उद्योजक वसंतराव चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

businessman Vasantrao Chavan
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कराड तालुक्यातील सवादे गावचे सुपुत्र, उद्योजक वसंतराव चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीर, मोफत शस्त्रक्रिया सप्ताह आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन इंद्रावती हॉस्पिटल, ऐरोलीच्या व्यवस्थापनाच्यावतीने शंकर चव्हाण यांनी केले आहे.

वसंतराव चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त एक आरोग्यदायी उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याअंतर्गत ऐरोली येथील इंद्रावती हॉस्पिटलच्या वतीने मूत्रपिंडाचे गंभीर आजार, अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी आणि किडनी स्टोन शस्त्रक्रिया मोफत केल्या जातील. यासाठी नोंदणी 5 एप्रिल ते 8 एप्रिल इंद्रावती हॉस्पिटल, ऐरोली येथे 022-61617702 आणि 8108122888 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उद्योजक चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त नुकतेच इंद्रावती हॉस्पिटल, ऐरोली, नवी मुंबई आणि राहुल वेलफेअरच्या वतीने राहुल डिस्टीब्युटर, मलकापूर, कराड येथे रक्तदान शिबीरही आयोजित करण्यात आले होते. या शिबिरास लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

शिबिरात नोंदणी केलेल्या रुग्णांसह इतर रुग्णांची 9 एप्रिलला सवादे येथील यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरामध्ये तपासणी केली जाणार आहे. आवश्यक असल्यास पुढील उपचार इंद्रावती हॉस्पिटल येथे मोफत करण्यात येणार असून याचाही जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन व्यवस्थापनाने केले आहे.

वसंतराव चव्हाण (अप्पा) यांचे काम आदर्शवत : शंकर चव्हाण

“वसंतराव चव्हाण (अप्पा) यांचे काम आदर्शवत आहे. त्यांचीच प्रेरणा घेऊन आम्ही काम करत आहोत. अनेक तरुणांना उभं करण्यासाठी त्यांनी हातभार लावला. सवादे सारख्या ग्रामीण भागात सोयीसुविधा व्हाव्या आणि सामाजिक बांधिलकी जपावी यासाठी पुढाकार घेतला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक भावनेतून हे उपक्रम राबविण्यात आले आहेत. त्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन इंद्रावती हॉस्पिटल & रिसर्च सेंटरचे संस्थापक संचालक शंकर चव्हाण यांनी केले आहे.