विधानसभा निवडणूक २०१९ : या मतदारसंघात सहाव्यांदा जिंकण्यास भाजप सज्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अकोला प्रतिनिधी | विधानसभा निवडणूक अवघ्या दोन महिन्यावर येऊन ठेपल्या असताना आता सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. तर महाराष्ट्रात असे काही मतदारसंघ आहेत ज्या मदतरसंघात मागील पाच अथवा सहा निवडणूका एकाच पक्षाची सत्ता कायम आहे ते मतदारसंघ आणि तेथील निवडणुकांची सूत्र मोठी रोचक असतात. असाच एक मतदारसंघ आहे जिथे भाजपचे कमळ १९९५ पासून आजतागायत फुलते आहे तो मतदाररसंघ म्हणजे अकोला पश्चिम!

मराठा आरक्षणाच्या बाजूने लढणाऱ्या विनोद पाटलांना हा पक्ष बनवणार आमदार

या मतदारसंघात सातत्याने भाजप जिंकते आहे. कारण या मतदारसंघात भाजपने ज्या प्रकारे बांधणी केली आहे आणि ज्या प्रकारे येथील जनतेच्या मनात विश्वास निर्माण केला आहे त्याप्रकारे इतर पक्ष येथे पाय रोवू शकले नाहीत. पश्चिम अकोला विधानसभा मतदारसंघ हा संपूर्ण शहरी मतदारसंघ आहे. गोवर्धन शर्मा हे तेथील आमदार आहेत. त्यांनी या मतदारसंघात एकहाती पकड ठेवली असून मागील पाच वर्षात सत्तेच्या जोरावर मोठी विकासकामे या भागात करून पुन्हा एकदा मतदारांच्या मनात नव्याने घर केले आहे.

उरी-द- सर्जिकल स्ट्राईक हा चित्रपट महाराष्ट्रात ‘या’ दिवशी चित्रपटगृहात दाखवणार मोफत

गोवर्धन शर्मा हे अकोला शहरात लालजी या नावाने ओळखले जातात. त्यांनी आपली साधी राहणी आजही जपली आहे. आमदार असण्याचा जरा देखील गर्व त्यांच्या चेहऱ्यावर आणि वागण्यातून दिसत नाही. त्यामुळेच येथील जनता त्यांच्यावर विश्वास टाकते आहे. यावेळी देखील गोवर्धन शर्मा यांच्या समोर पक्षांतर्गत कोणीही दावेदार नाही. तसेच आव्हान उभा करू शकेल असा विरोधक देखील नाही. त्यामुळे या खेपेला तेच या ठिकाणी बाजी मारतील असे चित्र सध्या अकोल्यात दिसते आहे.

हे पण वाचा –

मराठा आरक्षणाच्या बाजूने लढणाऱ्या विनोद पाटलांना हा पक्ष बनवणार आमदार

लक्ष्मण मानेंनी केली नव्या राजकीय पक्षाची घोषणा ; काँग्रेससोबत आघाडी करण्याचे संकेत

या मतदारसंघातून चंद्रकांत खैरे विधानसभा निवडणूक लढणार !

आणि रोहित पवारांनी त्याच्या हट्टापायी सलूनमध्ये केली कटींग!

म्हणून सनी लिओनी कधीच पाहत नाही आपल्या आई-वडिलांचा फोटो

ना मंत्रीपद, ना राज्यपाल पद , विजयसिंहांना मिळणार ‘या’ विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी?

अजित पवार मोहिते पाटलांच्या पाठीशी ; घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Leave a Comment