Monday, December 15, 2025
Home Blog Page 6776

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांबरोबरच्या चकामकीमध्ये १ जवान व १ पोलीस शहीद

thumbnail 15245584335101
thumbnail 15245584335101

श्रीनगर:जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्राल परिसरातील लाम गावामध्ये भारतीय लष्कर व दहशतवाद्यांमध्ये गोळीबार सुरू असून या चकमकीत एक जवान व एक पोलीस शहीद झाल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी परिसराला घेराव घालत शोधमोहीम सुरू केली. यावेळी दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला.

संग्रहित छायाचित्र

त्यास जवानांनी चोख प्रत्युत्तरदेखील दिले. यावेळी भारतीय लष्कराला याठिकाणी दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार भारतीय लष्कराने हि कारवाई केली आहे.

लेनिन नंतर आता पेरियार याच्या पुतळ्याची विटंबना

तमिळनाडु : त्रिपुरानंतर आता तमिळनाडूमधे महापुरुषाच्या पुतळ्यांची तोडफोड होण्याचा प्रकार घडला आहे. बेलोनिया येथे लेनिन यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली होती तर आज तमिळनाडूमधील वेल्लोर येथे द्रविडीयन समाजसुधारक रामासामी उर्फ पेरीयार यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रकार घडला आहे. भाजपा राज्य सचिव एच. राजा यांनी ‘पेरियार यांचा पुतळासुद्धा उखडून टाकू’ अशा अाशयाची फेसबुक पोस्ट लिहील्यानंतरच सर्व प्रकार घडला असल्याचे बोलले जात आहे. एच. राजा यांनी मात्र अजुन काहीही स्पष्टकरण दिलेले नसून त्यांनी त्यांची वादात्मक फेसबुक पोस्ट डिलीट केली आहे. पोलिसांनी दोन संशयीतांना अटक केली असून पुढील तपास चालू आहे.

सभागृहातच चंद्रकांतदादा माझ्या अंगावर आले : आमदार कपिल पाटील

मुंबई : ‘मी तुला बघून घेईन’ अशी धमकी देत चंद्रकांतदादा अक्षरश; माझ्या अंगावर धावून आले. हा गुंडागर्दीचा प्रकार चक्क विधानपरिषदेमधेच घडला असून प्रशांत परिचारक यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर मी सभागृहात प्रश्न विचारल्यानेच माझ्यावर अशा प्रकारे हल्ला झाला आहे असा गंभीर आरोप शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी केला आहे.

प्रशांत परिचारक यांनी सैनिकांच्या पत्नींबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी विधानपरिषदेत मोठा गोंधळ झाला. प्रशांत परिचारक यांच्याबद्दल प्रश्न विचारल्यामुळेच चंद्रकांतदादा आपल्या अंगावर धावून आले असल्याचे कपिल पाटील यांचे म्हणणे आहे.

“तुला बघून घेतो, बदडून काढतो”, अशी धमकी राज्याचे महसूलमंत्री देत असतील, तर परिस्थिती गंभीर आहे.”, असे मत कपिल पाटील यांनी व्यक्त केले. प्रशांत परिचारकरांनी जो शब्दप्रयोग केला, ती परंपरा या सरकारला मान्य आहे काय? हा माझा प्रश्न आहे. जर तसे नसेल तर त्याचा खुलासा सरकार का करत नाही?. सत्ताधारी पक्ष परिचारकांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे, विचारधारेचे समर्थन करते की नाही, हे सरकारने स्पष्ट करायला हवे. स्पष्टकरण देण्याऐवजी चंद्रकांतदादा सभागृहात ज्याप्रकारे भाषा वापरत होते, ती अतिशय निकृष्टदर्जाची होती आणि वेदनाजनक होती.” असे कपिल पाटील म्हणाले.https://youtu.be/gpFCAc49m6c

हे जम्मू नाही तर जालना आहे

fb img 1518334682619
fb img 1518334682619

जालना ता.११ : मराठवाडा आणि विदर्भात गारपीटीसह पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. गारपीटीने शेतपिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याचे समजत आहे.

सकाळी झालेल्या गारांच्या पावसामुळे काहीकाळाकरीता जालना आणि परिसराला जम्मू कश्मिरचे रुप आले होते. जालना, वाशिम, बुलडाणा, अकोला आणि बीडमध्ये गारपिटीसह पाऊस पडला. जालन्यात १५ मिनिटे मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. गहू, हरभरा, द्राक्षे, आंबा आदी पिकांचे नुकसान झाले. अंबड, मंठा तालुक्यातही गारांसह पाऊस कोसळला. रस्त्यांवर गारांचा खच पडला होता. बीड जिल्ह्यातील अनेक भागांत गारा आणि पाऊस पडला. धुळे शहरात पावसाच्या सरी बरसल्या. वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील वाकद, महागाव आणि बेलखेड परिसरात गारपीट झाली. बुलडाण्यालाही गारांनी तडाखा दिला.