Sunday, May 28, 2023

हे सरकार जुलमी आणि वसुली सरकार : देवेंद्र फडणवीस

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – कालपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. पावसाळी अधिवेशनाचा कालचा दिवस खूप वादळी ठरला. कालच्या अधिवेशनात भाजपच्या १२ आमदारांना निलंबित करण्यात आले होते. विधानसभा अध्यक्षांना धक्काबुक्की केल्याच्या कारणावरून त्यांच्यवर हि कारवाई करण्यात आली होती.

यामुळे भाजप प्रचंड आक्रमक झाली होती. त्यांचा हा आक्रमकपण आज दुसऱ्या दिवशी पाहायला मिळाला. भाजपने थेट विधानसभेबाहेर प्रतिविधानसभा भरवून या सरकारचा निषेध केला. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या निषेधाचा प्रस्ताव मांडला आणि त्यावर चर्चा सुरू करण्यात आली. विधानसभेचा पहिला दिवस आमदारांच्या निलंबनावरून गाजला होता.

आजचा दिवस विरोधक सभागृहात उपस्थित राहून गोंधळ घालतील असे संकेत होते मात्र भाजपच्या आमदारांनी विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकत थेट विधानसभेच्या पायरीवरच अभिरुप विधानसभा भरवली. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर जोरदार टीकासुद्धा केली.