुप आणि चीनी कंपनी अलिबाबा ग्रुपचा अँट ग्रुप आहे. या IPO मध्ये नव्या शेअर्ससह, कंपनी प्रमोटर्समार्फत शेअर्स जारी करेल आणि विद्यमान गुंतवणूकदारांना विक्रीसाठी ऑफर देण्यात येतील, जेणेकरून काही कंपन्यांना एक्झीट मिळू शकेल.

लीड मॅनेजर होण्याच्या शर्यतीत मॉर्गन स्टेनली आघाडीवर
सूत्रांच्या माहितीनुसार, पेटीएम IPO साठी ज्या बॅंकर्सची निवड केली जाईल त्यांच्यामध्ये मॉर्गन स्टेनली, सिटी ग्रुप, जेपी मॉर्गन या गुंतवणूकदारांचा समावेश आहे. असं म्हटलं जातंय की,” मॉर्गन स्टेनली लीड मॅनेजर बनण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहे. या IPO ची प्रक्रिया जून किंवा जुलैमध्ये सुरू होऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले. तथापि, पेटीएम किंवा या गुंतवणूकदार या दोघांनीही याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

मार्केट रेग्युलेटर सेबीच्या नियमांनुसार IPO आणणारी कंपनी पहिल्या 2 वर्षात जनतेला 10 टक्के वाटा देईल तर पुढील 5 वर्षात तो 25 टक्क्यांपर्यंत वाढवावा लागेल. म्हणजेच, प्रमोटर्सबरोबर जास्तीत जास्त 75 टक्के हिस्सा ठेवू शकतात.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group