राज्यातील हे सरकार झोपलेलं; सरकारला जगू देणार नाही”; फडणवीसांचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विदर्भ तसेच मराठवाडा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नद्याना आलेल्या पुरात मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. या नुकसानीवरून विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. “अतिवृष्टी झाल्याने मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे सक्त आले आहे. आम्ही जोपर्यंत तुम्हाला मदत मिळत नाही तोपर्यंत या सरकारला जगू देणार नाही. हे सरकार झोपलेले आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली.

मराठवाड्यामध्ये लाखो हेक्टर शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नांदेडमधील चिवली आणि फुलवाल गावांना भेट दिली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “सत्य परिस्थिती सरकारला समजावी आणि जेथे कमतरता आहे, तेथे त्या गोष्टींची पूर्तता व्हावी, यासाठी हा दौरा काढण्यात आला आहे.

राज्य सरकारवर टीका करताना फडणवीस म्हणाले की, “आम्ही झोपलेल्या या सरकारला जागे करणार आहे. जोपर्यंत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्यांची भरपाई मिळून देत नाही तोपर्यंत या सरकारला एक दिवशी जगू देणार नाही. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत हि मिळवूनच देणार आहे.

Leave a Comment