Sunday, May 28, 2023

वयाच्या 54 व्या वर्षी रिंगमध्ये परतणार दिग्गज माइक टायसन; होणार हाय वोल्टेज लढत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बर्‍याच दिवसांपासून हेवीवेट चॅम्पियन माईक टायसनला परत येण्याची चर्चा होते आहे. गुरुवारी, अखेर त्याने जाहीर केले की, 12 सप्टेंबरला तो पुन्हा रिंगमध्ये उतरणार आहे. गुरुवारी, त्याने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना सांगितले की, 12 सप्टेंबर रोजी तो चार डिजीवन विश्वविजेत्या रॉय जॉन्सविरुद्ध बाउट मध्ये उतरणार आहे.

रॉयच्या आधी असे सांगितले जात होते की, टायसन माजी प्रतिस्पर्धी एव्हॅन्डर होली फील्ड आणि न्यूझीलंडचा रग्बी प्लेयर सोनी बिल विल्यम यांच्या विरुद्ध रिंगमध्ये परत येऊ शकेल. त्याच वेळी असेही वृत्त देण्यात आले आहे की टायसन हा चॅरिटी सामना देखील खेळू शकतो.

माईक टायसनने अवघ्या 20 व्या वर्षी हेवीवेट चॅम्पियन म्हणून जेतेपद मिळवले होते. 2003 मध्ये माइक टायसन आपल्या कारकीर्दीत 300 मिलियन डॉलर मिळवूनही दिवाळखोर झाला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.