आमच्या सरकारमध्ये रंग बदलण्याचेही धाडस आहे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी : सकलेन मुलाणी

पाटण तालुक्यातील मल्हारपेठ पोलीस ठाणे व पोलिस वसाहत इमारतीचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते ई- भूमिपूजन समारंभ गुरुवारी पार पडला. या कार्यक्रमावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलीस ठाणे व पोलिस वसाहत इमारतीच्या रंगाचा विषय काढला. याबाबत पवारांनी नाराजीही व्यक्त केली. त्यावेळी पवारांच्या नाराजीवर त्यांनी उत्तर दिले तर विरोधकांना टोलाही लगावला. अजित पवार यांना रंगातील कळत. त्यांनी इमारतीच्या रंगाबद्दल मत मांडले. मला बरे वाटले, मला असे वाटले होते कि मी एकटाच कलाकार आहे. मात्र, एक गोष्ट लक्षात घ्यावी कि रंग बदलण्याचं धाडस या सरकारमध्ये आहे, असा टोला मुख्यमंत्री ठाकरे यांनी विरोधकांना लगावला.

सध्या भाजपकडून महाविकास आघाडी सरकारवर खूप टीका केली जात आहे. तर येणाऱ्या निवडणूक या स्वबळावर लढण्याच्या घोषणा या काँग्रेसने दिलेल्या आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये बिघाडी असल्याची चर्चाही सर्वत्र रंगू लागली आहे. अशा परिस्थतीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी मल्हारपेठ येथील कार्यक्रमात केलेल्या ऑनलाईन भाषणात महत्वाचे विधान केले आहे.

मल्हारपेठ येथे आज पार पडलेल्या मल्हारपेठ पोलीस ठाणे व पोलिस वसाहत इमारतीचा ई- भूमिपूजन समारंभ व त्यामध्ये मुख्यमंत्री ठाकरे यांनी विरोधकांना लगावलेला टोला हा विषय चांगलाच चर्चेचा बनला आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले कि, आपल्या मनातील भावना प्रत्येकाने व्यक्त करणे हे खूप सोपे असू शकते. मात्र, त्यापुढे जाऊन सांगायचे झाले तर चांगल्या भावना असणे आणि त्या व्यक्त करून नाही, तर त्या प्रत्यक्षात आणण हे खूप महत्वाचे असते. असे मुख्यमंत्री ठाकरेंनी म्हंटल आहे.

तसेच यावेळी ठाकरेंनी विरोधकांनाही टोला लगावला. ते म्हणाले, सध्या अनेकजण आपले रंग दाखवत आहेत. ते रंग बघावे लागतात. पण हे रंग बदलण्यासाठी अंगामध्ये धाडस असावे लागते. आणि ते धाडस या सरकारमध्ये आहे. लोक रंग दाखवताहेत, ते आपण बघत असतो, त्याला काही अर्थ नसतो. पण एकदा जर रंग आवडला नाही तर तो बदलण्याचे धाडस असावे लागते, आणि ते यासरकारमध्येही आहे.

Leave a Comment