सातारा | भारतातील एक सुप्रसिध्द असणारे नाव महिंद्रा ॲण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी एक व्हिडीओ ट्विटवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओत महाबळेश्वर- पाचगणी रस्त्यावर दोन वाघ दिसल्याचा दावा करण्यात आलाय. परंतु या भागात अद्याप वाघांचा दावा कधीही वनविभागाने केला नाही किंवा लोकांनी पाहिलेला नाह. मग या व्हायरल व्हिडीओ मागील नक्की सत्य काय आहे.
“तर हायवेवर केवळ आमची एक्सयूव्ही ही एकमेव बिग कॅट नाहीय. भन्नाट आहे हे…” अशा कॅप्शनसहीत आनंद महिंद्रांनी हा व्हिडीओ शेअर केलाय. व्हिडीओमध्ये वाघ 19 ऑगस्ट 2021 रोजी महाबळेश्वर- पाचगणी मार्गावर रात्रीच्या वेळी दिसल्याचं सांगण्यात आलं आहे. व्हिडीओमध्ये दोन वाघ रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झुडपातून बाहेर रस्त्यावर येताना दिसत आहेत. तेथे असलेल्या एका दुचाकीकडे उभ्या असणाऱ्या बाईकपर्यंत एक वाघ येऊन पुन्हा जेथून बाहेर आलेला त्या दिशेने जातो. एकाचवेळी दोन वाघ पाहताच तेथे असलेल्या गाडीतून हा व्हिडीओ काढण्यात आलाय, त्या गाडीतील प्रवासी घाबरतात आणि गाडी मागे घ्या मागे घेण्यास सांगातात. तेव्हा गाडीतील काहीजण शांत राहण्यास सांगतात. थोड्या वेळात हे वाघ पुन्हा जंगलामध्ये निघून जातात. पाचगणी- महाबळेश्वरमधील व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा एखाद्या व्याघ्र प्रकल्पामध्ये टायगर सफारीसाठी जावं असा हा व्हिडीओ वाटतोय. व्हिडीओमध्ये गाडीच्या हेडलाइटच्या प्रकाशात दोन्ही वाघ अगदी स्पष्टपणे दिसत आहेत.
https://twitter.com/anandmahindra/status/1429426168038674438?s=20
महाबळेश्वर-पाचगणी पट्ट्यामध्ये अनेकदा वाघ दिसून येतात. या भागाच्या जवळच चांदोली राष्ट्रीय उद्यानही आणि कोयना वन्यजीव अभयारण्य असून हे क्षेत्र सह्याद्री व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले आहे. येथे वाघाबरोबरच गवा, चितळ, सांबर, हरीण, बिबटे पाहायला मिळतात. सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या सह्यद्रीच्या डोंगररांगांत कपारींमध्ये अनेक दुर्मिळ वनस्पती, प्राणी सापडत आहेत. त्यामुळे जंगल पर्यटनासाठी हे उत्तम ठिकाण आहे. सह्याद्री व्याघ्र परिसर वाघांच्या अस्तित्वासाठी अत्यंत सुरक्षित मानला जातो. मात्र हा व्हिडीओ महाबळेश्वर- पाचगणी मार्गावरील नाही.
व्हायरल वाघाचे व्हिडीओ महाबळेश्वर- पाचगणी मार्गावरी नाहीत
सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या आणि पर्यटकांचे आकर्षण म्हणून महाबळेश्वर, पाचगणी यांची अोळख आहे. या परिसरात जंगलाचे प्रमाणही मोठे आहे. 19 ऑगस्ट 2021 रोजी महाबळेश्वर- पाचगणी मार्गावरी व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. सदरील व्हिडीओ महाबळेश्वर- पाचगणी येथील नसल्याचे सातारा जिल्ह्याचे उपवनसरंक्षक महादेव मोहिते यांनी सांगितले आहे.