भीमा-कोरेगावच्या पार्श्वभूमीवर कळंबी येथे 30 डिसेंबर रोजी वीर शिदनाक परिषदेचे आयोजन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । पुणे जिल्ह्यातील कोरेगाव-भीमा भीमा येथे झालेल्या २८ हजार सैनिक विरुद्ध ५०० महार सैनिकांच्या झालेल्या लढाई मध्ये पेशव्यांचा पराभव झाला. या ऐतिहासिक लढाईला १ जानेवारी रोजी २०४ वर्षे पूर्ण होत आहेत. या लढाईत अग्रभागी असणारे सेनापती वीर शिदनाक यांच्या सांगली जिल्ह्यातील कळंबी या त्यांच्या मूळ जन्मगावी ३० डिसेंबर रोजी वीर शिदनाक शौर्य परिषदेसह विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती वीर शिदनाक परिषदेचे अध्यक्ष चंदन चव्हाण यांनी दिली.

१ जानेवारी १८१८ साली झालेल्या कोरेगाव-भीमाच्या घटनेला २०४ वर्षे पूर्ण होत आहेत. या दिवसाचे औचित्य साधून वीर सेनापती यांच्या पराक्रमाने खर्ड्याची लढाई, पानिपतची लढाई आणि भिमाकोरेगावची लढाई करून इतिहास घडवला. या ऐतिहासिक लढाया लढणारे सेनापती वीर शिदनाक होते. २८ हजार पेशव्यांच्या सैनिकांविरुद्ध हि लढाई लढून त्यांनी शौर्य गाजवले. या शौर्य गाजवलेल्या ऐतिहासिक ठिकाणी त्यांच्या स्मरणार्थ विजयस्तंभ उभा केला आहे. या विजयस्तंभाला राज्यासह संपूर्ण देशभरातून हजारो अनुयायी तेथे अभिवादन करण्यासाठी येत असतात. या निमित्ताने वीर शिदनाक यांच्या मूळ गावी मिरज तालुक्यातील कळंबी येथे शिदनाक यांना मानवंदना तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच ३० डिसेंबर रोजी वीर शिदनाक शौर्य परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

या परिषदेच्या अध्यक्ष पदी चंदन चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. या परिषदेच्या माध्यमातून समाजउपयोगी कामे केली जाणार आहेत. या परिषदेचं व्याख्यान, शाहिरी पोवाडे यांसह अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. तसेच वीर शिदनाक यांचे वंशज यांची परिस्थिती सध्या हलाखीची असल्याने त्यांना शासनाकडून सर्वोतोपरी मदत करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती चंदन चव्हाण यांनी दिली. यावेळी वीर शिदनाक यांचे वंशज प्रा. प्रदीप इनामदार, प्रमोद इनामदार, मिलिंद इनामदार, ज्योती अदाटे, नितीन गोंधळे यांच्यासह विविध सामाजिक व राजकीय संघटनेचे पदाधिकारी उपास्थीत होते.

Leave a Comment