Over boiling of Milk Tea | दुधाचा चहा जास्त उकळणे आहे हानिकारक; आरोग्याला होते हे नुकसान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Over boiling of Milk Tea | चहा हे आपल्या भारतातील एका असे पेय आहे. ज्याने अनेकांच्या दिवसाची सुरुवात होते. चहाचे वेगवेगळे ब्रँड्स देखील भारतामध्ये आहे. अनेकांना कोणत्याही वेळेला चहा लागतो. चहाचे अनेक प्रकार देखील आहे. ग्रीन टी, ब्लॅक टी लेमन टी, दुधाचा चहा त्याचप्रमाणे प्रत्येक जण त्यांच्या आवडीनुसार वेगवेगळ्या गोष्टी चहामध्ये घालून चहा पितात. परंतु दुधाचा चहा हा सगळ्यांना जास्त प्रमाणात आवडतो.

अनेक लोक दुधात चहा पावडर टाकून जास्त वेळ तो उकळतात आणि मग पितात. परंतु दुधामध्ये चहा पावडर टाकून जास्त वेळ उकळकेला चहा (Over boiling of Milk Tea) हा तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो. हा चहा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम करतो. दुधाचा चहा एका ठराविक वेळेपर्यंत उकळला गेला पाहिजे. जर चहा जास्त उकळला तर त्याने तुमच्या आरोग्यावर हानिकारक परिणाम होतात. तुम्हाला जर चहाची योग्य चव आणि निरोगी चहा प्यायचा असेल, तर तो केवळ चार ते पाच मिनिटे उकळला पाहिजे. आता चहा जास्त वेळ उकळल्याने आपल्या शरीरावर त्याचा काय परिणाम होतो हे जाणून घेऊया.

शरीरात लोह आणि कॅल्शियमची कमतरता | Over boiling of Milk Tea

दुधाचा चहा जास्त वेळ उकळल्याने त्यात टॅनिनचे प्रमाण वाढते, ज्यामुळे पोषक तत्वांचे शोषण होण्यास अडथळा निर्माण होतो. यासोबतच टॅनिनचे प्रमाण जास्त असल्याने शरीरात लोहाची कमतरता निर्माण होते, त्यामुळे ॲनिमिया होण्याची भीती असते.

चहाची आम्लता वाढते

दुधाचा चहा जास्त उकळल्याने त्याचा पीएच बदलतो, ज्यामुळे चहा अधिक अम्लीय बनतो.

कर्करोगाचा धोका

दुधाचा चहा जास्त उकळल्याने कर्करोगजन्य पदार्थ ऍक्रिलामाइड तयार होतो, जो आरोग्यासाठी हानिकारक आहे.

पचन समस्या

जास्त उकळलेल्या दुधाचा चहा प्यायल्याने आम्लपित्त, पोटदुखी, बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

रक्तदाब वाढवते

आधीच उकळलेला चहा आणखी उकळल्याने त्यात टॅनिनचे प्रमाण वाढते, ज्यामुळे रक्तदाब वाढतो.

पोषक तत्वांचे नुकसान

दुधाचा चहा जास्त उकळल्याने दुधामध्ये प्रथिने, व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमसारखे अनेक पोषक घटक नष्ट होतात.