Sunday, December 28, 2025
Home Blog Page 399

Motorola Edge 50 Pro ची किंमत सर्रर्रकन घसरली ! 12 हजारांनी कमी झाली किंमत ; खरेदीची उत्तम संधी

Motorola Edge 50 Pro

दिवाळीच्या निमित्ताने तुम्हाला जर नवीन स्मार्टफोन विकत घ्यायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे, कारण सध्याच्या टॉप मोबाइलसा मधील एक असलेला Motorola Edge 50 Pro कमी किंमतीत विकत घेण्याची सुवर्ण संधी Flipkart घेऊन आला आहे.या स्वस्त आणि परवडणाऱ्या स्मार्टफोनमुळे कंपनीने सॅमसंग, वनप्लस, विवो यांना टक्कर दिली आ. हे बिग दिवाळी सेल ऑफरमध्ये फ्लिपकार्ट स्मार्टफोन्सवर मोठ्या प्रमाणात सूट देत आहे. फ्लिपकार्ट सेलमध्ये Motorola Edge 50 Pro च्या किमतीत मोठी कपात करण्यात आली आहे.

Motorola Edge 50 Pro हा फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे. हे हेवी टास्क वापरणारे असोत, फोटोग्राफी करणारे असोत किंवा सेल्फी प्रेमी असोत, हा फोन सर्व प्रकारच्या लोकांसाठी योग्य स्मार्टफोन आहे. यामध्ये कंपनीने 50 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. Motorola Edge 50 Pro च्या 256GB वेरिएंटची किंमत 40 हजार रुपयांपेक्षा जास्त असली तरी डिस्काउंट ऑफरमध्ये तुम्ही 30 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता.

दिवाळीपूर्वी फ्लिपकार्टची बंपर ऑफर

Motorola Edge 50 Pro सध्या Flipkart वर 41,999 रुपयांच्या किंमतीला सूचीबद्ध आहे. मात्र, सध्या ग्राहकांना त्यावर २८ टक्के सूट दिली जात आहे. सवलतीसह, तुम्ही ते सणासुदीच्या काळात केवळ 29,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. याचा अर्थ, तुम्ही Motorola Edge 50 Pro च्या खरेदीवर थेट 12,000 रुपये वाचवू शकता.

जर तुम्हाला जास्त बचत करायची असेल तर तुम्ही बँक आणि एक्सचेंज ऑफरचाही लाभ घेऊ शकता. Flipkart ग्राहकांना Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डवर 5% ची एक्सचेंज ऑफर देत आहे. याशिवाय, तुम्हाला SBI क्रेडिट कार्ड व्यवहारांवर 1250 रुपयांपर्यंत सूट मिळेल. जर तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज केला तर तुम्ही 20 हजार रुपयांपेक्षा जास्त बचत करू शकता. तथापि, तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की तुम्हाला किती एक्सचेंज व्हॅल्यू मिळेल हे तुमच्या जुन्या स्मार्टफोनच्या कार्यरत आणि शारीरिक स्थितीवर अवलंबून असेल.

Motorola Edge 50 Pro ची वैशिष्ट्ये

कंपनीने यावर्षी Motorola Edge 50 Pro लॉन्च केला आहे. यामध्ये तुम्हाला आयफोनप्रमाणे ॲल्युमिनियम फ्रेमसह ग्लास बॅक पॅनल मिळेल. यामध्ये तुम्हाला IP68 रेटिंग देण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शनसह 6.7-इंचाचा डिस्प्ले आहे. आउट ऑफ द बॉक्स हा स्मार्टफोन Android 14 वर चालतो.

परफॉर्मन्ससाठी मोटोरोलाने यात स्नॅपड्रॅगन 7 Gen 3 प्रोसेसर दिला आहे. यामध्ये तुम्हाला 12GB रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेज मिळेल. फोटोग्राफीसाठी, याच्या मागील पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये 50+10+13 मेगापिक्सेल सेन्सर आहे. तुम्हाला प्राइमरी कॅमेऱ्यात OIS चे फीचर देखील मिळेल. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 50 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

स्मार्टफोनला उर्जा देण्यासाठी, यात 4500mAh बॅटरी देण्यात आली आहे जी 125W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा स्मार्टफोन वायरलेस चार्जिंगसह येतो. तुम्हाला 10 वॅट रिव्हर्स वायरलेस चार्जिंगसाठीही सपोर्ट देण्यात आला आहे.

Ayurvedic Remedies for Snoring | तुम्हीही रात्री जोरजोरात घोरता का? घराच्या घरी करा ‘हे’ उपाय

Ayurvedic Remedies for Snoring

Ayurvedic Remedies for Snoring | अनेक लोक हे रात्री झोपल्यानंतर जोर जोरात घोरत असतात. त्या व्यक्तीला काहीच माहिती नसते. परंतु त्याच्या शेजारी झोपलेल्या व्यक्तीला मात्र या घोरण्याचा खूप जास्त त्रास होत असतो. परंतु हे घोरणे त्या व्यक्तीचे आरोग्यासाठी देखील चांगले नसते. अनेक वेळा आपण असा विचार करतो की, या घोरण्याला 9Ayurvedic Remedies for Snoring) काही उपाय असता, तर किती बरं झालं असतं? परंतु आज आम्ही तुम्हाला या घोरण्यापासून मुक्तता मिळवण्यासाठी काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. ज्या पासून तुमचे रात्रीचे घोरणे बंद कराल.

घोरण्याच्या समस्येचे कारण | Ayurvedic Remedies for Snoring

घोरण्याचा समस्या मागे अनेक कारणं आहेत. यामध्ये जे लोक जास्त लठ्ठ असतात ते लोक रात्रीचे घोरतात. त्याचप्रमाणे ज्या लोकांचे नाक आणि घशाचे स्नायू कमकुवत होतात. त्यामुळे देखील घोरतात तसेच ज्या लोकांना सर्दी होते त्यांना देखील हा त्रास स्यो. तसेच जे लोक धुम्रपान करतात त्यांना देखील ही समस्या असते. तसेच योग्य ऑक्सिजनछा जर पुरवठा होत नसेल तरी देखील घोरण्याची समस्या निर्माण होते.

घोरण्यापासून मुक्त होण्यासाठी टिप्स

झोपण्याची स्थिती बदला

जेव्हा तुम्ही पाठच्या ऐवजी पोटावर झोपता. त्यावेळी तुम्हाला श्वास घेणे सोपे जाते. म्हणजे तुम्ही पोटावर झोपला, तर घोरण्याची समस्या बंद होऊ शकते.

जीवनशैलीत बदल करणे

घोरण्याची समस्या दूर करायची असेल, तर तुम्हाला नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. तसेच वजन नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. म्हणजेच तुमची श्वास घेण्याची क्षमता देखील वाढते. तसेच अल्कोहोल आणि धुम्रपान सेवन बंद केले पाहिजे. त्यामुळे तुम्हाला घोरण्याची समस्या निर्माण होणार नाही. झोपण्यापूर्वी तुम्ही जास्त जड पदार्थ खाऊ नका. तसेच तुम्ही झोपण्यापूर्वी कोमट पाण्याने अंघोळ देखील करू शकता. यामुळे घोरण्याची समस्या बंद होईल. तसेच अनेक लोकांना झोपण्यापूर्वी चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. परंतु ही सवय अत्यंत चुकीची आहे.

घोरण्यावर घरगुती उपाय

पुदिना | Ayurvedic Remedies for Snoring

जर तुम्ही कोमट पाण्यात पेपर मेंट ऑइल घालून गुळण्या केल्या तर घोरण्याची समस्या देखील दूर होऊ शकते. तसेच तुम्ही पायात पाण्यात पुदिन्याची पाने उकळून घेऊन जर ते पाणी पिले तरी देखील घोरण्याची समस्या हळूहळू दूर होते.

ऑलिव्ह ऑइल

ऑलिव्ह ऑइल जर तुम्ही नाकात टाकले तर श्वास घेण्याच्या त्रासापासून मुक्तता होते. तसेच तुम्हाला चांगली झोप देखील लागेल. तुम्ही जर रात्री नाकात झोपण्यापूर्वी ऑलिव्ह ऑईलचे काही थेंब टाकले तर घोरण्याची समस्या हळूहळू दूर होईल.

देशी तूप

तुम्ही जर रात्री झोपताना देशी तूप थोडेसे गरम करून त्याचे दोन-तीन थेंब नाकात टाकले, तरी देखील घोरण्याची समस्या कमी होते. आणि तुम्हाला रात्रीची चांगली झोप देखील लागते.

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची ही योजना आहे अत्यंत फायदेशीर ; केवळ व्याजातून मिळतात 2 लाख रुपये

Post Office Scheme

Post Office Scheme | आजकाल आर्थिक गुंतवणुकीचे महत्त्व खूप जास्त प्रमाणात वाढलेले आहे. प्रत्येक जण भविष्याचा विचार करून काही ना काही रक्कम गुंतवून ठेवत असतात. सध्या बाजारामध्ये गुंतवणूक करण्याच्या अनेक योजना उपलब्ध असतात. त्या माध्यमातून अनेक लोक उपलब्ध गुंतवणूक करत असतात. परंतु त्यातील पोस्ट ऑफिसमध्ये (Post Office Scheme) गुंतवणूक करणाऱ्या लोकांची संख्या खूप जास्त आहे कारण पोस्ट ऑफिस ही एक विश्वासहार्य योजना आहे. आणि गेल्या अनेक वर्षापासून लोकांना यातून चांगला नफा देखील मिळत आहे. पोस्ट ऑफिसने अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धी माणसांपर्यंत अनेक योजना आणलेल्या आहे. पोस्ट ऑफिसची (Post Office Scheme) एक अशी योजना आहे. ज्यातून तुम्हाला खूप चांगले व्याज मिळणार आहे. या योजनेचे नाव पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट योजना असे आहेत. या योजनेत तुम्हाला टॅक्स बेनिफिट्स देखील मिळतात. आता या योजनेची माहिती आपण जाणून घेऊया.

या पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट योजनेमध्ये अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत गुंतवणूक करू शकता. या योजनेत तुम्ही पाच वर्षासाठी गुंतवणूक करू शकता. या योजनेत तुम्हाला 7.5% एवढे व्याज मिळते. आणि मॅच्युरिटी नंतर देखील खूप चांगले व्याज मिळते. या योजनेमध्ये तुम्ही 1 वर्ष, 2 वर्ष 3 वर्ष किंवा पाच वर्षासाठी गुंतवणूक करू शकता. जर तुम्ही या योजनेमध्ये एक वर्षासाठी गुंतवणूक केली, तर त्यावर तुम्हाला 6.ई टक्के एवढे व्याज मिळेल. त्याचप्रमाणे 1 किंवा 3 वर्षासाठी गुंतवणूक केली, तर तुम्हाला 7 टक्के व्याजदर मिळेल आणि जर तुम्ही 5 वर्षासाठी गुंतवणूक केली, तर तुम्हाला 7.5% एवढे व्याजदर मिळेल.

पोस्ट ऑफिसच्या (Post Office Scheme) टाईम डिपॉझिटिव योजनेमध्ये तुम्ही 5 वर्षासाठी 5 लाख रुपयांची गुंतवणूक केली, तर तुम्हाला 7.5% एवढा व्याजदर मिळेल. म्हणजेच या कालावधीत तुम्हाला 2 लाख 24 हजार 974 रुपये एवढे व्याज मिळेल. तसेच नंतर 7 लाख 24 हजार 974 मिळेल. म्हणजेच फक्त व्याजातूनच तुम्हाला 2 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळेल. त्याचप्रमाणे या योजनेत कलम 80 क अंतर्गत टॅक्स सूट देखील मिळते. तुम्ही दहा वर्षापेक्षा जास्त वयोगटातील उमेदवार या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकता. आणि तुमच्या भविष्यासाठी एक चांगला निधी गोळा करू शकता.

Menopause Symptoms | मेनोपॉज कधी सुरु होतो? सुरुवातीला दिसतात ‘ही’ लक्षणे

Menopause Symptoms

Menopause Symptoms | प्रत्येक महिलेच्या जीवनामध्ये मासिक पाळी येणे, हे अत्यंत स्वास्थ आरोग्याचे लक्षण मानले जाते. परंतु एका ठराविक काळानंतर ही मासिक पाळी येणे बंद होते. त्याला मेनोपॉज असे म्हणतात. यानंतर महिलेच्या शरीरामध्ये अनेक वेगवेगळे बदल घडत असतात. परंतु मेनोपॉज येण्याआधी काही लक्षणे दिसू लागतात. जसे की प्रत्येक महिन्याला येणारी तुमची मासिक पाळी ही अनियमित होते. ती काही वेळा येते तर काही वेळा येत नाही. आता हा मेनोपॉज (Menopause Symptoms) चालू झाल्यावर शरीरात नक्की कोणती लक्षणे दिसतात हे आपण जाणून घेणार आहोत. .

मेनोपॉजबद्दल (Menopause Symptoms) स्त्री रोगतज्ञ यांनी सांगितले की, या काळामध्ये महिलांमध्ये हार्मोन्सची पातळी कमी होते. यावेळी स्त्रियांमधील प्रजननाची प्रक्रिया देखील बंद होते. परंतु महिलांच्या शरीरामध्ये अनेक बदल होतात. या मेनोपॉजचे तीन टप्पे आहे. ते म्हणजे प्री मेनोपॉज आणि मेनोपॉज, पोस्ट मेनोपॉज. साधारण 45 ते 55 असणाऱ्या महिलांमध्ये मेनोपॉज सुरू होतो. परंतु आजकाल महिलांची जीवनशैली देखील खूप बदलली आहे. आणि वैद्यकीय ट्रीटमेंट देखील अनेकांच्या चालू आहे. त्यामुळे हा टप्पा काही महिलांमध्ये खूपच लवकर चालू होतो. आता आपण मेनोपॉज चालू होताना कोणती लक्षणे दिसतात हे जाणून घेऊया.

हॉट फ्लॅश | Menopause Symptoms

यामध्ये व्यक्तीला जास्त घाम येतो. तसेच अस्वस्थ वाटते. हे हॉट फ्लॅश काही मिनिटे किंवा तास देखील होते. यामध्ये हृदयाचे ठोके अनियमित होतात डोकेदुखी चालू होते.

अनियमित मासिक पाळी

मेनोपॉज चालू झाल्यावर महिलांच्या मासिक पाळी अनियमितता येते. महिलांमध्ये अनेक शारीरिक बदल होतात हार्मोनल देखील बदलतात. मासिक पाळी हे नेहमीपेक्षा कमी किंवा जास्त काळ देखील येते. तसेच रक्तप्रवाह देखील कमी जास्त प्रमाणात होऊ शकतो.

रात्रीचा घाम येणे

अनेकवेळा महिलांचा मेनोपॉज सुरू झाला की, रात्रीचा घाम येतो. काही वेळा व्यक्ती पूर्णपणे घामाने देखील भिजलेली असते. यावेळी झोप देखील येत नाही. तसेच त्यांच्या मानसिक स्थितीमध्ये देखील खूप जास्त बदल होत असतो.

मूड स्विंग्स | Menopause Symptoms

मेनोपॉज चालू झाल्यावर मूड्स स्विंग्स मोठ्या प्रमाणात जाणवते. अशा वेळी महिलांना कोणत्याही क्षणी आनंद वाटतो. तर दुसऱ्या क्षणी लगेच दुःख देखील वाटू शकते. याचा तुमच्या वैयक्तिक नात्यांवर आणि दैनंदिन जीवनावर देखील नकारात्मक परिणाम होतो.जर ही सगळी लक्षणे असतील तर तुम्ही मेनोपॉजला सामोरे जाण्यासाठी तयार व्हायला पाहिजे.

फ्लिपकार्टवर सुरु आहे बिग दिवाळी सेल; निम्म्या किमतीत फ्रीझ करा खरेदी

Flipcart Sale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दिवाळी अगदी तोंडावर आलेली आहे. या सणासुदीच्या काळामध्ये लोक मोठ्या प्रमाणात शॉपिंग करत असतात. नवनवीन कपडे तसेच इतर गोष्टी विकत देखील घेत असतात. दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनच्या शुभमुहूर्तावर अनेक मोठ्या वस्तूंची खरेदी देखील केली जाते. याच सणांचा फायदा घेत सगळ्या ई-कॉमर्स कंपन्या देखील या सणासुदीच्या काळामध्ये त्यांच्या प्रत्येक प्रोडक्ट्सवर काही ना काही ऑफर देत असतात. अशातच आता फ्लिपकार्टचा बिग दिवाळी सेल चालू झालेले आहे. यामध्ये घरगुती उत्पादनांवर बंपर डिस्काउंट आहे. जर तुम्ही देखील खूप फ्रिज घेण्याचा विचार करत असाल तर या दिवाळीमध्ये तुम्ही फ्लिपकार्टवरून फ्रिज विकत घेऊ शकता. यावर तुम्हाला खूप चांगला डिस्काउंट मिळेल. त्याचप्रमाणे हा सेल केवळ 31 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर फ्रिज खरेदी करू शकता. आता या सेलमधील 3 चांगले फ्रिज आपण पाहणार आहोत.

फ्लिपकार्टच्या या दिवाळी सेलमध्ये वर्लपूल 2 स्टार असलेला फ्रिज सध्या चांगलाच ट्रेंडिंगमध्ये आहे. यावर तुम्हाला चांगला डिस्काउंट देखील मिळतो. या फ्रिजवर तुम्हाला फ्लिपकार्ट वरून 22 टक्के डिस्काउंट मिळत आहे. ज्याची किंमत 11990 होईल तसेच. तुम्ही एसबीआय क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केले, तर 1500 हजार रुपयांपर्यंत देखील बचत करू शकता. तसेच तुम्ही या फ्रिजवर 3500 पर्यंत एक्सचेंज डिस्काउंट देखील मिळवू शकता

यातील दुसरी कंपनी ही गोदरेजची आहे. या कंपनीचा फ्रीज देखील 2 स्टार आहे. या कंपनीचा फ्रीज खरेदी केल्यास तुम्हाला 28% पर्यंत डिस्काउंट मिळेल. याची किंमत तुम्हाला केवळ 11,990 रुपये एवढी होईल. तुम्ही जर एसबीआयचे क्रेडिट कार्ड द्वारे पेमेंट केलं, तर तुम्हाला 1500 रुपयांपर्यंतची बचत मिळेल तसेच. या फ्रीजवर 5300 एक्सचेंज रुपयांपर्यंत डिस्काउंट देखील उपलब्ध आहे. .

फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये वोल्टास या कंपनीचा फ्रिज सर्वात कमी किमतीचा आहे. तुम्ही कोणत्या ऑफरशिवाय कमी किमतीत देखील हा खरेदी करू शकता. या फ्रीजची एकूण किंमत तुम्हाला केवळ 11890 रुपये एवढी होईल. या फ्रिजची लाँच किंमत ही 25000 रुपये आहे. परंतु या फ्लिपकार्ट सेलमध्ये ती तुम्हाला कमी करून मिळत आहे. तसेच तुम्ही एसबीआय क्रेडिट कार्डच्या ऑफरद्वारे 1500 रुपयांपर्यंतचा बचत करू शकता. तसेच या फ्रीजवर 5300 रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंट देखील आहे. त्यामुळे या दिवाळीत तुम्ही तुमच्या घरात नवीन फ्रीज अगदी कमी किमतीमध्ये विकत घेऊ शकता.

दिल्ली ॲप डेव्हलपरने आधीच खरेदी केले JioHotstar चे डोमेन, रिलायन्स कंपनीला पत्र लिहून केलीये ही मागणी

Jiohotstar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दिल्लीतील एका ॲप डेव्हलपरने नुकतेच एक मोठे पाऊल उचलले आहे. जे तंत्रज्ञानाच्या जगात चर्चेचा विषय बनले आहे. या निनामी व्यक्तीने आधी Jio Hotstar चे डोमेन विकत घेतले आणि नंतर त्याने रिलायन्स इंडस्ट्रीजला विशेष प्रस्ताव देखील मांडला आहे. आता हे संपूर्ण प्रकरण नक्की काय आहे? हे आपण जाणून घेणार आहोत.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

रिलायन्स जिओ सिनेमा आणि डिस्ने+हॉटस्टार एकत्र होणार असल्याची बातमी जेव्हा त्या व्यक्तीला मिळाली तेव्हा हे सर्व सुरू झाले. या आधारावर त्याने ‘https://jiohotstar.com’ हे डोमेन खरेदी केले. आता तो रिलायन्सकडून हे डोमेन विकत घेण्याची मागणी करत आहे. या पैशातून त्याला केंब्रिज विद्यापीठात शिक्षण घ्यायचे असल्याचे त्याचे म्हणणे आहे. विलीनीकरणानंतर नवीन कंपनीसाठी हे डोमेन योग्य असेल असे त्याला वाटते.

ॲप डेव्हलपरने पत्रात काय लिहिले?

ॲप डेव्हलपरने पत्रात लिहिले की, “मी दिल्लीतील ॲप डेव्हलपर आहे आणि माझ्या स्टार्टअपवर काम करत आहे. 2023 च्या सुरुवातीस, सोशल मीडियावर स्क्रोल करताना, त्याला एक बातमी आली की डिस्ने + हॉटस्टार IPL स्ट्रीमिंग परवाना गमावल्यानंतर युजर्स गमावत आहे आणि डिस्ने एका भारतीय स्पर्धकासोबत हॉटस्टार विकण्याचा किंवा विलीन करण्याचा विचार करत आहे.”

यामुळे ॲप डेव्हलपरने असा अंदाज लावला की सोनी आणि झी स्वतः विलीन करण्याचा प्रयत्न करत आहेत, डिस्ने+ हॉटस्टार खरेदी करणारी एकमेव मोठी कंपनी व्हायकॉम 18 (रिलायन्सच्या मालकीची) सोडून. अशा परिस्थितीत, ॲप डेव्हलपरला आठवले की जेव्हा Jio ने Saavn ही म्युझिक स्ट्रीमिंग सेवा खरेदी केली होती, तेव्हा त्यांनी ती JioSaavn वर रीब्रँड केली होती आणि डोमेन Saavn.com वरून JioSaavn.com मध्ये बदलले होते.

नाव बदलून जिओ हॉटस्टार होणार का?

अशा परिस्थितीत आता कंपनीने Hotstar ताब्यात घेतल्यास ते त्याचे नाव बदलून JioHotstar.com करू शकतात. त्यानंतर त्या व्यक्तीने डोमेन तपासले आणि ते गुगलवर उपलब्ध असल्याचे पाहून त्याने लगेच ते खरेदी केले. डेव्हलपरला वाटले की, जर असे झाले तर कंपनी त्याच्याकडून हे डोमेन विकत घेऊ शकते जेणेकरून तो केंब्रिज विद्यापीठातील शिक्षण पूर्ण करू शकेल.

Diabetes Symptoms | मधुमेह झाल्यास सुरुवातीला दिसतात ही लक्षणे; चुकूनही करू नका दुर्लक्ष

Diabetes Symptoms

Diabetes Symptoms | आजकाल लोकांची जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदललेली आहे. अनेक लोक हे फास्ट फूड मोठ्या प्रमाणात खातात. तसेच त्यांच्या शारीरिक हालचाली देखील अगदी कमी असतात. आणि यामुळे मधुमेहासारख्या अनेक आजारांच्या समस्या वाढलेल्या आहेत. अगदी प्रत्येक वयोगटातील लोकांवर या मधुमेहाचा (Diabetes Symptoms) परिणाम होत आहे. जर व्यक्तीच्या शरीरातील निर्मिती योग्य प्रमाणात होत नसेल, किंवा त्याचा वापर होत नसेल तर रक्तातील साखरेची पातळी वाढते. यामुळेच हृदय, मूत्रपिंड, डोळे आणि इतर अवयवांवर देखील परिणाम होतो. आणि परिणामी मधुमेह मोठ्या प्रमाणात वाढतो. परंतु हा मधुमेह होण्याआधी आपल्या शरीरात काही लक्षणे दिसतात. त्या लक्षणांकडे आपण वेळीच लक्ष दिले पाहिजे. आणि डॉक्टरांचे उपचार देखील चालू केला पाहिजे. आता मधुमेह झाल्यावर कोणती लक्षणे दिसतात? हे आज आपण जाणून घेणार आहोत.

मधुमेहाची लक्षणे ज्याकडे दुर्लक्ष करू नये | Diabetes Symptoms

अनेकदा, मधुमेहाच्या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल माहिती नसल्यामुळे, एखादी व्यक्ती त्याकडे दुर्लक्ष करते, ज्यामुळे नंतर आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. अशा परिस्थितीत मधुमेहाच्या सुरुवातीच्या लक्षणांकडे कधीही दुर्लक्ष करू नका आणि त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

खूप तहान लागणे

जेव्हा शरीरातील ग्लुकोजची पातळी वाढते, तेव्हा मूत्रपिंड अधिक पाण्याची मागणी करतात, ज्यामुळे एखाद्याला वारंवार तहान लागते.

वारंवार लघवी होणे

जास्त तहान लागल्याने शरीरात वारंवार लघवी होण्याची लक्षणे दिसतात, हे विशेषतः रात्रीच्या वेळी होते. ही लक्षणे मधुमेहाची असू शकतात.

अचानक वजन कमी होणे | Diabetes Symptoms

जर तुमचे वजन अचानक कमी होऊ लागले तर ते मधुमेहाचे लक्षण असू शकते, कारण मधुमेहामध्ये शरीराला पुरेसे इन्सुलिन न मिळाल्यास ग्लुकोज साठवण्यात त्रास होऊ लागतो, अशा स्थितीत शरीराला आपले वजन राखण्यासाठी ऊर्जा मिळत नाही. जसे की चरबी आणि स्नायूंचा वापर सुरू होतो. त्यामुळे वजन झपाट्याने कमी होऊ लागते.

थकवा आणि अशक्तपणा

रक्तातील साखरेचे असंतुलन शरीराला आवश्यकतेनुसार पुरेशी ऊर्जा मिळत नसल्याने थकवा आणि अशक्तपणा येतो.

अंधुक दृष्टी

शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने डोळ्यांच्या लेन्सवर परिणाम होतो, त्यामुळे दृष्टी खराब होऊ लागते.

मंद जखमा बरे करणे

शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढल्याने शरीरातील रक्ताभिसरण मंदावते, त्यामुळे जखमा लवकर बऱ्या होत नाहीत.

त्वचेचा संसर्ग किंवा खाज सुटणे

मधुमेहामुळे त्वचा कोरडी होते आणि त्यामुळे खाज किंवा संसर्गही होऊ शकतो.

हात आणि पाय सुन्न होणे

डायबेटिक न्यूरोपॅथीमुळे वेदना, सुन्नपणा, जळजळ, मुंग्या येणे, हात आणि पायांमध्ये पेटके येतात. ही लक्षणे अनेकदा पायांपासून सुरू होतात आणि वरच्या अंगांकडे जातात.

लग्नानंतर मुली किती वर्षापर्यंत वडिलांच्या मालमत्तेवर हक्क सांगू शकतात? जाणून घ्या नवे नियम

low

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुलींना त्याचे हक्क मिळावेत यासाठी सरकार नेहमी कार्यशील असते. त्यासाठी त्यांनी 1965 मध्ये हिंदू उत्तराधिकार कायदा लागू करण्यात आला होता. या नियमामध्ये हिंदू, बौद्ध, जैन आणि शीख कुटुंबांमधील मालमत्ता वाटपाचे नियम समाविष्ट होते. मात्र मुलींना वडिलांच्या संपत्तीत पूर्ण हक्क मिळत नव्हता. म्हणून सरकारने या नियमामध्ये बदल करून, 2005 साली कायद्यात दुरुस्ती करण्यात आली, ज्यामुळे मुलींना मुलांप्रमाणेच मालमत्तेवर समान अधिकार मिळाला. मुलीचे लग्न झाल्यानंतरही तिचा संपत्तीवर अधिकार असेल असा नियम काढण्यात आला .

1965 आणि 2005 चा कायदा

2005 च्या हिंदू उत्तराधिकार कायद्यात दुरुस्ती होण्याआधी अविवाहित मुलींनाच कुटुंबातील सदस्य मानले जात होते. तसेच लग्नानंतर त्यांचा कुटुंबाच्या मालमत्तेवर हक्क संपला असेल मानले जात होते .पण 2005 च्या कायद्यानंतर विवाहित मुलींनाही वडिलांच्या मालमत्तेत पूर्ण अधिकार मिळू लागला. यामुळे मुलींना लग्नानंतरही संपत्तीवरील हक्क अबाधित राहतो. हा हक्क कोणत्याही वर्षांपर्यंत मर्यादित नाही आणि मुलीला कायमच वडिलांच्या संपत्तीवर वारसाहक्क राहील असे नमूद केले आहे . या बदलामुळे मुलींना त्यांच्या कुटुंबातील संपत्तीवर कायदेशीर अधिकार मिळाला असून, हे बदल भारतात महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे.

मालमत्तेचे दोन प्रकारात विभाजन

हिंदू उत्तराधिकार कायद्याअंतर्गत मालमत्ता दोन प्रकारात विभागली जाते. पहिली वडिलोपार्जित आणि दुसरी स्वकष्टार्जित. वडिलोपार्जित मालमत्तेवर मुलगा आणि मुलगी दोघांचाही जन्मसिद्ध हक्क असतो, जो त्यांना त्यांच्या कुटुंबाच्या वारशात मिळतो. त्यामुळे लग्नानंतरही मुलगी वडिलांच्या मालमत्तेवर हक्क सांगू शकते. या बदलाने मुलींना अधिक आर्थिक सुरक्षा आणि समानता मिळाली आहे. स्वकष्टार्जित मालमत्तेबाबत वडिलांची इच्छा महत्त्वाची ठरते. जर वडिलांनी इच्छा व्यक्त केली तर ते संपूर्ण संपत्ती मुलाला, मुलीला किंवा इतर कोणालाही देऊ शकतात. जर इच्छापत्र नसेल तर वडिलांच्या मृत्यूनंतर मुलगा आणि मुलगी दोघेही मालमत्तेचे समान वारस ठरतात. या व्यवस्थेमुळे कुटुंबातील संपत्तीचे समान वाटप केले जाते.

संशोधन क्षेत्रात मोठी प्रगती; भारताने लॉन्च केले चौथे मिसाइल सबमरीन

Nuclear Missile Submarine

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताने अनेक क्षेत्रामध्ये प्रगती साध्य केली आहे. त्यातच भारताने 16 ऑक्टोबरला आण्विक क्षमता मजबूत करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल टाकले असून ,त्यांनी चौथी न्यूक्लियरशस्त्रधारी बॅलेस्टिक मिसाइल सबमरीन (SSBN) लाँच केली आहे . याचे उदघाटन हे विशाखापट्टणमच्या शिप बिल्डिंग सेंटरमध्ये केले असून, ती S4 म्हणून ओळखली जाणार आहे. संशोधन क्षेत्रातील प्रगतीमुळे भारताची ताकद वाढणार आहे.

भारताचे नवीन SSBN

ही नवीन SSBN भारताच्या आण्विक प्रतिरोध क्षमतेत वाढ करणारी ठरली आहे. या सबमरीनमध्ये 75 टक्के स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून, के-4 बॅलेस्टिक मिसाइल्ससह सुसज्ज आहे. या मिसाइल्सची रेंज 3500 किमी आहे, जी भारताच्या शत्रू देशांवर नियंत्रण ठेवण्यास सक्षम ठरू शकते. यामुळे सुरक्षितता वाढणार आहे. याआधीच्या SSBN मध्ये के-15 मिसाइल्स होते, पण नवीव S4 मध्ये फक्त के-4 मिसाइल्स बसवण्यात आले आहेत, ज्यामुळे तिची क्षमता जास्त चांगली झाली आहे.

संशोधनामध्ये ताकद वाढवण्याचे उद्दीष्ट

भारताने याआधी 29 ऑगस्ट 2024 रोजी INS अरिघाट ही दुसरी SSBN तसेच नंतर INS अरिधमान नावाची तिसरी SSBN देखील सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाचा भाग म्हणून दोन आण्विक-सशस्त्र आक्रमण सबमरीन बांधण्यास देखील सरकारने मान्यता दिली आहे, ज्यामुळे भारताची हिंद प्रशांत महासागरातील उपस्थिती अधिक मजबूत होण्यास मदत मिळेल . भारत 2028 पर्यंत रशियाकडून आणखी एक अकुला क्लास न्यूक्लियर सबमरीन लीजवर घेण्याचा विचार करत आहे . या सर्व उपक्रमांमुळे भारताची आण्विक क्षमता आणि हिंद प्रशांत क्षेत्रातील ताकद वाढवण्याचे उद्दीष्ट आहे. त्याचबरोबर चीनसारख्या प्रतिस्पर्ध्यांवर दबाव वाढवण्यासाठी ही महत्वाकांक्षी योजना महत्त्वाची ठरणार आहे.

Weather Update | राज्यात पावसाचा जोर ओसरला असला, तरीही ‘या’ जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी

Weather Update

Weather Update | राज्यामध्ये परतीच्या पावसाला सुरुवात झालेली आहे. आणि अनेक ठिकाणी सध्या पाऊस देखील पडत आहे. राज्यात बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता. त्यामुळे अनेक ठिकाणी प्रतीचा पाऊस सुरू झालेला होता. यादरम्यान विविध महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी झालेला आहे. त्यामुळे पुढील दोन-तीन दिवस राज्यातील हवामान कोरडे असणार आहे. परंतु हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 26 आणि 27 ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील बहुतांश ठिकाणी आज हवामान कोरडे असणार आहे. परंतु शनिवारी म्हणजे उद्या विदर्भ, गडचिरोली आणि नागपूर, वर्धा या जिल्ह्यांमध्ये आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस (Weather Update) पाहायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे रविवारी विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, बुलढाणा, नागपूर, वर्धा, वाशिम या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

सध्या पुण्यात देखील पावसाचा (Weather Update) जोर बऱ्यापैकी कमी झालेला आहे. त्यामुळे पुण्यातील परिसरात देखील हवामान कोरडे असणार आहे. परंतु अधून मधून ढगाळ वातावरण दिसण्याची शक्यता देखील आहे. तसेच घाट परिसरात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे. यासोबत सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या ठिकाणी कोरडे हवामान असेल. आज पुण्यामध्ये कमाल तापमान हे 30°c एवढे असणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे.