दिल्ली : केंद्र सरकारच्या वतीने ‘इंस्टीट्यूशन ऑफ एमिनेंस’ ची लिस्ट जाहीर करतानाच सरकारवर टीकेची झोड उठली आहे. कारण स्थापना न झालेल्या जिओ इंस्टीट्यूशनला या यादीत स्थान मिळाले आहे. सरकारचा जिओ प्रति एवढा लागाव का असा प्रश्न सर्वत्र विचारला जात आहे.
जिओ इंस्टीट्यूशनच्या स्थापनेसाठी रिलायन्स
फाउंडेशनकडे कार्यवाहीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सरकारच्या वतीने उत्तरादाखल असे सांगण्यात आले आहे की जिओ इंस्टीट्यूशनच्या भविष्य कालीन नियोजनावरून असे दिसून येते की हे इंस्टीट्यूशन उत्कृष्ठ म्हणून नावारूपास येईल.
स्थापने आधीच जिओ इंस्टीट्यूशनला उत्कृष्ठ इंस्टीट्यूशन म्हणून सरकारने केले जाहीर, सर्वत्र टीकेची झोड
नाट्यमय हालचाली नंतर झाले महाक्षय आणि मदालसा शर्मा यांचे लग्न.
मुंबई : मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा महाक्षय याच्या मागे काही दिवसापूर्वी पोलिसांची ससेमिरी लागली होती. एका मुलीवर सतत बलात्कार करून तिला गर्भपात करण्यासाठी मजबूर करण्यात आल्याचा आरोप महाक्षय आणि त्याची आई योगिनी हिच्या वर ठेवण्यात आला होता. मुंबई उच्च न्यायालयाने या दोघांचा अटक पूर्व जामीन फेटाळला होता. परंतू नंतर दिल्लीच्या रोहिणी सत्र न्यायालयाने त्यांना जमीन दिला.
७ जुलै रोजी होणारे महाक्षय आणि मदालसा शर्मा यांचे लग्न आज पार पडले. मिथुन चक्रवर्ती यांच्याच उटीच्या पंचतारांकित हॉटेल मध्ये हे लग्न पार पडले आहे. मदालसा शर्मा या सिने अभिनेत्री आहेत. हिंदी चित्रपटात काम करण्या अगोदर त्यांनी ‘फिटिंग’ या तेलगू चित्रपटात काम केले होते.
सोनाली बेंद्रेने कापले केस
लंडन : सिने अभिनेत्री सोनाली बेंद्रे कॅन्सर सारख्या जर्जर आजाराने त्रस्त असून मागील काही दिवसात तिने आपणाला कॅन्सर झाला असल्याचे सोशल मीडियावर जाहीर केले होते. सोनली बेंन्द्रे सध्या लंडन येथे उपचार घेत असून तिला उपचारादरन्यान स्वत:चे केस कापावे लागले आहेत. कॅन्सर रुग्णांना दिली जाणारी किमो थेरेपीची ट्रीटमेंट शरीरा वरचे सर्व केस नाहीसे करते. त्याचीच तयारी म्हणून सोनालीने केस कमी केले आहेत. केस कमी करते वेळीचा व्हिडीओ सोनालीने इन्स्टाग्राम वर पोस्ट केला आहे. त्या व्हिडीओमध्ये सोनाली केस कापतेवेळी रडताना दिसत आहे. सोनाली बेंन्द्रेच्या प्रकृतीत सुधारणा होत असून ती लवकरच भारतात परतणार आहे असेही म्हणले जात अाहे.
समलिंगी प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात आज समलिंगी प्रकरणावर सुनावणी सुरु झाली आहे.समलिंगी संबंधांना बेकायदेशीर ठरवणारे भारतीय दंड संहितेचे कलम ३७७ रद्द करण्यात यावे यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्या गेलेल्या दोन खटल्यांवर आज सर्वोच्च न्यायालयात एकत्रित सुनावणी झाली. याचिकाकर्त्याच्या वतीने आज बाजू मांडण्यात आली. अरविंद दातार यांनी याचिकाकर्त्यांच्या वतीने बाजू मांडली. तर सरकारच्या बाजूने तुषार मेहता यांनी बाजू मांडली.
आज आणि उद्या सलग दोन दिवस खटल्याची सुनावणी चालणार आहे.या खटल्याची सुनावणी एक महिन्या नंतर घ्यावी अशी मागणी सरकारच्या वतीने करण्यात आली परंतु न्यायालयाने सुनावणी पुढे ढकळण्यास नकार दिला
संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा उरुळी कांचनमध्ये विसावा, उरुळीला आले यात्रेचे स्वरूप
पुणे : संत तुकाराम महाराजांच्या पालखीने आज लोणी काळभोर वरून प्रस्थान करून उरुळी कांचन मध्ये दुपारचा विसावा घेतला आहे. दरम्यान उरुळीत वैष्णवांचा मेळा अवतरल्याने उरुळी कांचनला यात्रेचे स्वरूप आले आहे.तुकाराम महाराजांची पालखी उरुळीचा विसावा घेऊम यवतला मुक्कामी जाणार आहे.
भिडे गुरुजीचे ते भाषण तपासण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
पुणे : आपल्या बेताल वक्तव्याने सतत चर्चेत राहणारे आणि भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात संशयित असलेले संभाजी भिडे गुरुजी यांनी पुन्हाएकदा वादग्रस्त विधान केले आहे. रविवारी पुण्यातील जंगली महाराज मंदिरात भाषण देत असताना “मनू सर्व संतांपेक्षा श्रेष्ठ असल्याचे त्यांनी म्हणले आहे. आता गृहविभागा कडून तपासण्यात येणार आहे.
शनिवारी ७ जुलै रोजी पुण्याच्या जंगली महाराज मंदिरात भिडे गुरुजींनी दिलेल्या भाषणात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पेक्षा मनु श्रेष्ठ असल्याचे वक्तव्य भिडे गुरुजीनी केले होते. त्यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अाज विधानसभेत भिडे गुरुजींच्या मुद्यावर घेरण्याचा विरोधकांनी प्रयत्न केला. त्याला उत्तर देताना ‘भिडे गुरुजींचे जंगली महाराज मंदिरातील भाषण आम्ही तपासू आणि भिडे गुरुजी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू” असे मुख्यमंत्र्यानी जाहीर केले. यासंदर्भात सरकारने आपली भुमिका स्पष्ट करावी अशी मागणी विरोधकांनी केली असता, ‘आम्ही मनूचा कदापि पुरस्कार करणार नाही’ असे फडणवीसांनी सांगीतले.
उत्तर प्रदेशात वाढणार मोदींच्या चकरा
टीम HELLO महाराष्ट्र : दिल्लीचा रस्ता उत्तर प्रदेशातून जातो ही भारतीय लोकशाहीची सर्वर्स्वीकार्य म्हण आहे. लोकसभेची निवडणूक जसजशी जवळ येईल तशी रणनितीला चुरस चढणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून जुलै महिन्यात पंतप्रधान नरेंन्द्र मोदी उत्तर प्रदेशात चार दौरे काढणार असल्याचे समजत आहे. या दौऱ्याची वैशिष्ट्यपूर्ण बाब ही की मोदी मुलायमसिंग यादव यांच्या बालेकिल्ल्यात दौरा काढणार आहेत.
पहिला दौरा – नोएडा (९ जुलै २०१८)
या दौऱ्यासाठी मोदी नोएडाला दिल्लीहून थेट येणार असून त्यांच्या सोबत दक्षिण कोरियाई राष्ट्रपति मून जे -इन असणार आहेत. सॅमसंगच्या भारतात बनणाऱ्या पहिल्या युनिटला भेट देणे हे या दौर्याचे औचित्य असणार आहे. भारत हा मोबाईल खरेदी करणारा देश आहे. या देशात मोबाईल खरेदीचा आकडा मोठा आहे म्हणून इथल्या लोकांना रोजगार देण्याच्या उद्देशाने हे युनिट उभारले आहे. या कार्यक्रमात उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सहभागी होणार आहेत.
आजमगड (१४ जुलै २०१८)
या दिवशी नरेंद्र मोदी मुलायमसिंग यादव यांच्या बालेकिल्ल्यात दाखल होणार आहेत. येथे ते पूर्वांचल एक्सप्रेस वे ची कोनशीला बसवणार आहेत. हा महामार्ग उत्तर प्रदेशाची राजधानी लखनव ते बालिया असा आहे. या महामार्गांने यु.पी. चा चेहरा मोहराच बदलून जाणार आहे.
वाराणसी ( १५ जुलै २०१८)
होमी भाभा कॅन्सर रुग्णालयाचा कोनशीला समारंभ नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आयोजला आहे. तसेच काशी हिंदू विद्यापीठाला मोदी भेट देऊन महामना पं मदन मोहन मालवीय कैसर सेंटरची पहाणी करणार आहेत. तसेच नमामि गंगे प्रकल्पात बनलेल्या समेत शहरात स्थित पंच कोशी परिक्रमा मार्ग याची कोनशीला मोदींच्या हस्ते बसवली जाणार आहे.
लखनव ( २९ जुलै २०१८)
२९ जुलै रोजी मोदी उत्तर प्रदेशची राजधानी लखनव स्थित इंदिरा गांधी प्रतिष्ठानमध्ये शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मोदी प्रमुख अतिथी आहेत.
सुरज शेंडगे
अजितदादांनी विधानसभा अध्यक्षांनाच धरले धारेवर
नागपूर : विधान भवन परिसरात साचलेल्या पाण्याची पहाणी करण्यासाठी गेलेल्या विधानसभा अध्यक्षांचा फोटो काल प्रचंड व्हायरल झाला. नेमका हाच मुद्दा पकडून राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांनी अध्यक्षांना धारेवर धरले. अजितदादांनी चक्क अध्यक्षांनाच घेरल्याने सभागृहात हसावं की रडावं अशी स्थिती झाली होती. ‘ कोणीतरी आपला असा फोटो काढेल याचे भान ठेवून तुम्ही वागायला पाहिजे होते. तुमचा असा फोटो व्हायरल होणे हा विधानसभेचा अपमान आहे’ असे अजितदादा सभागृहात म्हणाले. त्यावर बोलताना ‘तातडीच्या मुद्यावर शिष्टाचार बाजूला ठेवून पुढे जावे लागते’ असे म्हणत अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी सारवा सारव केली.
आज अजितदादा यांनी अध्यक्षासहित सरकारवर ही टीकास्त्र सोडले. सरकार हट्टाला पेटले असून सरकारने केवळ हट्टासाठीच पावसाळी अधिवेशन नागपूरला घेतले असा आरोप अजित पवार यांनी यावेळी केला आहे.
आता सर्वोच्च न्यायालयाचे थेट प्रक्षेपण
दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज कसे चालते आणि कोर्ट नेमके करते काय असा प्रश्न नेहमीच सर्वसामान्य लोकांना पडत असतो. या प्रश्नांची उत्तरे आता मिळणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज आता लाइव्ह होणार आहे. न्यायालयात चालणाऱ्या कामकाजाचे आता थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.
न्या.चंद्रचूड यांनी एका खटल्याचा निकाल देताना “न्यायालय हे खुले आहे” असे मत व्यक्त केले होते. इथले कामकाज पाहण्याकरता सर्वांसाठी खुले आहे असे त्यांनी म्हणले होते. आता त्या निकालाच्या आधारे सर्वोच्च न्यायालयाने कामकाजाचे थेट प्रसारण करण्याचा निर्णय घेतला आहे. न्यायिक सुधारणा करण्याचा केंद्र सरकारचा अधिकार आहे असे यांसंबधी बोलताना न्यायालयाने म्हणले आहे. केंद्र सरकारने सहमती देऊन नवीन नियमावली बनवावी असे मत सर्वोच्च न्यायालयाने मांडले आहे.
थेट प्रक्षेपण झल्यास सरन्यायाधीशांच्या कोर्टरूमचे प्रक्षेपण केले जाईल असे न्यायालयाने म्हटले आहे. अटॉर्नी जनरल केके वेणुगोपाल यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
माऊलीच्या पालखीने ओलांडला कठीण दिवे घाट
पुणे : सकाळी पुण्याहून निघालेल्या माऊलीच्या पालखीने आज कठीण असा दिवे घाट ओलांडला असून पालखी झेंडेवाडीच्या विसाव्यावर विसावा घेऊन सासवडकडे मार्गस्थ झाली आहे. सासवड जवळील दिवे घाट ओलांडणे हे माऊलीच्या पालखी समोरचे दिव्य असते. घाटातील कठीण चढ ओलांडण्यासाठी यावर्षी चार अतिरिक्त बैल जोड्या जुंपण्यात आल्या होत्या. दिवे घाटातील हा सोहळा पाहून डोळ्यात साठवण्यासाठी भाविकांनी आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी दिवे घाटात अलोट गर्दी केली होती.










