Wednesday, December 31, 2025
Home Blog Page 349

नारायण मूर्तींकडून मोठी घोषणा ; इन्फोसिसचे कर्मचारी होणार मालामाल

Infosys

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयटीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हि बातमी महत्वाची ठरणार आहे . कॉर्पोरेट क्षेत्रातील नामांकित कंपनीपैकी इन्फोसिसने आपल्या कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये कर्मचाऱ्यांसाठी 90% सरासरी कामगिरी बोनस देण्याचा निर्णय घेतलेला आहे. तसेच हा बोनस नोव्हेंबर महिन्याच्या पगारासोबत दिला जाणार असल्यामुळे , कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कंपनीचे महत्वाचे पाऊल –

डिलिव्हरी आणि सेल्स यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामाला प्रोत्साहन देण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे. कंपनीने पात्र कर्मचाऱ्यांना ईमेल पाठवलेला असून , त्यामध्ये त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे. या मेलमध्ये तुमच्या मेहनतीमुळे आणि समर्पणामुळे आमचे उद्योगातील नेतृत्व आणखी मजबूत झाले आहे , असे लिहण्यात आले आहे.

कोणाला भेटणार बोनस –

हा बोनस E6 स्तरावरील आणि त्याखालील कर्मचाऱ्यांसाठी मिळणार असल्याचे , कंपनीने स्पष्ट केले आहे. E0 ते E2 यामध्ये फ्रेशर्सपासून तांत्रिक कर्मचारी येतात. तसेच E3 ते E6 मध्ये मध्यम स्तरावरील कर्मचाऱ्यांचा समावेश असतो . E7 आणि त्यापुढील वरिष्ठ स्तरावरील कर्मचाऱ्यांना हा बोनस लागू होणार नाही.

आर्थिक कामगिरीतील प्रगती –

इन्फोसिसने जुलै-सप्टेंबर 2024 या दुसऱ्या तिमाहीत मजबूत कामगिरी केली आहे. कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 4.7% वाढून 6506 कोटी रुपये पर्यंत पोहचला आहे. तसेच महसूल 5.1% ने वाढून 40986 कोटी रुपये झाला आहे. वित्तीय सेवा क्षेत्रातील वाढती मागणी आणि मोठ्या करारांमुळे कंपनीला हा फायदा झाला आहे. कंपनीच्या या फायद्यामध्ये कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा असल्यामुळे , इन्फोसिसचे सीईओ सलील पारेख यांनी निवडक कर्मचाऱ्यांसाठी जानेवारी 2025 पासून पगारवाढ लागू करण्याचे जाहीर केले आहे . हि पगारवाढ एप्रिल 2025 पासून सर्व कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे.

कंपनीची विश्वासार्हता –

इन्फोसिसच्या या निर्णयामुळे कर्मचारी संतुष्टी वाढण्याबरोबरच कंपनीची बाजारपेठेतील विश्वासार्हता टिकून राहणार आहे. कठोर मेहनत करणाऱ्या कर्मचाऱ्यांना योग्य प्रोत्साहन देण्याचा कंपनीचा हा चांगला प्रयत्न आहे.

इंडसइंड बँकेकडून गुंतवणूकदारांकरिता मोठे गिफ्ट ! FD वरील व्याजदरात वाढ

FD rate

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील प्रमुख खाजगी बँकांपैकी एक असलेल्या इंडसइंड बँकेने एफडीवरील व्याजदरात बदल केले आहेत. या बदलामुळे गुंतवणूकदारांना मोठे गिफ्ट मिळालेले आहे. त्यांनी 1 वर्ष 5 महिने ते 1 वर्ष 6 महिन्यांच्या कालावधीसाठी एक एफडी योजना सुरू केली आहे, ज्यामध्ये बँक सर्वाधिक व्याज दर ऑफर करत आहे. यामध्ये आपल्याला बँकेकडून आकर्षक व्याज दर मिळण्याची शक्यता आहे. या एफडीमध्ये गुंतवणूक करून आपल्याला लहान कालावधीत चांगला परतावा मिळू शकतो. जर तुम्ही देखील एफडीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर हि तुमच्यासाठी चांगली संधी ठरू शकते.

आरबीआय रेपो रेट कमी –

अनेक तज्ञांच्या मते आरबीआय रेपो रेट कमी करू शकते. हे दर कमी झाल्यास एफडीवरील व्याज दरही कमी होऊ शकतात. त्यामुळे आधीच एफडी करणे फायदेशीर ठरू शकते. यामुळे अधिक व्याज मिळवता येईल. बॅंकेने 3 कोटी रुपये पेक्षा कमी रकमेवरील एफडीसाठी ही सुधारणा केली आहे. बॅंक सामान्य ग्राहकांना 3.50% ते 7.75% पर्यंत व्याज देत आहे. तसेच सीनियर सिटीझन्ससाठी बॅंक जास्त 8.49% व्याजदर ऑफर करत आहे. सामान्य ग्राहकांपेक्षा सीनियर सिटीझन्सना 0.50% जास्त व्याज दिले जात आहे.

एफडीवरील व्याज दरात बदल –

इंडसइंड बॅंकेने आपल्या एफडीवरील व्याज दरात बदल केले असून, हे नवीन व्याज दर 26 नोव्हेंबर 2024 पासून लागू करण्यात आले आहेत. 7 ते 30 दिवसांच्या मुदतीतील एफडीवर 3.50% आणि 31 ते 45 दिवसांच्या मुदतीतील एफडीवर 3.75% व्याज दिले जात आहे. त्यानंतर 46 ते 60 दिवसांच्या एफडीवर 4.75%, 61 ते 90 दिवसांच्या एफडीवर 4.73% आणि 91 ते 120 दिवसांच्या एफडीवर 4.75% व्याज दर आहे. 121 ते 180 दिवसांच्या मुदतीतील एफडीवर 5%, तर 181 ते 210 दिवसांच्या मुदतीतील एफडीवर 5.85% व्याज दिले जात आहे. 270 ते 354 दिवसांच्या एफडीवर 6.35% आणि 355 ते 364 दिवसांच्या मुदतीवर 6.50% व्याज दिले जात आहे.

जास्त मुदतीच्या एफडीवर व्याज –

1 वर्ष 3 महिने ते 1 वर्ष 7 महिने मुदतीच्या एफडीवर 7.75% व्याज मिळते, तर 1 वर्ष 8 महिने ते 2 वर्षांपर्यंतच्या एफडीवर 7.99% व्याज दर आहे. 2 वर्षे 6 महिने ते 3 वर्षे 3 महिने मुदतीत 7.25% आणि 3 वर्षे 3 महिने ते 5 वर्षे 1 महिने मुदतीत 7.25% व्याज दर लागू आहे. तसेच, 5 वर्षांपेक्षा जास्त मुदतीच्या टॅक्स सेविंग एफडीवर 7.25% व्याज दिले जाते. त्यामुळे ग्राहकांसाठी उत्तम पर्याय ठरू शकतो.

शेअर बाजार धडाम ! सेन्सेक्स 1100 अंकांनी घसरला, 2.30 लाख कोटी रुपयांचे नुकसान

share market down

गुरुवारी शेअर बाजार कोसळला. सेन्सेक्स 1100 हून अधिक अंकांनी घसरला, तर निफ्टीही 350 हून अधिक अंकांनी घसरला. अमेरिका हे या घसरणीचे सर्वात मोठे कारण मानले जाते. अमेरिकेच्या काही निर्णयांचा थेट परिणाम शेअर बाजारावर दिसू लागला आहे. यात नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या शुल्काचाही समावेश आहे.

राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर ट्रम्प यांनी कॅनडा आणि मेक्सिकोसह चीनवर भारी शुल्क लादण्याबाबत बोलले आहे. दुसरीकडे, अमेरिकेत व्याजदर कपातीची शक्यता कमी आहे. त्यामुळे शेअर बाजारातही घसरण झाली आहे. सर्व BSE सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल 2.30 लाख कोटी रुपयांनी घसरून 443.40 लाख कोटी रुपयांवर आले आहे. दरम्यान, भय स्केल (इंडिया VIX) 4% वाढून 15.22 वर आला.

बाजारात किती झाली घसरण ?

गुरुवारी सेन्सेक्स 1,190.34 अंकांनी घसरल्यानंतर 79,043.74 अंकांवर बंद झाला. त्यात आज 1.48 टक्क्यांनी घट झाली. निफ्टी 360.75 अंकांनी घसरून 23,914.15 अंकांवर बंद झाला. 1.49 टक्क्यांची घसरण झाली.

आयटी शेअर्समध्ये प्रचंड घसरण

आयटी शेअर्स 4% पर्यंत घसरले आहेत. एलटीटीएस, इन्फोसिस, टेक महिंद्रा आणि एचसीएल टेक यांच्या नेतृत्वाखाली निफ्टी आयटी निर्देशांक 2.3% घसरला. इन्फोसिसचे समभाग 3 टक्क्यांनी घसरले. तर टीसीएसचे समभाग २.२ टक्क्यांनी घसरले. टेक महिंद्रा आणि एचसीएलचे शेअर्सही 2 टक्क्यांहून अधिक घसरले.

महत्वाची बातमी ! आता चालकासह सहप्रवाशाला सुद्धा हेल्मेटसक्ती ; वाहतूक विभागाचा आदेश

helmet

पुण्यात वाहन चालकांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. एवढंच नाही तर त्यामुळे ट्रॅफिक आणि गर्दी देखील रस्त्यांवर वाढलेली दिसत आहे शिवाय अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. विना हेल्मेट दुचाकी स्वार व सहप्रवासी यांचे अपघात व त्यामध्ये मृत्युमुखी तसेच जखमी होणाऱ्यांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्यामुळे एक महत्वपूर्ण निर्णय वाहतूक विभागाकडून घेण्यात आला आहे. आता केवळ दुचाकी चालवणाऱ्या चालकालाच नाही तर त्याच्याबरोबर असलेल्या सहप्रवाशाला देखील हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे विना हेल्मेट दुचाकी स्वार व सहप्रवासी असलेल्या दोघांवर कारवाई करण्याचे आदेश वाहतूक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालकांनी राज्यातील सर्व पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षकांना दिले आहेत.

विधानसभा निवडणुका नंतर त्वरित हा आदेश काढण्यात आला असून दुचाकी स्वरांना हेल्मेट सक्ती करण्याविषयी रोष व्यक्त केला जात आहे. आतापर्यंत केवळ विना हेल्मेट असलेल्या दुचाकी चालकांवर कारवाई करण्यात येत होती मात्र आता सहप्रवाशावर देखील कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी वाहतूक पोलिसांच्या ई चलन मशीन मध्ये सुद्धा बदल करण्यात आला आहे.

महासंचालकांनी याबाबत काढलेल्या पत्रात नमूद केलं आहे की, सध्या विना हेल्मेट वाहन चालकांवर सीसीटीव्ही मार्फत देखील कारवाई केली जात आहे पुणे शहरात दररोज अशाप्रकारे सुमारे 4000 चालकांवर कारवाई केली जाते मात्र त्यातून दंड देणाऱ्यांची संख्या कमी आहे.

सुमारे 10,000 वाहन चालकांवर कारवाई

एकट्या पुण्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास हेल्मेट विना दुचाकी चालवल्याप्रकरणी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने पुण्यातल्या सुमारे दहा हजार वाहन चालकांवर कारवाई केली आहे. यातून 44 लाख 57 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई आरटीओच्या वायू वेग पथकाने 1 एप्रिल ते 31 ऑक्टोबर 2024 दरम्यान केल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून सरकारी कार्यालयात दुचाकीवर येणाऱ्या वाहचालकांना हेल्मेट अनिवार्य केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे आरटीओच्या वायू वेग पथकाला ऑक्टोबर मध्ये 4165 वाहनांची तपासणी केली. त्यापैकी 2175 दुचालकांनी हेल्मेट घातले नसल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यातून सुमारे दहा लाख 29 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. हेल्मेट नसेल तर 500 रुपयांचा दंड आहे. विभागीय आयुक्त यांनी आदेश दिल्यानंतर आरटीओ प्रशासनाने हेल्मेट न घालता दुचाकीवरून सरकारी कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई करायला सुरुवात केली आहे. यासाठी चार पथक देखील तयार करण्यात आली आहेत

BSNL चा स्वस्तात मस्त रिचार्ज प्लॅन ! 200 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह अनलिमिटेड कॉलिंग

bsnl recharge

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । BSNL भारत संचार निगम लिमिटेडने ग्राहकांसाठी नवीन परवडेल असे रिचार्ज प्लॅन आणले आहेत. यामध्ये कमी बजेटमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा ऑफर्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच नेटवर्क कव्हरेज सुधारण्यासाठी BSNL 50000 नवीन 4G टॉवर बसवत आहे आणि पुढील वर्षी जूनपर्यंत 4G सेवा सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे. यांनी आताच्या 999 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये 200 दिवसांची व्हॅलिडिटी देण्याचे सांगितले आहे.

BSNL चा 999 रुपयांचा प्रीपेड प्लॅन –

BSNL च्या 999 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये 200 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. तसेच यामध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगचा फायदा दिला जातो, जे ग्राहक कॉलिंगसाठी चांगला पर्याय शोधत आहेत , त्यांच्यासाठी या पर्याय अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. पण तुम्हाला या प्लॅनमध्ये फ्री डेटा उपलब्ध नाही. BSNL आपल्या नेटवर्क कव्हरेजमध्ये सुधारणा करण्यासाठी 50000 नवीन 4G टॉवर उभारत आहे. त्यापैकी 41000 टॉवरचे काम सुरु आहे . कंपनीचे उद्दिष्ट आहे की उर्वरित टॉवर लवकरच उभारले जातील.

BSNL 5G परफास्ट इंटरनेट सेवा –

BSNL ने आपल्या 5G नेटवर्कची टेस्टिंग पूर्ण केली आहे. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी स्वतः या नेटवर्कचा वापर करून व्हिडिओ कॉल केला होता. यामुळे BSNLच्या सुपरफास्ट इंटरनेट सेवा लवकरच ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहेत. सिंधिया यांनी सांगितले की 5G लाँच करण्यात थोडा उशीर झाला असला तरी BSNL लवकरच उत्कृष्ट सेवा देणार आहे. त्यामुळे येत्या काळात BSNLचे हे नवीन प्लॅन्स आणि 4G किंवा 5G नेटवर्क सुधारणा ग्राहकांसाठी फायदेशीर ठरणार आहेत.

सरकारचा महत्वपूर्ण निर्णय ! सेंटिंग लावून बदली नाहीच, बँकांमध्ये नवीन ट्रान्सफर पॉलिसी

bank empoyee

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बँकांच्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण बातमी समोर येत आहे. केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या ट्रान्सफर पॉलिसीमध्ये मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आर्थिक मंत्रालयाने बँकांना बदली धोरणात अधिक पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने विविध सूचना दिल्या असून , आगामी 2025-26 वर्षापासून या नव्या धोरणाची अंमलबजावणी सुरू होणार आहे.

2025-26 पासून पॉलिसीची अंमलबजावणी –

2025-26 वर्षापासून ट्रान्सफर पॉलिसीची अंमलबजावणी होणार आहे. बँकांच्या प्रमुखांना दिलेल्या सूचनांमध्ये वित्तीय सेवा विभागाने बँकांना त्यांच्या ट्रान्सफर पॉलिसीमध्ये सुधारणा करण्यास सांगितले आहे. या सुधारित धोरणाचा हेतू बँकांच्या कामकाजात पारदर्शकता वाढविणे, तसेच एकसमान धोरण तयार करणे हा असून, संबंधित ट्रान्सफर पॉलिसी मंडळाच्या मान्यतेने लागू केली जाईल.

महिलांना विशेष लाभ –

नवीन धोरणात महिलांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे. वित्त मंत्रालयाने बँकांना महिला कर्मचाऱ्यांची बदली शक्यतो त्यांच्या जवळच्या ठिकाणी करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय ट्रान्सफर प्रक्रिया अधिक स्वयंचलित करण्याचे तसेच कर्मचाऱ्यांना स्थान निवडीसाठी ऑनलाइन सुविधा देण्याचे सूचित करण्यात आले आहे. त्यामुळे हा निर्णय महिलांसाठी फायदेशीर ठरणार आहे.

ट्रान्सफर प्रक्रिया अधिक सुलभ –

बँकांना सांगण्यात आले आहे कि , त्यांना वर्षाच्या मध्यात म्हणजेच जूनच्या आत ट्रान्सफर प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. फक्त बढती किंवा प्रशासकीय कारणास्तव आवश्यक असलेल्या ट्रान्सफरला वगळता, प्रत्येक वर्षी एकसमान वेळेत या प्रक्रियेचे नियमन करण्यात येईल. वित्त मंत्रालयाने या सुधारणांमुळे कर्मचार्‍यांची बदली प्रक्रिया अधिक पारदर्शक, न्याय्य आणि प्रभावी होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

खास ‘वंदे भारत’ ने करा भारतातल्या स्वर्गाची सैर ! कसा असेल रूट ? किती असेल तिकीट ? आली डिटेल माहिती समोर

shrinagar vande bharat

‘पृथ्वीवरचा स्वर्ग’ अशी ख्याती असलेल्या काश्मीरला खास वंदे भारत एक्सप्रेसने भेट देण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. खरेतर भारतीय रेल्वे काश्मीरसाठी विशेष वंदे भारत ट्रेन (दिल्ली ते श्रीनगर वंदे भारत) तयार करत आहे. ही ट्रेन श्रीनगर आणि नवी दिल्लीला जोडेल आणि उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंकवर धावेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी जानेवारी महिन्यात या वंदे भारताला हिरवा झेंडा दाखवू शकतात.

खास हीटिंग फीचर्स

ET च्या रिपोर्टनुसार, या वंदे भारतमध्ये खास हीटिंग फीचर्स असतील. ही ट्रेन खास अशा भागांसाठी तयार करण्यात आली आहे जिथे तापमान शून्य अंशापर्यंत पोहोचते. या गाड्यांमधील पाण्याच्या टाक्यांमध्ये सिलिकॉन हीटिंग पॅडची सुविधा असेल. याशिवाय, पाणी गोठण्यापासून रोखण्यासाठी प्लंबिंगसाठी सेल्फ-रेग्युलेटिंग हीटिंग केबलची सुविधा देखील असेल.

नवी दिल्ली-श्रीनगर वंदे भारत मार्ग

नवी दिल्ली-श्रीनगर वंदे भारत अंबाला कँट जंक्शन, लुधियाना जंक्शन, कठुआ, जम्मू तवी, श्री माता वैष्णो देवी कटरा, सांगलदान आणि बनिहालसह काही प्रमुख स्थानकांवर थांबेल. काश्मीरच्या उंच टेकड्या आणि जगातील सर्वात उंच पूल पार करून काश्मीरच्या सुंदर खोऱ्यात प्रवेश करणारी ही ट्रेन 800 किलोमीटरहून अधिक अंतर कापणार आहे.

नवी दिल्ली-श्रीनगर वंदे भारत भाडे

हा प्रवास 13 तासात पूर्ण होईल. प्रवाशी संध्याकाळी 7:00 वाजता दिल्लीच्या ट्रेनमध्ये चढतील आणि सकाळी 8:00 वाजता श्रीनगरला पोहोचतील. विशेष वंदे भारत मध्ये 3 श्रेणी असतील – AC प्रथम श्रेणी, AC 2 टियर आणि AC 3 टियर. त्याचे भाडे 2,000 ते 3,000 रुपये असू शकते.

चढ की उतार ? काय आहे आज सोन्याच्या दराची स्थिती ? चेक करा

gold rate

ऐन लग्नसराई सुरू झाली असताना सोन्याच्या दरामध्ये सतत चढ आणि उतार होताना दिसत आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याच्या दरामध्ये घसरण झालेली दिसून येत होती. त्यानंतर काल दिनांक 27 नोव्हेंबर रोजी सोन्याच्या दरामध्ये किंचित वाढ झाली होती आणि आज पुन्हा सोन्याच्या दरामध्ये घसरण झालेली दिसून येत आहे. आज चांदीचा दर स्थिर असल्याचे दिसून येत आहे. चला पाहूयात 22 आणि 24 कॅरेट सोना खरेदी करण्यासाठी आज किती रुपये मोजावे लागतील.

22 कॅरेट

आपल्याला माहितीच असेल की शुद्ध सोन्यामध्ये दागिने घडवले जात नाहीत ते घडवण्यासाठी 22, आणि 18 कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. आज 22 कॅरेट सोनं तुम्हाला खरेदी करायचं असेल तर त्यासाठी एक ग्रॅम करीता सात हजार 90 रुपये मोजावे लागतील. हाच दर काल 7105 रुपये इतका होता म्हणजेच आज 22 कॅरेट 1g सोन्याच्या दरामध्ये 15 रुपयांची घसरण झाली आहे. तर आज दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचा दर 70,900 रुपये इतका आहे. हाच दर काल 71 हजार 50 रुपये इतका होता. म्हणजेच आज दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याच्या दरामध्ये 150 रुपयांची घसरण झाली आहे.

24 कॅरेट

शुद्ध सोनं म्हणजेच 24 कॅरेट सोन्याच्या दराबद्दल सांगायचं झाल्यास आज 24 कॅरेट एक ग्रॅम सोन्याचा दर 7735 रुपये इतका आहे. हाच दर काल 751 रुपये इतका होता म्हणजेच आज एक ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दरामध्ये 16 रुपयांचे घसरण झाली आहे. तर दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 77,350 रुपये इतका आहे. हाच दरकाल 77,510 इतका होता. म्हणजेच आज दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दरामध्ये 160 रुपयांची घसरण झाली आहे.

आज चांदीच्या दराबद्दल सांगायचं झाल्यास दहा ग्रॅम चांदीचा आजचा भाव 895 इतका आहे. तर 100 g चांदीचा आजचा भाव 8950 रुपये इतका आहे. तर एक किलो चांदीचा आजचा भाव 89 हजार पाचशे रुपये इतका आहे.

मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्पासंदर्भात नवी Update ; मिळणार ‘या’ सुविधा

dhravi

मुंबईतील धारावी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून विधानसभा निवडणुकांमध्ये चांगलंच रणकंद झालेलं पाहायला मिळालं. त्यानंतर अनेक आश्वासनही दिली गेलेली पाहायला मिळाली मात्र आता याच संदर्भातली एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. त्यानुसार धारावी सर्वेक्षण वेगाने सुरू असून आतापर्यंत येथील 25000 झोपड्यांचं सर्वेक्षण पूर्ण करण्यात आल्याची माहिती आहे

धारावी पुनर्विकास प्रकल्प झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार रहिवाशांच्या पात्रता आणि अपात्रतेबद्दल अंतिम निर्णय घेण्यापूर्वी अजूनही मोठ्या प्रमाणात झोपड्यांचे सर्वेक्षण शिल्लक आहे. त्याला गती देण्यासाठी आणखी पथक लवकरच तैनात केली जाणार असल्याची ही माहिती दिली आहे.

दिवसाला 50 पेक्षा अधिक पथक कार्यरत

धारावीतील पाच सेक्टर आणि 34 झोन मध्ये सर्वेक्षणासाठी प्रत्येक दिवशी 50 पेक्षा अधिक पथक कार्यरत असल्याची माहिती देण्यात आली आहे. या पथकांद्वारे सरासरी 300 ते 400 झोपड्यांची गणना करून साधारण 200 ते 250 घरांची पडताळणी दररोज केली जात आहे दोन निवडणुका पावसाळ्यासारखी आणि आव्हाने असूनही यंदाच्या वर्षी मार्च महिन्याच्या मध्यापासून 25 हजार पेक्षा अधिक जोपर्यंत सर्वेक्षण पार पडलं आहे. 60 हजारांपेक्षा अधिक झोपड्यांची गणना करण्यात आली आहे. थोडक्यात धारावी पुनर्विकास प्रकल्पांना गती घेतल्याचे दिसून येत आहे रहिवाशांच्या सर्वेक्षणाचा काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

‘या’ महत्वाच्या टप्प्यांचा समावेश

या कामातला सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला टप्पा म्हणजे सर्वेक्षण. या कामाची सुरुवात जमीन शोधणाऱ्या पथकापासून सुरू होऊन त्यानंतर झोपड्यांच्या संख्येचे संकलन करण्यात येतं. यानंतर मग लाईडर मॅपिंग तंत्रज्ञानाचा वापर करत संपूर्ण क्षेत्राचा लेआउट चित्रित करण्यात येतो. आधारभूत नकाशा प्रमाणे झाल्यानंतर घरोघरी पडताळणी सुरू होते. प्रत्येक घराला कोड देण्यात येतो अशी माहिती प्राधिकरणाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान धारावी मध्ये 1 जानेवारी 2000 किंवा त्या आधी बांधलेल्या तळमजल्यावरील संरचना धारावी अधिसूचित क्षेत्रात त्याच जागी मोफत पुनर्वसनासाठी पात्र असतील. तर जानेवारी 2000 ते 1 जानेवारी 2011 दरम्यान बांधण्यात आलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत धारावी अधिसूचित क्षेत्राबाहेर 2.5 लाख रुपयांच्या किमतीत घर मिळेल. एवढेच नाही तर वरच्या मजल्यावरील इमारतींमधील रहिवासी जे एक जानेवारी 2011 किंवा 15 नोव्हेंबर 2022 दरम्यान धारावीत राहायला गेले त्यांना धारावी अधिसूचित क्षेत्राच्या बाहेर भाड्याच्या खरेदीच्या पर्यायासह भाड्याने राहण्याचा पर्याय दिला जाणार आहे.

नागरिकांना कोणत्या सुविधा मिळणार

धारावीच्या पुनर्वसनानंतर तिथं मोकळ्या जागा, रुंद रस्ते, शाळा, आरोग्य सुविधा, सार्वजनिक वाहतूक सुविधा आणि इतर सामाजिक सुविधा असलेल्या असून, रहिवाशांसाठी भाड्याची किंवा खरेदीची रक्कम सरकार निश्चित करेल. महत्त्वाची बाब म्हणजे रहिवाशांना पुनर्वसित इमारतींमध्ये 10 वर्षे देखभाल खर्च अर्थात मेंटनन्स नसेल. याशिवाय इथं 10 टक्के अतिरिक्त व्यावसायिक क्षेत्र मिळणार असून, ती भाडेतत्त्वावर देऊन त्या माध्यमातून सोसायटीला देखभाल मोफत करता येईल असा एकंदर आराखडा आहे.

खुशखबर ! मुंबई लोकलचा प्रवास होणार थंडगार आणि आरामदायी , प्रशासन मोठा निर्णय घेणार ?

mumbai local

मुंबईची लोकल म्हणजे मुंबईची जीवन वाहिनी आहे. अनेक कर्मचाऱ्यांना वेळेवर आपल्या इच्छित स्थानी पोहोचवण्यासाठी मुंबई लोकल धावत असते. मात्र हल्लीची परिस्थिती काहीशी बदललेली आहे. कारण लोकलला आता तुडुंब गर्दी असते. अगदी लोकलमध्ये चढताही येत नाही अशी परिस्थिती सध्याच्या लोकल मध्ये पाहायला मिळते. त्यामुळे अनेकांना आपला जीवही गमवायला लागलाय. मागच्या काही दिवसांपासून लोकल पकडताना अपघात घडल्याच्या घटना आहेत. मात्र आता मुंबईकरांना लोकलला लटकत जाण्याची वेळ येणार नाही. याच समस्येवर लवकरच तोडगा काढला जाण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर लवकरच मुंबई लोकलचा प्रवास हा थंडगार होणार आहे. कारण सर्व लोकल गाड्या एसी लोकलमध्ये रूपांतर करण्याची योजना सध्या चर्चेत आली आहे. याबाबत च वृत्त इंडिया टुडे यांनी दिले आहे.

लोकलचा प्रवास होणार थंडगार…

या वृत्तानुसार महाराष्ट्र सरकारकडून लवकरच लोकलचे रूपांतर एसी लोकलमध्ये करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास अधिक आरामदायी होणार आहे. उन्हाळ्याच्या दिवसात आधीच लोकलला असलेली गर्दी आणि उन्हाळ्यामुळे होणारी काहिली यामुळे प्रवाशांचा लोकलचा प्रवास हा अधिक त्रासदायक बनतो. मात्र आता एसी लोकल आला तर प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी होणार आहे.

… तर सुरक्षेचा प्रश्नही सुटेल

दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे एसी लोकल आल्यानंतर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्नही सुटणार आहे. गर्दीमुळे दरवाजात उभे राहिल्यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. धावत्या लोकल मधून होणारे प्रवाशांचे अपघात आणि मृत्यू हा प्रश्न गंभीर होत आहे. मात्र एसी लोकल मुळे हा प्रश्न सोडवता येऊ शकतो. AC लोकलचे दरवाजे बंद असतात त्यामुळे नागरिकांचा प्रवासही सुरक्षित व्हायला मदत होणार आहे.

दरम्यान मुंबई लोकल मधनं 7.5 लाख नागरिक दररोज प्रवास करत असतात. जगातल्या सर्वात जास्त व्यस्त असलेल्या उपनगरीय रेल्वेचं हे जाळ आहे. मुंबईतले लोकलचे जाळे ३९० किलोमीटर पर्यंत पसरलेले आहे. यात तीन प्रमुख मार्ग आहेत पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्ग या तीनही मार्गावर लोकल धावत असतात.