OTT Apps Banned : केंद्र सरकारची मोठी कारवाई!! Ullu सह 25 अश्लील OTT प्लॅटफॉर्म बॅन

OTT Apps Banned
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन OTT Apps Banned। मोबाईल वरून अश्लील विडिओ बघणाऱ्या लोकांना केंद्र सरकारने दणका दिला आहे. सरकारने ओटीटी प्लॅटफॉर्मवरील अश्लील आणि अनुचित कंटेंटवर मोठी कारवाई केली आहे. प्रसिद्ध अशा Ullu अँप सह २५ OTT प्लॅटफॉर्म सरकारने बॅन केले आहेत. या अॅप्सवर वापरकर्त्यांना अश्लील आणि बोल्ड कंटेंट दाखवल्याचा आरोप आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने इंटरनेट सेवा प्रदात्यांना (ISPs) भारतात या वेबसाइट्स आणि अॅप्स तात्काळ ब्लॉक करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

मंत्रालयाला असे आढळून आले की हे अ‍ॅप्स आणि वेबसाइट्स आक्षेपार्ह जाहिराती आणि अश्लील सामग्री प्रसारित करत होते. हे ओटीटी प्लॅटफॉर्म्स सातत्याने अश्लील कन्टेन्ट दाखवत आहे जे भारतीय संस्कृतीला न शोभणारे आहे. आणि भारतीय कायद्यांचे उल्लंघन करत होते. यानंतर, मंत्रालयाने त्या सर्वांवर कारवाई केली. सरकारने माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० (आयटी कायदा, २०००) आणि आयटी नियम, २०२१ (मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वे आणि डिजिटल मीडिया नीतिमत्ता संहिता) अंतर्गत या OTT अॅप्स आणि वेबसाइट्स बॅन केल्या आहेत. (OTT Apps Banned)

कोणकोणते अँप्स बॅन झाले? OTT Apps Banned

केंद्र सरकार कडून बॅन करण्यात आलेल्या अँप्स मध्ये ALTT, ULLU, Big Shots App, Desiflix, Boomex, Navarasa Lite, Gulab App, Kangan App, Bull App, Jalva App, Wow Entertainment, Look Entertainment, Hitprime, Feneo, ShowX, Sol Talkies, Adda TV, HotX VIP, Hulchul App, MoodX, NeonX VIP, Fugi, Mojflix आणि Triflicks या अॅप्सचा समावेश आहे. अनेक युवा तरुण मुले या अँपच्या माध्यमातून आणि वेबसाईट वरून अश्लील विडिओ बघतात. अशा व्हिडिओमुळे सामाजिक वातावरण बिघडते. लोकांच्या मनावर परिणाम होतो आणि गुन्हेगारीच्या घटनाही वाढतात. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेत हे सर्व अँप बॅन केले आहेत.