शाब्बास रे पठ्ठ्या ! आठ लाख मुलांच्यातून गोटेवाडीच्या पंकज आमलेची बाजी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी

लहरों से डर कर नौका पार नही होती… कोशिश करने वालों की कभी हार नही होती, असं म्हटलं जातं. परंतु प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अनंत अडचणींचा सामना करत एखादं यश मिळतं. त्याला ते तावून-सुलाखून मिळाल्या सारखं असतं गोटेवाडीच्या पंकज आमले यांनी पहिल्याच प्रयत्नात सेंट्रल पोलीस उपनिरीक्षकपदी बाजी मारली आहे.

पंकजने नव्या पिढीसमोर आदर्श निर्माण केला आहे. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही चांगला अभ्यास करून वर्गातील प्रथम क्रमांक सोडला नाही. पैशाअभावी इंजिनीअरिंगचा प्रवेश नाकारून बीएला प्रवेश घेऊन प्रसंगी वर्कशॉपमध्ये हेल्पर, कुरियरचे काम करत डबल ग्रॅज्युएशन केले. कोरोनावर मात करत तीन वर्ष एमआर म्हणून काम करून घरच्यांना हातभार लावला. त्यानंतर पहिल्याच प्रयत्नात सीआयएसएफमध्ये सेंट्रल पोलीस उपनिरीक्षकपदी बाजी मारली.

आर्थिक तांत्रिक या सर्वच अडचणींचा सामना पंकजला करावा लागला. सत्याला सिद्ध करण्यासाठी प्रसंगी झगडावं लागलं. लॉकडाऊनमध्ये सराव करण्यासाठी मैदान उपलब्ध नव्हते. तेव्हा आगाशिव डोंगर, कासेगाव, बेलवडे या ठिकाणी जाऊन सात महिने सराव करून सोळाशे मीटर रनिंगमध्ये पहिला आला. मुख्य परीक्षेला जाताना प्रचंड पावसामुळे गाड्या बंद होत्या. चार किलोमीटर गुडघाभर पाण्यातून चालत जाऊन मिळेल, त्या गाडीने मुंबई गाठली आणि 200 पैकी 185 गुण मिळवून देशात गुणवत्ता यादीत आला.

या त्याच्या यशात आई-वडील, बहीण यांचा खूपच मोठा हातभार आहे. वडिलांनी माथाडी कामगार म्हणून तर आई -बहिणीने काम करून त्याला हातभार लावला. आईने पुस्तकासाठी दागिने मोडले अशा परिस्थितीतून आई-वडिलांच्या कष्टाचे सार्थक करण्याची जिद्द मनात घेऊन पंकज आमले यांनी सेंट्रल पोलीस उपनिरीक्षक पदी झेप घेतली आहे. तब्बल 8 लाख 623 मुलांमधून पंकजची झालेली निवड ही कराड तालुकाच नव्हे तर सातारा जिल्ह्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे.

Leave a Comment