…अन्यथा कृषी धोरणाबाबत केंद्र सरकारवर प्रश्नचिन्ह कायम : बच्चू कडू

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

राज्यातील महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यावर दीड वर्षापासुन कोरोनामुळे कामावर परिणाम झाला आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून सरकारचा बहुतांशी काळ हा कोरोनामध्ये गेला, अशा परिस्थितीत मुख्यमंत्री माननीय उद्धवजी यांच्या माध्यमातून हे सरकार चांगलं काम करत आहे. पुढील काळात सरकारचे काम टवटवीत उमटेल, असा विश्वास राज्यमंत्री बच्चुकडु यांनी व्यक्त केला. केंद्र सरकारने कृषी कायद्याचे धोरण बदलले नाही, तर सरकारच्या धोरणावर प्रश्नचिन्हच राहणार आहे, असेही त्यांनी सांगीतले.

सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावरुन खटाव तालुक्यात जात असताना मंत्री बच्चु कडु यांनी कराड येथे धावती भेट देवुन अपंग बांधवांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदांचा आढावा घेतला. त्याप्रसंगी ते बोलत होते. प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित बानगुडे-पाटील, सचीव शिवाजी चव्हाण, संपर्क प्रमुख शंभुराज खलाटे, महेश शिंदे, मनोज माळी, दादासाहेब थोरात, शुभमं उबाळे, विजय मोरे, सतीश पाटील आदी उपस्थित होते.

बच्चू कडू म्हणाले, केंद्र सरकारने केवळ कृषी कायदे मागे घेऊन चालत नाही, तर केंद्र सरकार जोपर्यंत धोरण बदलत नाही. तोपर्यंत सरकार शेतकऱ्यांचे आहे कि नाही यावर प्रश्नचिन्ह राहणार आहे.