Wednesday, December 31, 2025
Home Blog Page 348

‘या’ दिवसापासून सुरु होणार पीक विमा अर्ज नोंदडणीला सुरुवात; ‘ही’ आहेत आवश्यक कागदपत्र

Pik Vima

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सरकारने देशातील नागरिकांसाठी विविध योजना आणलेल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी देखील सरकार अनेक योजना आणत असतात. त्यातीलच एक योजना म्हणजे पंतप्रधान पिक विमा योजना. या योजनेअंतर्गत तुम्हाला सरकारकडून विमा मिळत असतो. या योजनेअंतर्गत रब्बी पिकाचा विमा 1 डिसेंबर पासून अर्ज करण्यास सुरू होणार आहे. ही अर्ज प्रक्रिया 31 डिसेंबर पर्यंत तुम्हाला करावी लागणार आहे. यासाठी तुम्हाला अर्ज करून आवश्यक ती कागदपत्र देखील जोडावी लागणार आहे.

सरकारने 31 डिसेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख दिलेली आहे. परंतु प्रत्येक राज्यानुसार ही तारीख वेगळी असू शकते. यासाठी तुम्ही तुमच्या राज्यानुसार तारीख शोधा आणि पीक विम्याचा अर्ज करायला सुरुवात करा. याबाबतची माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिलेली आहे. शेतकऱ्यांना पीक विमा काढण्यासाठी व्हाट्सअप वर चॅट बोर्ड देखील तयार करण्यात आलेला आहे. त्यानुसार तुम्ही मोबाईलवर स्कॅन करून देखील संपूर्ण माहिती मिळू शकतात. तुम्ही सविस्तर माहितीसाठी पंतप्रधान पिक विमा योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता. किंवा 1447 या हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधून देखील विम्याची माहिती घेऊ शकता संपूर्ण देशात आहे.

कोणती कागदपत्रे लागतात ?

  • बँक खाते क्रमांक
  • आधार कार्ड
  • फिल्ड गोवर क्रमांक
  • शेअर पीक शेती असल्यास कराराची छायाप्रत
  • शिधापत्रिका मतदार
  • ओळखपत्र वाहन चालवण्याचा परवाना
  • शेतकऱ्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो
  • पीक पेरणी प्रमाणपत्र

मोबाईलचा कॅमेरा साफ करताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी; अन्यथा होईल मोठे नुकसान

Mobile Camera

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | स्मार्टफोन ही आता काळाची गरज झालेली आहे. आज काल प्रत्येक व्यक्तीकडे स्मार्टफोन असतो. परंतु स्मार्टफोन हा केवळ संवाद साधण्याचे साधन राहिलेले नसून आपल्या आयुष्यातील अनेक चांगल्या वाईट गोष्टींचे जतन या स्मार्टफोन मध्ये केले जाते. ज्याप्रमाणे मोबाईल द्वारे आपण मेसेजेस कॉलिंग करत असतो. त्याचप्रमाणे मोबाईलचा वापर हा चांगले फोटो काढण्यासाठी देखील होत असतो. त्यामुळे अनेक लोक मोबाईल घेताना सगळ्यात आधी मोबाईलचा कॅमेरा चेक करतात. कॅमेरा चांगला असेल तरच तो मोबाईल खरेदी करतात. परंतु या कॅमेरेच्या लेन्स वेळोवेळी स्वच्छ करणे, देखील आवश्यक असते. परंतु जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने कॅमेराच्या लेन्स साफ केल्या, तर कॅमेरा खराब होण्याची शक्यता असते. आता कॅमेरा साफ करताना कोणती काळजी घ्यावी, हे आपण जाणून घेणार आहोत.

योग्य कपडे वापरा

फोनचा कॅमेरा लेन्स अतिशय संवेदनशील आहे. ते स्वच्छ करण्यासाठी नेहमी मायक्रोफायबर कापड वापरा. हे केवळ लेन्स स्वच्छ करत नाही तर स्क्रॅचपासून संरक्षण देखील करते. कोणतेही खडबडीत कापड किंवा टिश्यू वापरू नका, कारण यामुळे लेन्स स्क्रॅच होऊ शकतात.

कॅमेऱ्याच्या लेन्सवर जास्त दबाव टाकू नका

साफ करताना लेन्स हलक्या हाताने स्वच्छ करा. जास्त दाब लावल्याने लेन्स फुटू शकते किंवा त्याच्या कोटिंगला नुकसान होऊ शकते.

लिक्विड क्लिनर वापरा

कॅमेरा लेन्स साफ करण्यासाठी बरेच लोक सामान्य पाणी किंवा कोणत्याही प्रकारचे द्रव वापरतात. हे लेन्ससाठी हानिकारक असू शकते. तुम्हाला लिक्विड क्लिनर वापरायचे असल्यास, फक्त इलेक्ट्रॉनिक उपकरण क्लीनर किंवा लेन्स क्लीनर वापरा.

बोटांनी लेन्सला स्पर्श करू नका

अनेक वेळा आपण नकळत आपल्या बोटांनी लेन्सला स्पर्श करतो. असे केल्याने, लेन्सवर तेल आणि धूळ जमा होऊ शकते, ज्यामुळे फोटोची गुणवत्ता खराब होते.

धूळ काढण्यासाठी ब्लोअर वापरा

लेन्सवर धूळ जमा झाली असेल तर ती साफ करण्यासाठी एअर ब्लोअर वापरा. उडवून स्वच्छ करण्याचा प्रयत्न करू नका, कारण यामुळे लेन्सवर ओलावा येऊ शकतो. तुमच्या फोनचा कॅमेरा साफ करताना या खबरदारीचे पालन करा, जेणेकरून तुमचा कॅमेरा दीर्घकाळ सुरक्षित आणि प्रभावी राहील. चांगला फोटो काढण्यासाठी कॅमेरा स्वच्छ आणि योग्य असणे अत्यंत आवश्यक आहे.

BSNL ने आणला 200 रुपयांचा स्वस्त प्लॅन; 3 महिने रिचार्जचे टेन्शन नाही

BSNL

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जुलै महिन्यामध्ये अनेक खाजगी कंपन्यांनी त्याच्या रिचार्जच्या दरात वाढ केलेली आहे. त्यानंतर त्यांचे ग्राहक नाराज झालेले आहेत. एअरटेलची, जिओ तसेच वोडाफोन आयडिया या कंपन्यांनी त्यांच्या रिचार्जच्या दरात वाढ केली. त्यामुळे अनेक ग्राहक BSNL कडे वळालेले आहेत. बीएसएनएल देखील त्यांच्या नवीन आलेल्या ग्राहकांना टिकवून ठेवण्यासाठी आणि नवनवीन सुविधा देण्यासाठी नेहमीच तत्पर असते. अशातच आता बीएसएनएलने अगदी स्वस्त दरात एक नवीन प्लॅन ऑफर केलेला आहे. या प्लॅनची वैधता 90 दिवसांची असणार आहे. म्हणजेच 3 महिन्यांसाठी हा रिचार्ज प्लॅन असणार आहे. आता या रिचार्जच्या प्लॅन बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

बीएसएनएलने त्यांच्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आणलेली आहे. अगदी स्वस्त किमतीमध्ये एक नवीन रिचार्ज प्लॅन लॉन्च केलेला आहे. या रिचार्ज प्लॅनची किंमत केवळ 200 रुपये आहे. आणि तुम्हाला 90 दिवसांची व्हॅलिडीटी मिळणार आहे. म्हणजे एकदा रिचार्ज केल्यावर तीन महिने तुम्हाला रिचार्जचे टेन्शन असणार नाही. ग्राहकांसाठी 201 रुपयांचा हा रिचार्ज प्लॅन अत्यंत उपयुक्त आहे.

इतर टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या रिचार्जच्या दरात वाढ केल्यामुळे बीएसएनएलच्या ग्राहकांसाठी महागाईच्या काळात हा दिलासा देणारा रिचार्ज प्लॅन असणार आहे. परंतु यामध्ये तुम्हाला इंटरनेटची सुविधा मिळणार नाही. तुम्ही फक्त कॉलिंगसाठी रिचार्ज करत असाल, तर हा रिचार्ज तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरेल. यामध्ये तुम्हाला 90 दिवसांची वैद्यता मिळणार आहे.

कोणत्या सुविधा मिळणार ?

बीएसएनएलच्या या 201 रुपयाच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 300 मिनिटे मोफत कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. म्हणजेच तीन महिन्यात तुम्ही 5 तास मोफत बोलू शकणार आहात. तसेच बीएसएनएलच्या इतर कोणत्याही नेटवर्कसोबत तुम्हाला मोफत कॉलिंगचा लाभ मिळणार आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला इंटरनेट डेटा देखील असणार आहे. तुम्हाला 3 महिन्यासाठी 6 जीबी डेटा प्रदान केला जाणार आहे. तसेच 99 मोफत एसएमएसची सुविधा देखील यामध्ये आहे.

जर तुम्हाला जास्त रिचार्ज प्लॅनची गरज नसेल, तर हा प्लॅन तुमच्यासाठी अत्यंत चांगला आहे. 90 दिवसांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला चांगली सुविधा मिळेल. तसेच तुम्ही बीएसएनएलचा 499 चा रिचार्ज करू शकता. या प्लॅनची वैद्यता देखील 90 दिवसांची आहे. यामध्ये तुम्हाला अमर्यादित मोफत कॉलिंगचा सुविधा मिळते. तसेच 300 मोफत एसएमएसची सुविधा देखील यामध्ये मिळणार आहे.

देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन धावण्यासाठी सज्ज ! ‘या’ राज्यात घेतली जाणार ट्रायल रन

Hydrogen train

देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन तयार आहे. भारतीय रेल्वे डिसेंबर 2024 मध्ये पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. पर्यावरणपूरक प्रवासाच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे. RDSO ने हायड्रोजन ट्रेनचे पहिले छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. आरडीएसओचे संचालक उदय बोरवणकर यांनी सांगितले की, ही ट्रेन उत्तर रेल्वे क्षेत्रांतर्गत हरियाणाच्या जिंद-सोनीपत सेक्शनवर धावणार आहे. त्यात 8 डबे असतील. ताशी 110 किमी वेगाने धावेल.

खरं तर, भारतातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनच्या विकासाने देशातील रेल्वे वाहतुकीत एक मोठा तांत्रिक टप्पा गाठला आहे. या प्रकल्पाची रचना RDSO (रिसर्च डिझाइन्स अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन) द्वारे केली गेली आहे आणि IFC, चेन्नईमध्ये समाकलित केली गेली आहे. या ट्रेनसाठी 2,800 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. हायड्रोजन ट्रेनमुळे डिझेल इंजिनपेक्षा कमी प्रदूषण होते.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन तयार आहे. त्याची ट्रायलही झाली असून लवकरच ती सर्वसामान्य प्रवाशांसाठी चालवली जाईल. हायड्रोजन ट्रेनचे पहिले चित्र आरडीएसओने जारी केले आहे, वास्तविक, चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये या ट्रेनची रचना आरडीएसओनेच केली आहे.

अंतर्गत तांत्रिक रचना कशी असेल?

हायड्रोजन ट्रेनमध्ये हायड्रोजनसाठी कंपार्टमेंट्स असतील आणि त्याचे इंधनात रूपांतर करण्यासाठी 4 बॅटरी देखील असतील. विशेष बाब म्हणजे जगातील अनेक देशांमध्ये हायड्रोजन इंधन हे रस्ते वाहतुकीत यशस्वी आहे, परंतु रेल्वे वाहतुकीत त्याचा यशस्वी वापर झालेला नाही. हायड्रोजन ट्रेनची अंतर्गत तांत्रिक रचना ड्रायव्हरच्या डेस्कच्या मागे कंट्रोल पॅनेल असेल आणि त्यामागे 210 किलोवॅट बॅटरी असेल, त्यामागे एक इंधन सेल असेल, त्यानंतर हायड्रोजन सिलेंडर कॅस्केड-1, 2 आणि 3 असेल. यानंतर पुन्हा इंधन विक्री होणार आहे. आणि शेवटी आणखी 120 किलो वॅटची बॅटरी बसवली जाईल.

हायड्रोजन ट्रेनची प्रमुख वैशिष्ट्ये

पहिली हायड्रोजन ट्रेन हरियाणातील जिंद ते सोनीपत दरम्यान धावणार आहे. डिसेंबर 2024 पर्यंत ट्रेन सुरू करण्याची योजना आहे. ही ट्रेन ताशी 110 किमी वेगाने धावेल. त्यात एकूण 8 डबे असतील. आम्ही तुम्हाला सांगतो की हायड्रोजन ट्रेन डिझेल आणि इतर जीवाश्म इंधनावर चालणाऱ्या ट्रेनच्या तुलनेत प्रदूषण कमी करण्यास सक्षम आहे, कारण तिचे उत्सर्जन फक्त पाणी आणि उष्णता असते. त्याची रचना लखनौ येथील आरडीएसओ संस्थेत करण्यात आली आहे. तर, IFC चेन्नई येथे उत्पादन आणि एकत्रीकरण झाले आहे.

भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन

आतापर्यंत, हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या गाड्या फक्त जर्मनी, स्वित्झर्लंड आणि चीनमध्ये बनवल्या गेल्या आहेत, परंतु कोठेही ते मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाले नाहीत. ही ट्रेन फक्त जर्मनीत धावत असून तिला फक्त 2 डबे आहेत. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, मोठी गोष्ट म्हणजे आम्हाला या तंत्रज्ञानावर प्रभुत्व मिळवायचे आहे, कारण आतापर्यंत जगात कुठेही याचा वापर मोठ्या प्रमाणावर झालेला नाही. जर्मनी, स्वित्झर्लंड आणि चीनने प्रयत्न केले पण त्या पातळीवर यश आले नाही. इतर देश 1000 अश्वशक्तीवर गेले आहेत तर आम्ही 1200hp वर काम करत आहोत. देशातील बोटी, टग बोट आणि ट्रकमध्येही त्याचा वापर व्हावा, अशी आमची इच्छा आहे.

आरडीएसओने या ट्रेनला नमो ग्रीन रेल असे नाव दिले आहे. मात्र, नावाबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, “हायड्रोजन ट्रेनसाठी अद्याप कोणतेही नाव दिलेले नाही. ही ट्रेन जानेवारी किंवा मार्चमध्ये धावेल की नाही हे आम्ही सांगू शकत नाही, तेव्हाच नाव ठेवण्यात येईल.

आत्मनिर्भर भारत अभियानाला चालना

या ट्रेनमुळे कार्बन उत्सर्जन मोठ्या प्रमाणात कमी होईल, ज्यामुळे हरित आणि शाश्वत वाहतुकीला चालना मिळेल. भारताच्या रेल्वे व्यवस्थेचे आधुनिकीकरण आणि स्वावलंबी भारत मोहिमेमध्ये हे महत्त्वपूर्ण योगदान देईल. असो, हायड्रोजनकडे भविष्यातील ऊर्जा म्हणून पाहिले जात आहे. ही ट्रेन भारतातील हायड्रोजन-आधारित वाहतूक व्यवस्थेला प्रोत्साहन देईल.

‘या’ महिलांना मिळणार नाही लाडकी बहीण योजेनचा लाभ; जाणून घ्या सविस्तर माहिती

Ladaki Bahin Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महायुती सरकारने महिलांसाठी आणलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरलेली आहे. विधानसभा निवडणुकीआधीच माहिती सरकारने ही योजना चालू केली. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये देखील दिलेले आहे. आतापर्यंत या योजनेचे 5 हप्ते महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत. जुलै महिन्यामध्ये सरकारने या योजनेची घोषणा केली. आणि तेव्हापासूनच दर महिन्याला महिलांच्या खातात पैसे आलेले आहेत. आचारसंहिताच्या काळातच महिलांना पैसे देण्यात येत नव्हते. म्हणूनच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे महिलांना आधीच दिले होते. आता लवकरच लाडकी बहीण योजनेचा 6 वा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. डिसेंबर महिन्यात हा हप्ता येणार असल्याची माहिती हाती आलेली आहे. परंतु या योजनेअंतर्गत काही महिलांना पैसे मिळणार नाही, अशी देखील माहिती समोर येत आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीचा अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 ऑक्टोबर होती. त्यानंतर आचार संहिता लागू झाली. या काळातील ज्या महिलांनी अर्ज केलेला आहे. त्यांच्या अर्जाची छाननी पुन्हा एकदा सुरू झालेली आहे. जर त्यांच्या अर्जात काही त्रुटी आल्या तर त्यांना पुढचा हप्ता मिळणार नाही. अशी माहिती देण्यात आलेली आहे. महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीआधीच महायुती सरकार जर पुन्हा आले तर महिलांना 1500 ऐवजी 2100 देणार असल्याची माहिती दिली होती. त्यामुळे आता महिलांना नक्की कधीपासून 2100 रुपये मिळणार आहे याची माहिती समोर आलेली नाही.

कोणत्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही

  • ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न हे 2.4 लाख हा पेक्षा जास्त आहे. त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • ज्या महिलांच्या कुटुंबातील व्यक्ती कर भरतो त्या महिलांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • ज्या महिला सरकारी विभागात काम करतात किंवा ज्यांना पेन्शन मिळते. त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • तसेच महिलांच्या कुटुंबातील सदस्य हे आमदार किंवा खासदार असतील, तरी देखील त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

अशाप्रकारे टाळता येईल गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग; वाचा सविस्तर

Cervicle Cancer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज काल गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग घेण्याची समस्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. भारतामध्ये देखील अनेक स्त्रियांमध्ये हा कर्करोग उभारी घेताना दिसत आहे. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासाठी एक लस देखील उपलब्ध आहे. HPV नावाची ही लस आहे. मुलींना तरुण वयात किंवा लग्न होण्यापूर्वी देणे गरजेचे असते. परंतु अविवाहित मुलींना ही लस देण्याबद्दल त्यांच्या आई-वडिलांच्या मनात अनेक संभ्रम निर्माण झालेला असतो. त्यामुळे ही लस्सी घेऊ देत नाही. परंतु ही लस देणे खूप गरजेचे आहे. गर्भाशयाचा मुखाचा कर्करोग हा ह्यूमन डीपीलोमा या विषाणूच्या संसर्गामुळे होत असतो. या विषाणूचे संक्रमण शारीरिक संबंध आल्यानंतर होत असते. त्यामुळे गर्भाशयाच्या मुखात कर्करोग होण्याची शक्यता असते.

या विषाणूची लागण झाल्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती कमी होते. तसेच हा विषाणू अनेक दिवस आपल्या शरीरात राहतो. या HPV लसीकरणाचे वय हे मुलीच्या दहा वर्षापासून ते 45 वर्षापर्यंत असते. तसेच 12 ते 16 वर्षाच्या कालावधीत ही लस दिली, तर त्याचा चांगला फायदा होतो. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होऊ नये किंवा प्रतिबंधित व्हावा. यासाठी HPV लस मुलींना किशोरवयात देणे किंवा लग्नानंतर शारीरिक संबंध पूर्वी देणे गरजेचे आहे. ही लस तुम्हाला इंजेक्शनच्या रूपात दिली जाते.

या लसीचा पहिला डोस दिल्यानंतर दुसरा डोस एक महिन्यानंतर दिला जातो. तर सहा महिन्यानंतर तिसरा डोस दिला जातो. जर तुमच्या मुलीचे वय 15 वर्षापेक्षा कमी असेल, तर दोन डोस देखील पुरे होतात. ज्या मुलींचे वय 26 वर्षापेक्षा कमी आहे. त्यांनी हे लसीकरण करणे गरजेचे आहे. गर्भवती महिलेने ही लस घेऊ नये, तसेच तुम्ही गर्भधारणेचे नियोजन करत असाल तरी ही लस घेऊ नये. तसेच एखादी स्त्री जर आजारी असेल तरी देखील ही लस घेऊ नये. परंतु जर ही लस घेण्याआधी तुमच्या शरीरामध्ये त्या विषाणूचे संक्रमण झाले असेल, तर त्यावर उपचार म्हणून या लसीचा उपयोग होत नाही. ही लस घेतल्यानंतर महिलांच्या अंगाला खाज येते. चक्कर येते अशी अनेक लक्षणे दिसतात. त्यामुळे ही लस घेतल्यानंतर 15 मिनिटे त्या मुलीने किंवा स्त्रीने दवाखान्याबाहेर जाऊ नये.

रोगाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. अनेक महिलांचा यामुळे मृत्यू देखील झालेला आहे. तरी देखील या गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे गंभीर गांभीर्य लोकांच्या लक्षात येत नाही. यावर उपलब्ध असून देखील प्रतिबंधात्मक लस घेण्यात अनेक महिला नकार देतात. परंतु भविष्यात जाऊन त्यांना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाला सामोरे जावे लागते.

2 बँकांमध्ये खाती असतील तर भरावा लागणार दंड? जाणून घ्या RBI चा नवीन नियम

RBI Rule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय रिझर्व बँकेने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. गव्हर्नर शशिकांत दास यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आरबीआयच्या माध्यमातून गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक बँकांवर कठोर कारवाई केलेली आहे. आणि त्यांना थंड देखील ठोठावला आहे. परंतु आता काही बँकांचे थेट लायसन्स रद्द करण्याचा मोठा निर्णय आरबीआयने घेतलेला आहे. यामध्ये देशातील दोन मोठ्या वित्तीय संस्थांचे लायसन देखील रद्द झालेले आहे.

तसेच तीन सहकारी बँकांवर आरबीआयकडून दंडात्मक कारवाई देखील केली गेलेली आहे. त्यामुळे बँकेत आणि वित्तीय संस्थांमध्ये सध्या भीतीचे वातावरण तयार झालेले आहे. आजकाल बँकिंगची सुविधा मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. अगदी खेड्यात पाड्यात देखील बँक ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. यामुळे पैशांचे व्यवहार करणे सोपे झाले आहे. नेट बँकिंगच्या माध्यमातून तसेच यूपीआयच्या माध्यमातून पैशाचे अनेक व्यवहार झालेले आहेत. कॅशलेस इकॉनोमीला देखील सुरुवात झालेली आहे.

परंतु जर काही लोकांनी व्यक्तीचे दोन बँक अकाउंट असते. तर त्याला दंड भरावा लागणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सोशल मीडियावर देखील याबाबत एक पोस्ट व्हायरल झाली होती.यामध्ये जर दोन बँक अकाउंट असतील तर ग्राहकांना दहा हजार रुपयांचा दंड भरावा लागू शकते, असे म्हटले जात होते. परंतु या व्हायरल व्हिडिओ मागची नक्की सत्यता काय आहे? हे आज आपण जाणून घेणार आहोत.

तुमच्या बँक अकाउंटमध्ये जर संशयास्पद व्यवहार अजून आले, तर आरबीआयच्या माध्यमातून तुमच्या बँक अकाउंटची चांगली कसून चौकशी होणार आहे. आणि जर यात काही तफावत आढळली, तर तुम्हाला कारवाई देखील होणार आहे. जर काही संशयास्पद व्यवहार असतील, तर तुमच्यावर दंडात्मक कारवाई होणार आहे. परंतु आरबीआयच्या नव्या नियमांमध्ये जर तुमचे दोन बँक अकाउंट असतील, तर ते अजिबात बेकायदेशीर नाही. तुमचे तर एकापेक्षा जास्त बँक अकाउंट असतील तर तुम्हाला कोणताही दंड भरावा लागणार नाही.

जमिनीच्या गैर व्यवहाराला बसणार आळा; ऍग्रीस्टॅक योजनेचा शेतकऱ्यांना होणार फायदा

Agristack Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शेतकऱ्यांसाठी तसेच कृषी क्षेत्रासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक विविध योजना राबविण्यात आलेल्या आहेत. शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हावा यासाठी सरकारकडून या योजना राबवण्यात येतात. अशातच आता शेतकऱ्यांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आणखी एक महत्त्वपूर्ण योजनेची अंमलबजावणी केंद्र सरकारकडून करण्यात आलेली आहे. या योजनांच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात पायाभूत सुविधांचा विकास व्हावा, तसेच शेतकऱ्याचे उत्पन्न वाढावे हे सरकारचे मुख्य उद्दिष्ट आहे. आणि त्या दृष्टिकोनातूनच या योजना आणल्या जातात.

आजकाल कृषी क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाचा वापर देखील मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे अनेक गोष्टी सोप्या आणि सोयीस्कर झालेल्या आहेत. आता याच कृषी क्षेत्राच्या संदर्भात डिजिटलायझेशन वाढावे. यासाठी सरकारने एक नवीन योजना आणलेली आहे. या योजनेचे नाव अग्री स्टॅक योजना अशी आहे. ही योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची माहिती डिजिटल पद्धतीने उपलब्ध होणार आहे. शेतातील पीक, गाव आणि शेतीचे नकाशे आता डिजिटल पद्धतीने तयार केले जाणार आहेत.

या योजनेच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांच्या शेताची रजिस्ट्री हंगामातील पिकांची माहिती या सगळ्याची माहिती डिजिटल पद्धतीने एकत्र केली जाणार आहे. सरकारच्या या योजनेमुळे आता शेतकऱ्यांची होणारी फसवणूक देखील बंद होणार आहे. कारण अनेक वेळा आपली जमीन इतर कोणाच्या तरी नावावर आहे, असा दावा करून ते आपली जमीन बळकावून घेतात. परंतु आता तुमची संपूर्ण माहिती डिजिटल पद्धतीने उपलब्ध असल्याने ही फसवणूक होणार नाही. येत्या 15 डिसेंबर पासून प्रत्येक गावात जाऊन ही ऍग्री स्टॅक योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

ही योजना भूमी अभिलेख विभाग कृषी विभागाच्या मदतीने राबवणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांची ओळखपत्र तयार केले जाणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे नाव त्यांच्याशी जमिनीची माहिती आणि आधार क्रमांक संलग्न केला जाणार आहे. या योजनेच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांची संख्या किती आहे? त्यांच्याकडे जमीन किती आहे? या सगळ्यांची माहिती डिजिटल पद्धतीने उपलब्ध केली जाणार आहे.

या सरकारच्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. तो म्हणजे आता शेतकरी जमिनीचा मालक असल्याची ओळख डिजिटल पद्धतीने सरकारला पटवून दिली जाणार आहे. तसेच जमिनीचा मालक तोच शेतकरी असल्याची खात्री येतात तलाठी कोतवालाकडून देखील केली जाणार आहे. या शेतीशी संबंधित सगळ्या गोष्टीची शेतकऱ्यांचा आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक देखील जोडला जाणार आहे. तसेच खरेदी विक्रीबाबत ज्या शेतकऱ्याच्या नावावर जमीन आहे. त्याच्या परवानगीशिवाय काहीही केले जाणार नाही. यामुळे गैर व्यवहाराला आळा बसणार आहे.

महायुतीने मंत्रिमंडळाचा फॉर्मुला केला सेट; या पक्षाला मिळणार सर्वाधिक मंत्रीपदे

Mahayuti

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यांमध्ये या विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला सगळ्यात जास्त मत मिळाल्याने महायुती विजयी ठरलेली आहे. अशातच आता राज्यात भाजपचा मुख्यमंत्री होणार असल्याची माहिती देखील समोर झालेली आहे. परंतु यामध्ये महायुतीने सत्ता वाटपाचा त्यांचा फॉर्म्युला देखील निश्चित केलेला आहे. या सत्ता वाटपामध्ये भाजपला सर्वात जास्त मंत्री पद दिली जाणार आहे. यामध्ये भाजपला 20 ते 22 मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. तसेच शिवसेनेला 12 मंत्रीपद मिळणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या 8 ते 10 जणांनी मंत्रिमंडळात जागा भेटू शकते. परंतु भाजपसहित इतर पक्षांनी त्यांच्या मंत्रिमंडळात तरुण आमदारांना संधी द्यावी, असा सल्ला देखील भाजपचे श्रेष्ठीकडून देण्यात आलेला आहे. 2 डिसेंबर रोजी वानखेडे स्टेडियमवर नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडणार आहे. अशी माहिती देखील हाती आलेली आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार या मंत्रिमंडळात गृहखाते हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असू शकते. तर अर्थ खाते हे अजित पवारांकडे असू शकते. विधानसभा निवडणुका पार पडून निकाल देखील लागलेला आहे. परंतु अजूनही नवीन मंत्रिमंडळाची पूर्ण प्रक्रिया पार पडलेली नाही. याचवेळी एकनाथ शिंदे, भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतलेली आहे. पक्षांचे खाते वाटप हा या चर्चेचा मुख्य मुद्दा होता.

यावर्षीच्या महाराष्ट्रातील मंत्रिमंडळात जास्तीत जास्त 13 जणांना संधी मिळणार आहे. तर भाजपला सर्वाधिक मंत्री मिळणार असल्याची माहिती हाती आलेली आहे. भाजपला जवळपास 20 ते 22 मंत्री पदे मिळू शकतात. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यात मुख्यमंत्री कोण? तसेच दोन उपमुख्यमंत्री असतील का? असा प्रश्न संपूर्ण जनतेसमोर पडलेला आहे. परंतु एकनाथ शिंदे लगेच उपमुख्यमंत्री बनण्यासाठी उत्सुक नसल्याचे सांगण्यात आलेले आहे. यामध्ये शिवसेना गटाचे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्री पद किंवा गृहमंत्री पद मिळाले अशी मागणी देखील शिंदे गटाकडून करण्यात आलेली आहे.

व्हाट्सअँपचे ब्रॉडकास्ट फीचर ; एकाच वेळी तब्बल 256 जणांना मॅसेज पाठवता येणार

broadcast feature

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । व्हाट्सअँप हे अँप जगप्रसिद्ध प्लँटफॉर्म असून , कोट्यवधी लोक याच्याशी जोडलेले आहेत. या प्लॅटफॉर्मचा वापर अनेकजण करत असले तरी , बऱ्याच लोकांना यामधील छुप्या फीचर्सबदल काही कल्पना नसते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला व्हाट्सअँपमधील असा फीचर्स सांगणार आहोत , ज्यामुळे तुम्ही एकाच वेळी तब्बल 256 जणांना मॅसेज पाठवू शकता. तर चला व्हाटसअँपमधील ब्रॉडकास्ट लिस्ट फिचर बदल माहिती पाहुयात.

ब्रॉडकास्ट फीचर अनेक फायदे –

व्हॉट्सअ‍ॅपवरील ब्रॉडकास्ट फीचरचे अनेक फायदे आहेत . व्हाटसअँपमधील ब्रॉडकास्ट लिस्ट फीचर्सचा वापर करून तुम्ही एकाच वेळी तब्बल 256 जणांना मॅसेज पाठवू शकता. तसेच यासाठी तुम्हाला कोणताही ग्रुप बनवण्याची गरज भासणार नाही . ज्यामुळे सदस्यांना नको असलेले मॅसेज टाळता येतील. या फीचरचा वापर केल्यावर, प्रत्येकाला वैयक्तिक मेसेजसारखा अनुभव मिळतो, कारण तुमचा मॅसेज प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्रपणे पोहोचतो. यामुळे तुमचा वेळही वाचतो, कारण एकाच वेळी अनेक लोकांपर्यंत मॅसेज पोहोचवता येतो. याचे महत्वाचे वैशिष्ट असे आहे कि , ब्रॉडकास्ट मेसेज फक्त त्या व्यक्तींना मिळतो ज्यांनी तुमचा नंबर त्यांच्या फोनबुकमध्ये सेव्ह केला आहे. त्यामुळे तुमचे कॉन्टॅक्ट अपडेटेड ठेवणे आवश्यक आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या या सोयीस्कर फीचरचा वापर करून तुम्ही तुमचा वेळ वाचवू शकता आणि अधिक लोकांपर्यंत सहजपणे तुमचा मॅसेज पोहोचवू शकता

ब्रॉडकास्ट लिस्ट कशी तयार करायची –

WhatsApp वर ब्रॉडकास्ट लिस्ट तयार करणे एक सोपी पद्धत आहे, ज्याद्वारे तुम्ही एकाच वेळी अनेक लोकांना मॅसेज पाठवू शकता. यासाठी प्रथम तुमच्या स्मार्टफोनवर WhatsApp अँप ओपन करा. त्यानंतर मेनू (तीन डॉट्स) वर टॅप करा आणि New Broadcast या पर्यायावर क्लिक करा. हि प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या संपर्कांच्या यादीमधून 256 नंबर्स निवडण्याची सुविधा मिळते. एकदा सर्व नंबर निवडल्यानंतर तुम्ही ब्रॉडकास्ट लिस्टला नाव देऊ शकता. लिस्ट तयार झाल्यावर तुम्ही तुमचा मॅसेज टाईप करून तो लिस्टमधील सर्व सदस्यांना एकाच वेळी पाठवू शकता. यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळे मॅसेज पाठवण्याची आवश्यकता भासणार नाही आणि सर्वांना एकाच वेळी एकसारखा मॅसेज मिळवता येतो