Oral Cancer Symptoms | आजकाल कॅन्सर हा आजार वेगाने वाढताना दिसत आहे. हा एक गंभीर आजार आहे. त्याचे जर तुम्ही वेळीच निदान केले नाही, तर व्यक्तीचे जगणे देखील कठीण होते. शरीरातील अनेक भागांना कॅन्सर होतो. परंतु आजकाल तोंडाच्या कॅन्सरचे प्रमाण देखील वाढत चालले आहे. त्याच्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. तोंडाच्या कॅन्सरची नक्की काय लक्षणे असतात त्याकडे दुर्लक्ष केल्यास काय परिणाम होऊ शकतात. यापासून याची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात.
तोंडात रक्तस्त्राव
तोंडातून सतत रक्त स्त्राव होणे, हे तोंडाच्या कर्करोगाच्या (Oral Cancer Symptoms) लक्षणांपैकी एक आहे. ही लक्षणे दिसू लागतं तुम्ही त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका आणि डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधा.
तोंडात सुन्नपणा
तुमच्या तोंडाला सतत बधीरपणा येत असेल किंवा मनाच्या कोणत्याही भागावर मुंग्या येत असेल, तर तुम्ही डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे खूप गरजेचे आहे.
तोंडाचे फोड
तुमच्या तोंडात फोड आलेले असेल किंवा इतर कोणत्याही कारणामुळे जखम झाली असेल. आणि ती दोन आठवड्यात बरी होत नसेल तर तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्या
दात मोकळे होतात | Oral Cancer Symptoms
रोगाचे हे एक प्रमुख लक्षण आहे. ते म्हणजे सुरुवातीच्या काळात तुमचे दात मोकळे होतात. खाताना पिताना तुम्हाला तीव्र वेदना होतात आणि कधी कधी रक्तस्त्राव देखील होतो.
तोंडात ढेकूळ
कर्करोगात तोंडात ढेकूळ निर्माण होते. हा त्रास वाढला की खाणे पिणे घेणे इत्यादी गोष्टी देखील कठीण होऊन जातात अशा परिस्थितीत तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
तोंडाचा कर्करोग टाळण्यासाठीचे उपाय
- तंबाखू धूम्रपान यापासून लांब रहा.
- दारूपासून लांब राहा.
- जास्त वेळेस कडक सूर्यप्रकाशाचा आणि टाळा.
- दातांची नियमित तपासी तपासणी करा.
- आपल्या आहारात हिरव्या भाज्या, फळे, सॅलड तसेच इतर धान्यांचा समावेश करा.