Union Bank Of India Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध आणि चांगल्या संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. अनेक लोकांना बँकेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असते. आता ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण आता युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank Of India Bharti 2024) अंतर्गत स्थानिक बँक अधिकारी या पदांसाठी भरती प्रक्रिया चालू झाली आहे. या भरती अंतर्गत 1500 रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. त्याचप्रमाणे 13 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखेला अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.
पदाचे नाव | Union Bank Of India Bharti 2024
या भरती अंतर्गत स्थानिक बँक अधिकारी या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
रिक्त पदसंख्या
या भरती अंतर्गत 1500 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
नोकरीचे ठिकाण
या भरती अंतर्गत तुमची निवड झाली तर तुम्हाला मुंबई या ठिकाणी नोकरी करावी लागेल.
वयोमर्यादा
या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 20 ते 30 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.
अर्ज पद्धती
या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल
अर्ज करण्याची शेवटची तारीख
13 नोव्हेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.
शैक्षणिक पात्रता | Union Bank Of India Bharti 2024
हा कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
अर्ज कसा करावा?
या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
13 नोव्हेंबर 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
NFL Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. त्याचा फायदा आजपर्यंत अनेक लोकांना झालेला आहे. अशातच आम्ही एक नवीन भरती घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता नॅशनल फर्टीलायझर्स लिमिटेड (NFL Bharti 2024) अंतर्गत एक मोठी भरती जाहीर झाली आहे. या भरती अंतर्गत गैर कार्यकारी या पदाच्या रिक्त जागा आहेत. या पदाच्या एकूण 336 रिक्त जागा आहे. या भरतीचे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. त्याचप्रमाणे 9 ऑक्टोबरपासून या भरतीची अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. आणि 8 नोव्हेंबर 2024 ही या भरतीचा अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. आता आपण या भरतीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
पदाचे नाव | NFL Bharti 2024
या भरती अंतर्गत गैर कार्यकारी या पदाचा रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
रिक्त पदसंख्या
या पदाच्या 336 रिक्त जागा आहेत आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत.
अर्ज पद्धती
या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज सुरू होण्याची तारीख
9 ऑक्टोबर 2024 पासून या भरतीच्या अर्ज प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
8 नोव्हेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरचा अर्ज करा.
अर्ज कसा करावा ? | NFL Bharti 2024
या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
8 नोव्हेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.
महाराष्ट्रात सध्या “लाडकी बहीण” योजनेचा प्रचंड बोलबाला आहे. महिला वर्गात महाराष्ट्र सरकारची ही योजना प्रचंड लोकप्रिय झाली आहे. पात्र लाभार्थी महिलांना प्रतिमा दीड हजार रुपये देणाऱ्या या योजनेची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. यंदाच्या अर्थसंकल्पात ही घोषणा करण्यात आली. आणि या योजनेसाठी नोंदणी करण्याकरिता महिलांच्या रांगाच रांगा लागल्या. दीड कोटीहून अधिक महिलांनी या योजनेसाठी नोंदणी केली आणि त्यांना ऑगस्ट महिन्यापासून प्रति महा दीड हजार रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली.
विरोधकांकडून योजनेची बदनामी
महिला वर्गात ही योजना लोकप्रिय होत आहे आणि मतांच्या राजकारणात त्याचा फायदा सत्ताधारी महायुतीला होईल या भीतीने विरोधकांनी या योजनेची प्रचंड बदनामी करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला ही योजना म्हणजे जुमला आहे अशी टीका झाली. पण महाराष्ट्रातील महिलांनी या टीकेकडे सपशेल दुर्लक्ष करून नोंदणी प्रक्रिया सुरूच ठेवली. जनतेचा विशेषतः महिलांचा या योजनेवर विश्वास बसतो आहे हे लक्षात येताच विरोधकांनी टीकेचा रोख बदलला आणि राज्याच्या आर्थिक स्थितीवर बोलण्यास सुरुवात केली.
लाडकी बहीण योजनेची रक्कम अदा करण्यासाठी राज्य सरकारकडे पैसेच नाहीत त्यामुळे दर आठवड्याला तीन हजार कोटी रुपयांचे कर्ज सरकार काढत आहे अशी टूम सोडून देण्यात आली. या योजनेला वित्त विभागाचा विरोध असल्याच्या बातम्या पेरण्यात आल्या. अर्थमंत्री अजित पवार यांनी या बातम्यांचे खंडन केले. या योजनेसाठी अर्थसंकल्पात तब्बल 46 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे अजित पवार यांनी ठणकावून सांगितले. विरोधकांकडून मध्येच ठेकेदारांच्या बातम्या सुद्धा पसरवल्या गेल्या. राज्य सरकारकडे ठेकेदारांचे पैसे देण्यासाठी शिल्लक नाही त्याचा परिणाम राज्याच्या विकासावर होणार आहे, अशी आवई उठवण्यात आली. पण त्यानेही “लाडकी बहीण”ची लोकप्रियता किंचित देखील कमी झाली नाही.
सरकारवर महिलांचा विश्वास अधिक दृढ झाला
त्यानंतर विरोधकांकडून नैतिकतेचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. दीड हजार रुपये देऊन सरकार महिलांची मते विकत घेऊन इच्छित आहे असे भासवण्यात येऊ लागले. तशा आशयाचे काही व्हिडिओ समाज माध्यमांतून पसरविण्यात आले. “आम्हाला दीड हजार रुपये नकोत सिलेंडर स्वस्त करा” अशी मागणी करणाऱ्या काही महिला जाणीवपूर्वक दाखवण्यात आल्या. पण तोपर्यंत महिलांच्या खात्यात रक्कम जमा होऊ लागली होती आणि सरकारवर महिलांचा विश्वास अधिक दृढ होऊ लागला होता.
विरोधासाठी तंत्रज्ञानाचा वापर ?
या योजनेच्या लोकप्रियतेची व्याप्ती जसजशी लक्षात येत गेली तसतसे विरोधकांनी नवनवे डाव टाकण्यास सुरुवात केली. काही जणांनी महिलांची नोंदणी करणारे कॅम्प स्वतः सुरू करून बॅनर वर आपले फोटो लावून घेतले. काही जणांनी महिलांच्या फॉर्ममध्ये चुका करून ठेवल्या. चुकीच्या फॉर्ममुळे महिलांना योजनेचा लाभ मिळू नये आणि सरकारची आणि योजनेची बदनामी व्हावी, हा एक मात्र उद्देश त्यामागे होता. भाजपचे आमदार राम कदम यांनी यासंदर्भातील आरोप प्रत्यक्ष सभागृहातच केले. लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करण्याकरिता एक पोर्टल सुरू करण्यात आले होते. मात्र ते पोर्टल बंद पडावे या उद्देशाने जंक डाटा या पोर्टलवर अपलोड करण्यात आला. त्यामुळे या पोर्टलची गती संथ झाली आणि महिलांना नोंदणी करण्यास अडचणी येऊ लागल्या. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातील माहिती देखील पत्रकार परिषदेत दिली होती. विरोधक तंत्रज्ञानाचा वापर करून ही योजना बंद पडू इच्छित आहेत हे लक्षात येताच सरकारने ऑफलाइन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली आणि महिलांना त्याचा लाभ दिला.
दीड कोटीहून अधिक महिलांची नोंदणी
प्रत्येक टप्प्यावर या योजनेच्या नोंदणीची मुदत वाढविण्यात येत आहे. सध्या दीड कोटीहून अधिक महिलांनी यात नोंदणी केली आहे. योजनेच्या लाभाचे पहिले दोन हप्ते अदा करण्यात आल्यानंतर विरोधकांनी आपली भूमिका बदलली. जमा झालेले पैसे ताबडतोब काढून घ्या नाहीतर सरकार तुमचे पैसे स्वतः काढून घेईल अशी भीती महाविकास आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यांनी देखील दाखवली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी कोणत्याही परिस्थितीत हे पैसे परत घेतले जाणार नाहीत, सरकारने महिलांना दिलेली ही ओवाळणी आहे आणि ओवाळणी परत घेतली जात नाही असे स्पष्ट करून महिला वर्गाला धीर दिला. आणि पात्र लाभार्थी महिलांना या योजनेचा लाभ देणे सुरूच ठेवले.
साडेपाच हजार रुपये बोनसची घोषणा केली नव्हती
निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांनी या योजनेला सर्वाधिक लक्ष करण्याचे ठरविले आहे. पात्र लाभार्थी महिलांना सरकारकडून साडेपाच हजार रुपये बोनस दिला जाणार आहे अशी बातमी जाणीवपूर्वक पसरवण्यात आली. वस्तूतः सरकारने तशी कोणतीही घोषणा केली नव्हती.
निवडणुका झाल्यानंतर पुन्हा योजना पूर्ववत
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका 20 नोव्हेंबर रोजी होत आहेत. निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू केली आहे. आणि निवडणूक काळात महिलांना माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यास मनाई केली आहे. त्यामुळे ही योजना बंद झाली असा कांगावा विरोधकांकडून केला जात आहे. ही योजना सरकारने बंद केली नसून ती बंद करण्याचा सरकारचा कोणताही इरादा नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले आहे. निवडणूक काळापूर्तीच या योजनेचा लाभ दिला जाणार नसून निवडणुका झाल्यानंतर पुन्हा या योजनेचे पैसे पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
महिलांना दिला अग्रीम हप्ता
ऐन दिवाळीच्या तोंडावर निवडणूक आयोगाच्या हस्तक्षेपामुळे पात्र लाभार्थी महिलांना या योजनेचा लाभ मिळण्यात अडथळे येतील हे चाणाक्ष असलेल्या महायुती सरकारने आधीच ओळखले होते. त्यामुळेच लाभार्थी महिलांना अग्रीम हप्ता सरकारने आधीच देऊन टाकला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर महिलांना लाभ न मिळण्याचा कोणताही प्रश्नच उद्भवला नाही. या कृतीतून माझी लाडकी बहिणी योजना निरंतर चालू ठेवण्याचा आणि पात्र लाभार्थी महिलांना मिळणाऱ्या लाभात कोणताही खंड पडू न देण्याचा आपला इरादा सरकारने स्पष्ट केला आहे.
योजनेचा लाभ देण्यास सरकारला कोणतीही अडचण नाही. पण फक्त निवडणूक आयोगाच्या सूचनामुळे या योजनेच्या अंमलबजावणीस स्वल्पविराम मिळाला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महायुती सरकार सत्तेत आल्यास ही योजना पुन्हा पूर्वीच्याच गतीने पात्र लाभार्थी महिलांना लाभ देणे सुरू ठेवणार आहे. उलटपक्षी आपण सत्तेत आल्यास महायुती सरकारच्या योजना बंद करू आणि महायुतीच्या नेत्यांना तुरुंगात टाकू असा स्पष्ट इशारा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
देशभरात हवामान खात्याकडून ‘दाना’ चक्रीवादळाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे उडीसा आणि पश्चिम बंगाल मध्ये येणाऱ्या संभाव्य चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तेजस राजधानी एक्सप्रेस सह 12 ट्रेन रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. याबाबतची माहिती पूर्व मध्य रेल्वे सरस्वतीचंद्र यांनी एका हिंदी माध्यमाला दिली आहे.
पश्चिम बंगाल आणि उडीसा या भागात येणाऱ्या संभावित दाना चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे खात्याकडून 12 ट्रेन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तुम्ही देखील दिवाळीच्या निमित्ताने गावी जाणार असाल आणि यासाठी तुम्ही ट्रेनचे बुकिंग केलं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण 12 ट्रेन रद्द केल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. आगामी दिवाळी सणाच्या निमित्ताने अनेकांनी गावी जाण्यासाठी रेल्वेचे १ महिना आधीच बुकिंग केलेले असते. मात्र चक्रीवादळामुळे ट्रेन रद्द केल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ शकते. याशिवाय दिवाळी निमित्त रेल्वे खात्याकडून विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहेत याच्यवरही परिणाम होणार असून या काही गाड्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत.
याबाबत माहिती देताना सरस्वतीचंद्र यांनी सांगितले की उडीसा आणि पश्चिम बंगाल येथे येणाऱ्या संभाव्य दाना चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर 12 ट्रेन रद्द करण्यात आले आहेत. चला जाणून घेऊया रद्द करण्यात आलेल्या ट्रेनच्या माहितीबद्दल.
‘या’ गाड्या रद्द
दिनांक 24 ऑक्टोबर 2024 रोजी सुटणारी ट्रेन क्रमांक 03230 पटना पुरी स्पेशल रद्द करण्यात आली आहे.
याबरोबर 24 तारखेलाच सुटणारी ट्रेन क्रमांक 22644 पटना एरणाकुलम एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.
गाडी क्रमांक 02832 भुवनेश्वर धनबाद स्पेशल रद्द करण्यात आली आहे.
तर गाडी क्रमांक 0 2 831 धनबाद भुवनेश्वर स्पेशल ही गाडी सुद्धा रद्द करण्यात आली आहे.
याबरोबरच 24 तारखेला सुटणारी गाडी क्रमांक 18419 ही पुरी जयनगर एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.
तर दिनांक 26 ऑक्टोबर 2024 ला सुटणारी गाडी क्रमांक 18420 जयनगर पुरी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.
आज दिनांक 23 ऑक्टोबर रोजी सुटणारी गाडी क्रमांक 22824 नवी दिल्ली भुनेश्वर तेजस राजधानी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे
तर दिनांक 25 ऑक्टोबर रोजी सुटणारे गाडी क्रमांक 22823 भुवनेश्वर नवी दिल्ली तेजस राजधानी एक्सप्रेस गाडी रद्द करण्यात आली आहे.
दिनांक 24 ऑक्टोबर 2024 ला सुटणारी गाडी क्रमांक 15227 एस एम बी बी बेंगलुरु मुजफ्फरपुर एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे
तर दिनांक 23 ऑक्टोबर म्हणजे आजच सुटणारी गाडी क्रमांक 12 80 2 नवी दिल्ली पुरी पुरुषोत्तम एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.
तर दिनांक 24 ऑक्टोबर 2024 रोजी सुटणारी गाडी क्रमांक 12816 आनंद विहार पुरी नंदन कानन एक्सप्रेस रद्द करण्यात आलेली आहे
तर दिनांक 25 ऑक्टोबर 2024 रोजी सुटणारी गाडी क्रमांक 12875 पुरी आनंद विहार नीलांचल एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात एकमेकांशी संवाद साधण्यासाठी व्हाट्सअँप या प्लॅटफॉर्मचा वापर कोट्यवधी लोक करत आहेत . वापरकर्त्यांना अधिक आनंद देण्यासाठी व्हाट्सअँप नेहमी नवनवीन फीचर्स घेऊन येत असते. ज्याबद्दलची माहिती बऱ्याच लोकांना नसते . व्हाट्सअँपवर मॅसेज करायचं म्हंटल कि , आधी नंबर सेव्ह करावा लागतो . त्यानंतर तुम्ही एखाद्या व्यक्तीला मॅसेज करू शकता . पण जर नंबर सेव्ह न करता तुम्हाला मॅसेज करता येईल हे ऐकायला आणि वाचायला किती छान वाटतंय ना . तर हे प्रत्येक्षात सुद्धा करता येईल . तर चला त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
WA.me चा वापर
व्हाट्सअँपवर नंबर सेव्ह न करता मॅसेज पाठवण्यासाठी तुम्ही WA.me या लिंकचा वापर करू शकता. यासाठी तुम्हाला (https://wa.me/phonenumber) URL चा वापर करायचा आहे आणि फोन नंबरच्या जागी देशाचा कोड तसेच मोबाईल नंबर टाकायचा आहे. नंतर लिंक क्रोममध्ये सर्च करा आणि चॅटवर क्लिक करा . त्यानंतर त्या नंबरसाठी चॅट बाँक्स ओपन होईल आणि तुम्ही मॅसेज करू शकता.
ट्रूकॉलर ॲपचा वापर
ट्रूकॉलर ॲपच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही मॅसेज करू शकता . यासाठी तुम्हाला नंबर सेव्ह करावा लागणार नाही . यासाठी तुम्हाला ट्रूकॉलर ॲप डाउनलोड करावी लागेल . नंतर त्यावर त्या व्यक्तीचा नंबर शोधावा लागेल . ज्याला तुम्हाला मॅसेज पाठवायचा आहे , त्या प्रोफाइलवर क्लिक करा आणि व्हाट्सअँप आयकॉनवर क्लिक करा . या नंतर तुम्ही सुलभपणे मॅसेज पाठवू शकता .
व्हाट्सअँप ग्रुपचा वापर
तुम्ही ऍड असलेल्या ग्रुपमध्ये एखादी व्यक्ती ऍड असल्यास त्या व्यक्तीला मॅसेज करू शकता , यासाठी नंबर सेव्ह करण्याची गरज भासणार नाही . हि पद्धत सर्वात सोपी आहे . हि पद्धत वापरण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला ग्रुप चॅट ओपन करावा लागेल . नंतर पार्टिसिपेंट्सवर क्लिक करावे आणि व्यक्तीचा नंबर शोधून तुम्हाला मॅसेज करता येईल.
न्यू चॅटचा वापर
तुम्ही स्वतःला मॅसेज करून देखील नंबर सेव्ह न करता मॅसेज पाठवू शकता. यासाठी तुम्हाला प्रथम न्यू चॅटवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर मॅसेज युअर सेल्फ हा पर्याय निवडायचा आहे. स्वतःला तो नंबर सेंड करून त्या नंबरवर क्लिक करा . या प्रोसिजर नंतर चॅट विथ धिस नंबर या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमचे काम सोपे होईल . या पद्धती वापरून तुम्ही नंबर सेव्ह न करता सहजपणे एखाद्या व्यक्तीला मॅसेज करू शकता .
Post Office Scheme | आजकाल सगळ्या लोकांना गुंतवणुकीचे महत्त्व चांगलेच पटलेले आहे. त्यामुळे अनेक लोक हे आपल्या उत्पन्नातील काही ना काही भाग भविष्यासाठी गुंतवून ठेवत असतात. जेणेकरून भविष्यात कोणतीही आर्थिक अडचण आली, तरीही त्याला आपण सहजपणे सामोरे जाऊ शकतो. बचत करण्याचे सध्या मार्केटमध्ये विविध पर्याय उपलब्ध आहेत. परंतु अनेक लोक पोस्ट ऑफिस मध्ये गुंतवणूक करतात. कारण पोस्ट ऑफिसची योजना (Post Office Scheme) ही एक विश्वासहार्य योजना आहे. गेल्या अनेक वर्षापासून ही योजना लोकांसाठी कार्यरत आहे. आणि ज्यातून लोकांना खूप चांगला परतावा देखील मिळालेला आहे.
पोस्ट ऑफिसमध्ये (Post Office Scheme) अगदी लहान मुलांपासून ते वृद्ध लोकांपर्यंत अनेक योजना आहेत. ज्याचा फायदा सगळ्यांनाच होत असतो. अशातच आता पोस्ट ऑफिसची एक पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून तुम्ही जर ठराविक रक्कम गुंतवली तर तुम्हाला चांगला परतावा देखील मिळेल. या पोस्ट ऑफिसच्या योजनेमध्ये तुम्हाला 7.4% व्याजदर मिळते. तसेच मॅच्युरिटीनंतरही खूप चांगला परतावा मिळेल.
पोस्ट ऑफिस (Post Office Scheme) मासिक उत्पन्न योजनेमध्ये तुम्हाला 5 वर्ष गुंतवणूक करावी लागेल. या योजनेत तुम्ही केवळ 1 हजार रुपयांची गुंतवणूक करून देखील तुमचे खाते चालू करू शकता. या मासिक उत्पन्न योजनेमध्ये गुंतवणूक करण्याची मर्यादा ही 9 लाख रुपयांपर्यंत आहे. तसेच तुमचे जर जॉईंट अकाउंट असेल तर तुम्ही या योजनेमध्ये 15 लाख रुपयांपर्यंत देखील गुंतवणूक करू शकता. या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला मॅच्युरिटी नंतर दर महिन्याला उत्पन्न चालू होईल. या योजनेत तुम्ही मॅच्युरिटी आधी देखील अकाउंट बंद करू शकत नाही. तर तुम्ही तीन वर्षाच्या आधी हे पैसे काढले, तर तुम्हाला दोन टक्के चार्ज द्यावे लागेल, तर पाच वर्षाच्या आधी बंद केले तर 1 टक्का चार्ज द्यावा लागेल.
पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये तुम्ही 5 वर्षासाठी 5 लाख रुपयांचे गुंतवणूक केली, तर त्यावर तुम्हाला 7.4% एवढा व्याजदर मिळेल. म्हणजेच तुम्हाला महिन्याला 3084 रुपये मिळणार आहे. जर तुम्ही या योजनेत 9 लाख रुपयांची गुंतवणूक केली, तर तुम्हाला महिन्याला 5550 रुपये मिळणार आहे. जर तुम्हाला या योजनेत अर्ज करायचा असेल, तर तुम्ही तुमच्या जवळील पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन या योजनेचा फॉर्म भरावा लागेल. तसेच तुम्हाला तिथे पॅन कार्ड आधार कार्डचे फोटो असे आवश्यक कागदपत्र देखील जमा करावे लागतील.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दक्षिण कोरियाच्या स्मार्टफोन निर्माता सॅमसंगने Galaxy Z Fold 6 Special Edition स्मार्टफोन लाँच केला आहे. काही महिन्यापूर्वी त्यांनी Galaxy Z Fold 6 हा फोन बाजारात आणला होता . हा नवीन फोल्डेबल फोन आधीच्या फोन पेक्षा पातळ आहे. तसेच नवीन फीचर्सने परिपूर्ण असून , लवकरच हा फोन ग्राहकांसाठी बाजारपेठेत उपलब्ध होणार आहे. तसेच यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काही कुपन सवलती देखील दिल्या आहेत.
सॅमसंगचे नवीन एडिशन
या स्मार्टफोनचा डिस्प्ले सामान्य Galaxy Z Fold 6 च्या तुलनेत थोडा मोठा आहे. यात 8 इंचाचा एक्सटर्नल डिस्प्ले आणि 6.5 इंचाची इंटरनल स्क्रीन आहे. हा नवीन फोन Galaxy Z Fold 6 च्या तुलनेत 1.5 मिमी पातळ आणि तीन ग्रॅम हलका आहे. Galaxy Z Fold 6 Special Edition मध्ये 200 मेगापिक्सलचा वाइड-अँगल प्रायमरी कॅमेरा आहे. तसेच त्यांनी इतर कॅमेऱ्यांमध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत. नवीन एडिशनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर आहे. या स्मार्टफोनमध्ये 16 GB RAM आणि 512 GB स्टोरेज आहे. हा सॅमसंगच्या फीचर्स असलेल्या स्मार्टफोन्स आणि इतर डिव्हाइससाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) फीचर्स Galaxy AI देखील पाहण्यास मिळेल. तसेच हा स्मार्टफोन ग्राहकांना काळ्या रंगात खरेदी करता येईल.
सॅमसंगचे इतर मॉडेल्स
सणासुदीच्या काळात पहिल्या स्मार्टफोनची विक्री 11 टक्क्यांनी वाढली आहे. हा सेल 11 दिवस चालला होता. या सेलचा कालावधी सात ते आठ दिवसांचा असतो . स्मार्टफोनच्या विक्रीच्या दृष्टीने सॅमसंगने पहिले स्थान मिळवले आहे. त्याने सुमारे 20 टक्के मार्केट शेअर मिळवला आहे.कंपनीसाठी Galaxy M35, Galaxy S23, Galaxy A14 आणि Galaxy S23 FE हे सर्वाधिक विकले जाणारे मॉडेल्स ठरले आहेत.
फोनची किंमत
सुरुवातीला हा स्मार्टफोन फक्त दक्षिण कोरियामध्ये उपलब्ध असेल. या फोनची किंमत 2789600 KRW म्हणजे सुमारे 170000 रुपये आहे. या फोल्डेबल स्मार्टफोनची विक्री 25 ऑक्टोबरपासून सॅमसंगच्या वेबसाइट्स आणि इतर ऑनलाइन स्टोअर्सवरून होईल. Galaxy Z Fold 6 खरेदी करणाऱ्या ग्राहकांना सॅमसंगच्या Galaxy Ring, Galaxy Watch Ultra, Galaxy Buds 3 Pro आणि Galaxy Tab S10 Ultra सारख्या उत्पादनांवर सवलतीचे कूपन दिले जातील. त्यामुळे ग्राहकवर्गाला जास्त उत्सुकता लागली आहे
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | बीएसएनएल (BSNL) ही टेलिफोन कंपनी सध्या चांगलीच आघाडीवर आहे. जुलै महिन्यामध्ये अनेक लोकप्रिय टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या रिचार्जच्या दरामध्ये वाढ केल्यामुळे अनेक ग्राहक हे बीएसएनएलकडे वळाले. बीएसएनएल ही एक सरकारी टेलिकॉम कंपनी आहे. टेलिकॉम कंपनी लवकरच त्यांच्या ग्राहकांसाठी 5G सेवा करणार आहे. देशातील अनेक ठिकाणी ही 4G सेवा चालू देखील झालेली आहे. येत्या जूनमध्ये 5ग सेवेची घोषणा देखील बीएसएनएल करू शकते. या कंपनीने आज दिल्लीत आयोजित झालेल्या एका कार्यक्रमात त्यांच्या कंपनीचा नवीन लोगो आणि घोषवाक्य लाँच केलेले आहे. तसेच कंपनीने 7 नवीन सेवा देखील जाहीर केलेल्या आहेत.
बीएसएनएलने बदलला लोगो
कंपनीने याआधी 2000 साली त्यांचा लोगो बदलला आहे. आणि घोषवाक्य देखील आता बदलण्यात आलेले आहे. बीएसएनएलचा लोगोमध्ये या आधी निळे आणि लाल बाण होते. पण ते आता पांढरे आणि हिरव्या रंगाचे झालेले आहेत. तसेच लोगोमध्ये राखाडी रंगाचे वर्तुळ आहे. जे आता पूर्णपणे बदललेले आहेत. या लोगोचे डिझाईन पूर्वीसारखेच ठेवण्यात आलेले आहेत. मध्यभागी असलेल्या वर्तुळाचा रंग भगवा करण्यात आलेला आहे. आणि वर्तुळात भारताचा नकाशा दाखवण्यात आलेला आहे.
Today, the Hon’ble Minister Shri @JM_Scindia Ji will be launching the new logo of @BSNLCorporate along with 7 new services in New Delhi.
The launch marks the dawn of a transformative era of the service provider, reaffirming its commitment to provide seamless, universal,… pic.twitter.com/UldPWaJ2Sn
सरकारने या नवीन बीएसएनएलच्या लोगोमध्ये भारतीय ध्वजाचे तिन्ही रंग वापरलेले आहेत बीएसएनएल जे जुने वाक्य हे कनेक्टिंग इंडिया असे होते ते बदलून आता कनेक्टिंग भारत असे करण्यात आलेले आहेत. बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कंपनीच्या या नवीन लोगोचे अनावरण केलेले आहे. आता एआय द्वारे स्पॅम कॉल आणि मेसेज ब्लॉक करण्याचे तंत्रज्ञान देखील विकसित केलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या युजर्सला आता स्कॅमरचे कॉल आणि मेसेज नेटवर्क ब्लॉक केले जाणार आहे.
बीएसएनएलच्या कंपनीने आता पूर इतर नैसर्गिक आपत्तीच्या वेळी कनेक्टिव्हिटीसाठी कम्युनिकेशन रिस्पॉन्स कम्युनिकेशन सेवा सुरू केलेली आहे. अशा वेळी सरकार मदत करणार आहेत. आणि बाधित भागात कनेक्टिव्हिटी प्रदान करणार आहे.
Jio Recharge Plan | देशातील अनेक टेलिकॉम कंपन्या या दिवाळीच्या शुभमुहूर्तावर वेगवेगळ्या रीचार्जच्या सुविधा देत आहेत. जुलै महिन्यामध्ये जिओ, एअरटेल, वोडाफोन आयडिया या कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली होती. त्यानंतर अनेक ग्राहक हे नाराज झालेले होते. आणि त्यांनी त्यांचे सिम देखील पोर्ट केलेले होते. परंतु आता या कंपन्या त्यांच्या ग्राहकांना परत आणण्यासाठी आणि खुश करण्यासाठी वेगवेगळे रिचार्ज प्लॅन (Jio Recharge Plan) लॉन्च करत आहेत. अशातच आता रिलायन्स जिओने त्यांच्या ग्राहकांसाठी एक अतिशय चांगला डाटा प्लॅन लॉन्च केलेला आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड इंटरनेटचा लाभ मिळतो. ज्या लोकांना दिवसभर जास्तीत जास्त इंटरनेट लागते. त्यांच्यासाठी ही आपल्या अत्यंत फायद्याचा प्लॅन आहे.
जिओचा 101 रुपयाचा प्लॅन | Jio Recharge Plan
जिओने 101 रुपयांचा प्लॅन लॉन्च केलेला आहे. या 101 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड डेटा मिळत आहे. सहा जीबी डेटा दिला जातोय. या रिचार्ज प्लॅन मध्ये तुम्हाला दररोज 1.5 जीबी डेटा प्लॅन मिळेल.ज्या लोकांना दररोज जास्त इंटरनेटची आवश्यकता असते. त्यांच्यासाठी हा खास इंटरनेट प्लॅन जिओने लॉन्च केलेला आहे. याचा लाभ चांगलाच होणार आहे.
या आधी देखील जिओने (Jio Recharge Plan) त्यांच्या ग्राहकांसाठी विविध डेटा प्लॅन आणलेले आहेत. ज्यामुळे लोकांना फायदा झालेला आहे. जिओने त्यांच्या ग्राहकांना कमीत कमी किमतीमध्ये जास्तीत जास्त फायदा कसा होईल. अशा प्रकारचे प्लॅन लॉन्च करत असतात. अशातच आता जिओने दिवाळी आधी 101 रुपयांचा रिचार्ज प्लॅन आणून त्यांच्या ग्राहकांना एक प्रकारचा बोनसच दिलेला आहे.
डिझेल वाहनधारकांसाठी मोठी बातमी आहे. कारण भारतात डिझेल वाहनांवर बंदी घालण्यासाठी सरकारने ब्लू प्रिंट तयार केली आहे. भारतातील सतत वाढत असलेल्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. आजच्या दिवसाबद्दल बोलायचे झाले तर राजधानी दिल्ली NCR मध्ये AQI पातळी 500 च्या पुढे गेली आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार चिंताग्रस्त झाले आहे. मात्र, याआधीही डिझेल वाहनांचे आयुर्मान केवळ 10 वर्षे होते. पण आता सरकार त्यांच्या विक्रीवरही बंदी घालणार आहे.. तुम्हीही डिझेल व्हॅन घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही आता हा पर्याय निवडू शकता. यापूर्वी देखील मंत्री नितीन गडकरी यांनी डिझेल वाहनांच्या बंदीबाबत भाष्य केले होते.
पर्याय निवडण्यावर भर
मीडिया रिपोर्ट्सनुसार, डिझेल वाहनांमुळे सर्वाधिक प्रदूषण होते. त्यामुळे त्यावर तातडीने बंदी घालण्यात यावी. आता ईव्ही वाहनांना प्रोत्साहन दिले जाईल, असा युक्तिवादही मांडण्यात आला आहे. इतकंच नाही तर सरकार काही दिवसांत ईव्हीवर सबसिडी योजनाही जाहीर करणार आहे. ऊर्जा संक्रमण सल्लागार समितीने 2027 पासून डिझेल वाहनांच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्याची शिफारस केली आहे. म्हणजे तुम्ही डिझेल वाहन फक्त अडीच वर्षे चालवू शकता. त्यानंतर, कार कंपन्याही डिझेल वाहनांची विक्री बंद करण्याची शक्यता आहे.
सुरुवातीला येथे बंदी असेल
सुरुवातीला देशातील काही निवडक शहरांमध्ये डिझेल वाहनांवर बंदी घालण्यात येणार आहे. यासाठी ही मानके निश्चित करण्यात आली आहेत. ज्या शहरांची लोकसंख्या 10 लाखांपेक्षा जास्त आहे. अशा शहरांवर सुरुवातीला निर्बंध लादले जातील. हळूहळू डिझेल वाहने देशातून नाहीशी होतील. खरं तर, सध्या देशात 10 वर्षांपेक्षा जुनी डिझेल वाहने चालवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. परंतु नवीन निर्बंधांनुसार यापैकी काही वाहनांचाही या प्रस्तावात समावेश होण्याची शक्यता आहे.
डिझेल वाहन खरेदी न करण्याचा सल्ला
तुम्ही डिझेल वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही ते पुढे ढकलू शकता. कारण डिझेल वाहनांबाबत सरकार आणखी कठोर निर्णय घेणार असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. त्यामुळे तोटा टाळण्यासाठी डिझेल वाहन खरेदीचा निर्णय तूर्तास पुढे ढकलणे योग्य ठरेल. त्यामुळे तुम्ही ईव्ही, पेट्रोल किंवा सीएनजी वाहनांचा पर्याय म्हणून विचार करावा…