कोविड -१९ दरम्यान टेनिस कोर्टवर जाऊन नोव्हाक जोकोविचने मोडला लॉकडाऊनचा नियम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नोव्हाक जोकोविचने स्पेनमधील टेनिस कोर्टावर जाऊन लॉकडाऊनचा नियम तोडला.जोकोविचने नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये तो मार्बेल्ला शहरातील टेनिस क्लबमध्ये दुसर्‍या माणसाबरोबर टेनिस खेळत आहे.सर्बियाचा जोकोविच सध्या या शहरात राहतो आहे.

स्पेनने सोमवारी काही भागात काही प्रमाणात लॉकडाऊन शिथिल केलेले आहे. कोरोना विषाणूच्या साथीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर मार्चपासून हे लॉकडाउन सुरु आहे. आता व्यावसायिक खेळाडूंना परत सरावास जाण्याची परवानगी मिळालेली आहे परंतु पुढील आठवड्यापर्यंत सर्व स्पोर्ट्स क्लब आणि स्टेडियम बंद ठेवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.

अद्यापही हे स्पष्ट झालेले नाही की त्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन न केल्यास त्यांना दंड किंवा शिक्षा होईल की नाही.

2018 Novak Djokovic tennis season - Wikipedia

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment