Thursday, March 23, 2023

बाधित दोन लाख पार : सातारा जिल्ह्यात नवे 1 हजार 165 कोरोना बाधित तर पाॅझिटीव्ह रेट 10. 54 टक्के

- Advertisement -

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडकेे

सातारा जिल्ह्यात गुरूवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये 1 हजार 165 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 659 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये 11 हजार 53 चाचण्या तपासण्यात आल्यानंतर त्यामध्ये पाॅझिटीव्ह रेट 10. 54 टक्के इतका आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 10 हजार 316 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 2 लाख 1 हजार 663 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 1 लाख 87 हजार 172 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत 4 हजार 835 बाधितांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी दिवसभरात 23 कोरोना बाधितांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

कराड, सातारा व फलटण तालुका आघाडीवर

तालुकानिहाय कोरोना बाधितांची कालपर्यंत बाधित रुग्णांची संख्या – जावली -8808, कराड – 30029, खंडाळा – 12080, खटाव – 20198, कोरेगांव – 17439, माण – 13488), महाबळेश्वर – 4355, पाटण – 8901, फलटण – 28906, सातारा – 41745, वाई – 13115 व इतर – 1434) असे काल अखेर एकूण 2 लाख 498 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.