CIRCOT मध्ये काम करण्याची संधी; दरमहा मिळेल 30 हजार रूपये पगार; येथे करा अर्ज

CIRCOT
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था म्हणजेच CIRCOT अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ईमेलद्वारे अर्ज मागवले जात आहे. हे अर्ज इच्छुक उमेदवारांनी 22 मे 2024 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मेल करावेत. पुढे पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवले जाईल. त्यानंतर निवडक उमेदवारांना रिक्त पदांसाठी नोकरीची संधी दिली जाईल.

रिक्त जागा आणि पदसंख्या – ICAR अंतर्गत “यंग प्रोफेशनल” पदाच्या 2 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे डिप्लोमा / टेक्स्टाईल टेक्नॉलॉजी / टेक्स्टाईल केमिस्ट्रीची पदवी असावी.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय 21 ते 45 दरम्यान असावे.

पगार किती – पदासाठी निवडलेल्या उमेदवाराला 30 हजार रुपये पगार मिळेल.

नोकरीचे ठिकाण – नोकरीचे ठिकाण मुंबई असेल.

मुलाखतीची तारीख – 27 मे 2024 रोजी मुलाखत घेतली जाईल.

मुलाखतीचा पत्ता – “ICAR-CIRCOT, अडेनवाला रोड, पाच गार्डन्सजवळ, माटुंगा, मुंबई-४०० ०१” याठिकाणी मुलाखत घेतली जाईल.

अधिकृत संकेतस्थळ – https://circot.icar.gov.in/

अर्ज करण्याची प्रक्रिया – इच्छुक उमेदवारांनी [email protected] या ईमेलवर अर्ज आणि Resume पाठवावा. हा अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 मे 2024 आहे.