सातारा | निसर्गाशी संवाद साधणारी, श्रमपरिहारासाठी गायली जाणारी लोकगीते जशी आहेत तशी, पोवाड्यासारखे शैार्यगीत, लावणीसारखे शृंगारगीत यासारखी लोकगीतेही आहेत. तसेच भारुडासारखे आध्यात्मिक प्रबोधनपर गीतही आहे. भोंडला- हादगा, मंगळागौर, फुगडी, झिम्मा यांसारखी गाणी त्यांच्या लय-तालबध्दतेमुळे आताही स्त्रिया गातात. या गीतांमधून लोकशाही, मताधिकार याबद्दल जागृती करण्यासाठी लोकगीतातून लोकशाहीचा जागर या स्पर्धेचे आयोजन दि. 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी व उप जिल्हाधिकारी तथा उप जिल्हा निवडणूक अधिकारी निता सावंत-शिंदे यांनी केले आहे.
समूह आणि एकल गटामध्ये ही स्पर्धा घेतली जाणार असून आकर्षक रकमांची बक्षिसे ठेवण्यात आलेली आहेत. समूह गटासाठी प्रथम क्रमांक 21 हजार रुपये, व्दितीय क्रमांक 11 हजार रुपये, तृतीय क्रमांक 5 हजार रुपये आणि उत्तेजनार्थ 1 हजार रुपयांची एकूण 10 बक्षिसे आहेत. तर एकल गटासाठी प्रथम क्रमांक 7 हजार रुपये, व्दितीय क्रमांक 5 हजार रुपये, तृतीय क्रमांक 3 हजार रुपये आणि उत्तेजनार्थ 500 रुपयांची एकूण 10 बक्षिसे आहेत.
स्पर्धेची नियमावली : सदर स्पर्धा सर्वासाठी खुली आहे. एकल(Solo) आणि समूह (Group) दोन्ही प्रकारची लोकगीते पाठवता येतील. स्पर्धेचा अर्ज पुढीलप्रमाणे भरावा. समूह गीते पाठवताना अर्ज एकाच स्पर्धकाच्या नांवे भरावा. लोकशाही, निवडणूक, मताधिकार, आधार जोडणी या विषयांशी संबंधीत लोकगीत गावून त्याची ध्वनीचित्रफीत (व्हिडीओ) पाठवावी. गीतासोबत नाच असला तरी चालेल. एका स्पर्धकाने किंवा समूहाने एकच गीत पाठवावे. आपल्या गीताची ध्वनिचित्रफीत पाठवताना ती कमीत कमी दोन मिनिटांची आणि जास्तीत जास्त पाच मिनिटांची पाठवावी. ध्वनिचित्रफीतीची साईज जास्तीत जास्त 500 MB असावी आणि ती mp4 फॉरमॅटमध्ये असावी ध्वनिचित्रफीत गुगल अर्जावर जोडताना त्यावर व्यक्तीचे किंवा मंडळाचे नांव, लोगो येणार नाही याची काळजी घ्यावी. अन्यथा सदर अर्ज स्पर्धेतून बाद केला जाईल. लोकशाही, निवडणूक , मताधिकार आधार जोडणी या विषयावर लोकगीत पाठवणा-या स्पर्धकाचाच अर्ज ग्राह्य धरला जाईल.
आपली ध्वनिचित्रफीत https://forms.gle/RoUEKUEb6bT2x4g9 या गुगल अर्जावरील माहिती भरुन त्यावर पाठवावी. ज्या स्पर्धकांना ध्वनिचित्रफीत पाठवण्यास अडचण येईल त्यांनी 8669058325 (प्रणव सलगरकर), 9987975553 (तुषार पवार) या व्हॉटसॲप क्रमांकावर संदेश पाठवून कळवावे. दिनांक 26 सप्टेंबर 2022 ते 31 ऑक्टोंबर 2022 या काळात आलेले साहित्यच स्पर्धेसाठी ग्राहय धरले जाईल. लोकगीत बोलीभाषेतले असेल तर गुगल अर्जावर त्याचा मराठीत अनुवाद करुन पाठवावा. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी 8669058325 (प्रणव सलगरकर), 9987975553 (तुषार पवार) यांच्याशी संपर्क साधावा. स्पर्धेची अधिक माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर https://ceo.maharashtra.gov.in/ उपलब्ध आहे.