डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका पाहता ऑक्सिजन सिलिंडर सज्ज ठेवावे – विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | गेल्या वर्षांपासून संपूर्ण राज्यभर कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. कोरोना पळवून लावण्यासाठी राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’ मोहीम सुरु केली होती. आणि कडक निर्बंध लावले होते. आता पून्हा कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका वाढत आहे. मराठवाड्यातही याचा धोका उद्भवू शकतो. त्यामुळे सतर्क रहा असे निर्देश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी विभागातील जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

‘कोरोना महामारीच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये जास्त उद्रेक असलेल्या दिवसांमध्ये जेवढे ऑक्सिजन दररोज लागत होते. त्यापेक्षा 25 टक्के जास्त ऑक्सिजन तिसऱ्या लाटेत लागू शकते. त्यामुळे विभागातील सर्व जिल्ह्यामध्ये आतापासूनच बफर स्टॉक सज्ज ठेवण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने तयारी सुरु करावी. त्याचबरोबर अतिरिक्त पाच हजार ऑक्सिजन सिलिंडर सज्ज ठेवावे.’ असे निर्देश सुनील केंद्रेकर यांनी दिले आहे.

सध्या मराठवाड्यात एकही रुग्ण नसला तरीही रुग्ण आढळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सावधानता बाळगत सोमवारी सुनील केंद्रेकर यांनी मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी कोरोनाच्या दोन्ही लाटेत झालेली वाढ आणि कालावधीचा आढावा घेऊन त्यानुसार त्यांनी प्रत्येक जिल्ह्यांना कृती आराखडा तयार करून नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यातील शासकीय, निशासकीय रुग्णालयांची संख्या, त्यातील कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या खाटांची आकडेवारी, ऑक्सिजन उपलब्धता, उपलब्ध ऑक्सिजन टँक, नव्याने तयार करण्यात येत असलेल्या टँकची माहितीही सुनील केंद्रेकर यांनी जाणून घेतली.

Leave a Comment