Oshiwara Fire : मुंबईत ओशिवरा फर्निचर मार्केटला भीषण आग, सिलिंडर स्फोटांनी हादरला परिसर

0
1
Oshiwara Fire
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Oshiwara Fire : मुंबईत आगीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. मंगळवारी (११ फेब्रुवारी) सकाळी ओशिवरातील फर्निचर मार्केटमध्ये लागलेल्या भीषण आगीमुळे परिसरात खळबळ उडाली. सकाळी ११ वाजताच्या सुमारास या फर्निचर मार्केटमधील एका दुकानाला आग (Oshiwara Fire) लागली. काही वेळातच सिलिंडरचा स्फोट झाल्याने आगीने रौद्ररूप धारण केले, ज्यामुळे २५ पेक्षा जास्त दुकाने आगीच्या विळख्यात अडकली.

ओशिवराचा एस. व्ही. रोड हा फर्निचर मार्केटसाठी प्रसिद्ध असून, येथे लाकडाची गोदामे आणि विविध शोभेच्या वस्तूंची दुकाने आहेत. सकाळी अचानक आग लागल्याने आगीचा (Oshiwara Fire) वेगाने फैलाव झाला. सिलिंडर स्फोटांमुळे आग अधिक तीव्र झाली, ज्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.

अग्निशमन दलाची तातडीची कारवाई (Oshiwara Fire)

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १० ते १२ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवान आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. याशिवाय पोलिसांनी नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम हाती घेतले आहे.

वाहतुकीवर परिणाम (Oshiwara Fire)

एस. व्ही. रोड हा गोरेगाव-जोगेश्वरीदरम्यान महत्त्वाचा मार्ग असल्याने, या घटनेमुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. सिलिंडरच्या सलग स्फोटांमुळे आग आणखी भडकत असल्याने घटनास्थळी तणावाचे वातावरण आहे.

आग लागण्याचे कारण आणि स्थिती

मुंबई अग्निशमन दलाने या आगीला (Oshiwara Fire) लेव्हल २ (मोठी आग) म्हणून घोषित केले आहे. आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे, परंतु अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही.

ही घटना स्थानिकांसाठी मोठा धक्का असून, आगीमुळे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सध्या अग्निशमन दल आणि प्रशासन आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत.