LIC Money Back Plan: दररोज 160 रुपये वाचवून बनू शकाल 23 लाखांचे मालक, 5 वर्षात घेऊ शकाल लाभ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेली भारतीय जीवन विमा महामंडळात ग्राहक गुंतवणूकीसाठी अनेक योजना आहेत. या योजनेत गुंतवणूक करून ग्राहक आपल्या भवितव्यासाठी भरपूर पैसे जोडू शकतो. एलआयसी अशी अनेक पॉलिसी ऑफर करते जी बहुतेक लोकांना आवडतात. यापैकी काही पॉलिसी दीर्घ मुदतीच्या तर काही अल्प मुदतीच्या असतात. अशा परिस्थितीत जर तुम्हाला थोडे पैसे गुंतवायचे असतील आणि भरपूर रिटर्न्स घ्यायचे असतील तर आपली ही इच्छा पूर्ण होऊ शकते. यासाठी एलआयसीने एक योजना सुरू केली आहे. ज्याचे नाव एलआयसी न्यू मनी बॅक पॉलिसी (LIC New Money Back Policy) असे आहे.

चला तर मग एलआयसी न्यू मनी बॅक पॉलिसीबद्दल जाणून घेऊयात
एलआयसीची ही मनी बॅक प्लॅन नॉन-लिंक्ड लाइफ इन्शुरन्स पॉलिसी आहे. जी गॅरेंटेड रिटर्न आणि बोनस देते. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे विमाधारकाला 5 वर्षात पैसे परत मिळतात, मॅच्युरिटीमध्ये चांगले परतावे तसेच दरवर्षी कर विम्याचा लाभ मिळतो.

https://t.co/uDxeICqFKr?amp=1

मॅच्युरिटीवर मिळालेली रक्कम करमुक्त आहे
आपल्याला ही योजना घेण्यासाठी 20 वर्ष आणि 25 वर्षांचे 2 पर्याय मिळतील. हि पॉलिसी एक संपूर्ण कर मुक्त पॉलिसी आहे. यासह, त्याच्या व्याज, प्रीमियम पेमेंट आणि मॅच्युरिटीवर मिळालेल्या रकमेवर कोणताही कर आकारला जाणार नाही. या योजनेत जर तुम्ही 25 वर्षांसाठी दररोज 160 रुपये गुंतवत असाल तर 25 वर्षांनंतर तुम्हाला 23 लाख रुपयांपर्यंत पैसे मिळतील.

https://t.co/myl3jgiEhG?amp=1

13 ते 50 वर्षे वयोगटातील लोक लाभ घेऊ शकतात
एलआयसीच्या मते, 13 वर्षे ते 50 वर्षांपर्यंतची कोणतीही व्यक्ती ही योजना घेऊ शकते. या योजनेत, दर पाचव्या वर्षी म्हणजेच 5 व्या वर्षी, 10 व्या वर्षी, 15 व्या वर्षी, 20 व्या वर्षी, 15% पैसे परत मिळतील. परंतु हे तेव्हाच होईल जेव्हा प्रीमियमच्या किमान 10 टक्के रक्कम जमा केली जाईल. याद्वारे गुंतवणूकदारांना मॅच्युरिटीवर बोनस दिला जाईल. एकूण 10 लाख रुपयांच्या या योजनेत आपणास अपघाती मृत्यूचा लाभही मिळेल. मॅच्युरिटीनंतर गुंतवणूकदारांना बोनसही दिला जाईल.

https://t.co/8wvMAbRaWs?amp=1

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment