निसर्ग चक्रीवादळामुळे आतापर्यंत ५ जण जखमी, कोणतीही जीवितहानी नाही- उदय सामंत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । निसर्ग चक्रीवादळामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याना तडाखा बसला आहे. या दोन्ही जिल्ह्यात अनेक ठिकाणी झाडे पडण्याचे तसेच विजेच्या तारा तुटण्याचे प्रकार घडले. यात 4 जण जखमी झाले आहेत. मात्र जिवितहानी नाही. तसेच वादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू झाले असून नुकसानाबाबत 2 दिवसांत भरपाई रक्कम शासकीय नियमांप्रमाणे दिली जाईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. हे चक्रीवादळ रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पुढे सरकले असून पाऊस थांबताच नुकसानीचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.

दरम्यान, रत्नागिरीत डिझेल वाहतूक करणारी एक बोट भगवती बंदरात होती. वाऱ्याच्या वेगाने जहाजाचा अँकर तुटल्याने ती भरकटत पांढऱ्या समुद्रापर्यंत आली. ही नाव किनाऱ्याला आणली असून यावरील १३ खलाशांना सुखरूपपणे वाचविण्यात यश आले आहे. हे खलाशी डिझेल पुरवठा करून परतण्यासाठी निघाले, परंतु वादळाच्या सुचनेमुळे थांबले होते. या प्रवाशांमध्ये 10 भारतीय असून 3 परदेशी आहेत. यामुळे या सर्वांना क्वॉरंटाईन करून त्यांचे स्वँब घेतले जातील, त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल असेही सामंत यांनी सांगितले.

हे जहाज खडकावर आदळून त्याला छिद्र पडल्याने वापरून झालेले इंजिन ऑइल सांडले, परंतु धोका नाही. बोट महिनाभर येथेच राहील, असंही ते म्हणाले. तसेच पुढे बोलताना मंडणगड आणि दापोली तालुक्यात मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती तेथील विभागीय अधिकाऱ्यांनी दिली असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment