औरंगाबाद : विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी नियोजित वेळेत आॉक्सिजन पोहोचवून देवदूत ठरलेल्या टँकर चालकांशी संवाद साधत त्यांच्यामुळे रुग्णांचे प्राण वाचले असे गौरवोद्वार काढून त्यांचा सत्कार केला.
टँकर चालकांच्या अडचणी जाणून घेत कर्तव्ये पार पाडताना त्यांना आलेला अनुभव जाणून घेत केंद्रेकर यांनी त्यांच्याशी मुक्त संवाद साधला.
‘मराठवाड्यामध्ये कोरोना सारख्या संकट काळात देखील आॉक्सिजनची कमतरता येऊ न देता उत्तम प्रकारे कोरोनाकाळ हाताळला गेला आहे. सर्व सोयी सुविधासह उत्तम प्रकारे कोरोनाकाळात जबाबदारीने कर्तव्ये पार पाडले. त्यात आॉक्सिजन टँकरचालकाचा मोठा वाटा असून या सर्वांचा सकारात्मक परिणाम म्हणजे मराठवाड्याची उपचाराबाबत चांगली प्रतिमा निर्माण झाली.’ असं केंद्रेकर यांनी सांगितलं.
आॉक्सिजन टँकरचालकाच्या अथक परिश्रमाने वाहन चालवून नियोजित ठिकाणी आणि नियोजित वेळेत आॉक्सिजन पोहोचवून टँकरचालक हे कोरोना रुग्णांसाठी देवदूत ठरले आहे. यांच्यामुळेच रुग्णांचे प्राण वाचले असल्याचे गौरवोद्वार विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी काढले आहे. कोरोना संकटकाळात महत्त्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या आॉक्सिजन टँकरचालकाच्या सत्काराचे हा अनौपचारिक सत्कार विभागीय आयुक्तांच्या निवासस्थानी गुरूवारी पार पडला. या सत्कारावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा आयुक्त तथा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय, अप्पर आयुक्त अविनाश पाठक, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, उपायुक्त पराग सोमण, अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त संजय काळे, उपायुक्त वीणा सुपेकर, मागासवर्गीय कक्षाचे उपायुक्त शिवाजी शिंदे, उपायुक्त, जगदीश मणियार उपजिल्हाधिकारी रिता मैत्रवार ,संगीता सानप यांची उपस्थिती होती.