गर्लफ्रेंडला भेटायला उस्मानाबादचा तरुण मोटारसायकलवरुन थेट पाकिस्तानला; BSF ने अडवले

उस्मानाबाद | प्यार किया तो डरना क्यो याची पुन्हा एका प्रचिती आलीय. प्रेमाला कोणत्याही सीमा नसतात हे उस्मानाबादच्या एका तरुणाने दाखवून दिलंय. प्रेयसीला भेटण्यासाठी मोटारसायकलवरुन थेट पाकिस्तानला जाण्याचा निर्णय घेत या तरुणांना सर्वांनाच चाट पाडलंय. मात्र सीमेवरील बीएसएफ च्या जवानांनी सदर तरुणाला वेळी अडवले आणि ताब्यात घेतले. त्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला.

सीमा सुरक्षा दलाने ( बीएसएफ) भारत-पाक सीमेवरुन एका 20 वर्षीच्या मुलाला पकडले आहे. हा मुलगा उस्मानाबादचा असल्याची माहिती आहे. झिशान सिध्दिकी असं या तरुणाचं नाव आहे. तो सीमेवर आपल्या पाकिस्तानी प्रेमीला भेटायला गेला होता. त्याला रात्री पाकिस्तानी सीमेवर 9.30 वाजता पोलिसांनी पकडले.  देशभरात कोरोनामुळं अनेक ठिकाणी लॉकडाऊन असताना तो तिथपर्यंत पोहोचलाच कसा? हा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे.

झिशान हा उस्मानाबादहून अहमदनगरपर्यंत सायकलवर पोहोचला. अहमदनगर ते गुजरात मोटार सायकलवर पोहोचला आणि मग पायी चालत सीमेच्या जवळ पोहोचला. त्याची दुचाकी वाळूमध्ये अडकल्यानंतर तो पायी चालत पाकिस्तानला जाणार होता. सुरक्षा दलाला वाळूत अडकलेली एक दुचाकी सापडल्यानंतर त्यांनी शोध मोहीम सुरू केली. यानंतर त्यांनी झिशानला ताब्यात घेतले. त्यावेळी तो महाराष्ट्रातला असल्याचे स्पष्ट झाले.

या मुलाचे वडील मौलाना आहेत. तो इंजिनिअरींगचे शिक्षण घेत आहे.  एटीएस, सायबर, औरंगाबाद, उस्मानाबाद, मुंबई पोलिसांनी त्याचा तपास केला. त्याचा लॅपटाॅप तपासला असता तो पाकिस्तानी मुलीच्या प्रेमात आहे, हे लक्षात आले.

उझबेकिस्तानमध्ये बसून ‘ती’ मुंबईत चालवायची SEX रेकेट; ८० हजार रेट!

लज्जास्पद! नांदेडमध्ये शिक्षकांनीच केला सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर बलात्कार

गर्लफ्रेंड ला इम्प्रेस करायचंय? मग हे करा

लाॅकडाउनमध्ये वाढली Sex Toys ची मागणी! कंडोमची ऑनलाईन विक्री तेजीत

या पाच कारणांमूळे हनीमूनला जाणे महत्वाचे