पाचवड येथील भीषण अपघातात पाच जखमी; जखमींमध्ये ३ राजस्थानी, २ कराडकरांचा समावेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

पाचवड ता. कराड येथे महामार्गावर उभ्या असलेल्या चारचाकी गाडीला पाठीमागून आलेल्या गाडीने जोरदार धडक दिली. या अपघातात दोन्ही गाडीतील एकूण 5 जण जखमी झाले आहेत. रविवारी सायंकाळी हा अपघात झाला असून अपघातात दोन्ही वाहनांचं प्रचंड नुकसान झालं आहे.

जखमींमध्ये राजस्थानमधील 3 तर रेठरे खुर्द ता. कराड येथील 2 जण जखमी झाले आहेत. राजस्थानचे प्रकाश चोथाराम चौधरी, त्यांची पत्नी व मुलगा तसेच कराडच्या रेठरे खुर्द येथील अनिकेत जालिंदर सुतार व त्यांच्या पत्नी स्नेहल अनिकेत सुतार अशी जखमींची नावे आहेत.

घटनास्थळावरून मिळालेल्या अधिक माहितीनुसार रविवार दिनांक ५ जुलै रोजी चौधरी कुटुंबीय बेंगलोर वरून त्यांच्या गाडीतून क्र. (के एल 51 एमएल 6567) राजस्थानला जात असताना पाचवड ता. कराड येथे सायंकाळी 5.45 वा सुमारास महामार्गलगत थांबले होते. यावेळी पाठीमागून आलेल्या गाडीने (क्र. एम एच 14 डीए 1444) त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की, या अपघातात दोन्ही गाड्या महामार्गावरून सेवा रस्त्याकडे फेकल्या गेल्या. मागून धडक दिलेल्या गाडीचा पुढचा हिस्सा पूर्णपणे उध्वस्त झाला तर धडक बसलेली गाडीही मागून पूर्णपणे मोडकळीस आली.

Satara

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment