‘Oye! Rickshaw’ बॅटरी स्वॅपिंग व्यवसायात करणार 3700 कोटींची गुंतवणूक, आता अवघ्या काही मिनिटांत मिळणार पूर्ण चार्ज बॅटरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । ई-रिक्षा बुकिंग सेवा कंपनी ‘Oye! Rickshaw’ पुढील तीन वर्षांत देशभरात तीन चाकी वाहनांसाठी बॅटरी स्वॅपिंग पायाभूत सुविधा (Battery Swapping Infrastructure) उभारण्यासाठी 3700 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. बॅटरी स्वॅपिंग फीचर्समुळे ड्रायव्हर्सची बॅटरी चार्जिंगच समस्या दूर होईल आणि काही मिनिटांत बॅटरीची अदलाबदल होऊ शकेल.

या कंपनीला मॅट्रिक्स पार्टनर्स, चिराटा वेंचर्स, झिओमी आणि उद्योगपती पवन मुंजाल यांच्यासारख्या गुंतवणूकदारांचे पाठबळ आहे. बॅटरी स्वॅपिंग व्यवसायाच्या उभारणीस गती देण्यासाठी यावर्षी सुमारे 2-3 कोटी डॉलर्सची गुंतवणूक होईल. कंपनी सध्या आपला बहुतेक व्यवसाय दिल्ली-एनसीआर आणि हरियाणाच्या काही भागांत करते.

या वर्षाच्या अखेरीस कंपनीने 10,000 लिथियम-आयन बॅटरी तयार करण्याचे लक्ष्य ठेवले होते. कोविड -19 साथीच्या दुसर्‍या लाटेमुळे हे शक्य झाले नाही आणि आता कंपनी 5,000 वाहनांमध्ये 6,500 लिथियम-आयन बॅटरी तयार करण्याच्या विचारात आहे.

‘Oye! Rickshaw’ नेही आपला वितरण व्यवसाय वाढविण्यावर भर दिला आहे. Oye! Rickshaw चे मुख्य कार्यकारी अध्यक्ष आणि सहसंस्थापक मोहित शर्मा म्हणाले की, “आम्ही येत्या तीन वर्षांत 40 – 50 कोटी डॉलर्सची गुंतवणूक करणार आहोत. ही एक मोठी रक्कम आहे. या वर्षापर्यंत किंवा पुढच्या वर्षीपर्यंत आम्ही सुमारे 2-3 कोटी डॉलर्सची गुंतवणूक करणार आहोत.”

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment