महाविकास आघाडीबाबत मुख्यमंत्र्यांच्या मनात शंका, त्यामुळे त्यांनी… ; दरेकरांचा टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात असलेल्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी जिल्हा प्रमुखांना शिव संपर्क अभियानाविषयी माहिती दिली. दरम्यान त्यांनी जनतेची कामे करा, आघाडी किंवा युतीची चिंता करू नका, असेही सांगितले. यावरून भाजपने निशाणा साधला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी टीका करताना म्हंटले आहे कि, “मुख्यमंत्री ठाकरे यांना महाविकास आघाडीबाबत मनात शंका आली असावी. त्यामुळेच त्यांनी पक्षातील जिल्हाप्रमुखाना मोहीम राबविन्यायाचा संदेश दिला असावा.”

आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन प्रत्येक पक्षातील श्रेष्टींकडून पक्षवाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये राष्ट्रवादी, सेना, काँग्रेस या पक्षांचाही समावेश आहे. पक्ष बळकटीकरणाच्या दृष्टीने आज मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज जिल्हा प्रमुखांची एकत्रित बैठक घेतली होत. यावरून भाजपकडून आता महाविकास आघाडी सरकारमधील एकत्रित लढण्याविषयी शंका व्यक्त केली जात आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल घेतलेल्या ऑनलाईन पद्धतीच्या शिवसेना जिल्हा प्रमुखांच्या बैठकीवरून दरेकर यांनी म्हंटल आहे कि, आमदारांना जिल्ह्यात विकास करण्यासाठी विकास कामासाठी निधी द्यावा लागतो. मात्र, दुरदैवाने अर्थमंत्री राष्ट्रवादी काँग्रे पक्षाचे आहेत. त्यामुळे शिवसेनेचे लोकप्रतिनिधी व शिवसैनिक नाराज आहेत. युतीचं काय होईल, उद्या अचानक निवडणुका लागल्याच तर त्या निवडणुकांना कशा प्रकारे आणि कसे सामोरे जायचे? हे ओळखून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा संदेश दिला असावा, अशी शंकाही दरेकर यांनी यावेळी व्यक्त केली.

Leave a Comment