हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Toll Rules In India । प्रवास म्हंटल कि टोल हा भरावा लागतोच. आपल्या भारतात दुचाकीला टोल नाही, परंतु चारचाकी, ट्रक किंवा इतर गाडयांना टोल भरावा लागतो. टोल बाबत मागील काही दिवसांत सरकारकडून नवनवीन नियम जारी करण्यात आलेत. यातीलच एक नियम म्हणजे आता टोल प्लाजा पासून 20 किलोमीटरच्या परिसरात राहणाऱ्या लोकांना टोल भरावा लागत नाही. म्हणजेच काय तर जर तुमचे घर टोल प्लाजा पासून जवळच असेल तर तुम्हाला टोल टॅक्स भरावा लागणार नाही, तुमच्या पैशाची बचत होणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे देशभरातील लाखो प्रवाशांना फायदा होतोय.
२४ सप्टेंबर २०२४ पासून लागू झालेल्या ‘जितनी दूरी उतना टोल’, या धोरणांतर्गत (Toll Rules In India) जीएनएसएस प्रणालीद्वारे ट्रॅक केलेल्या वाहनांना २० किमीपर्यंतच्या प्रवासासाठी टोल सूट लागू केली आहे. यासाठी आपल्याला निवासस्थानाचा पुरावा म्हणून अधिकृत कागदपत्र सादर करावे लागतील. गेल्या वर्षी सुरु झालेल्या या नव्या धोरणाअंतर्गत एक खास प्रणाली ऍक्टिव्ह करण्यात आली आहे. या खास प्रणालीला जीएनएसएस प्रणाली असे संबोधले जाते आणि या प्रणाली द्वारे ट्रॅक करण्यात आलेल्या वाहनांना वीस किलोमीटरच्या परिघात टोल सुट लागू केली जाते. ज्यांचे घर तोल नाक्या पासून जवळ आहे अशा लोकांसाठी सरकारचा हा नवा टोल नियम फायदेशीर ठरतोय. Toll Rules In India
देशात कोणकोणत्या वाहनांना सूट ? Toll Rules In India
आपल्या भारतात अनेक गाडयांना तोल माफी मिळते. यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या अधिकृत वाहने, पोलीस वाहने, रूग्णावाहिका आणि अग्निशमन दलाच्या गाड्यांनाही टोलमधून सूट मिळतेय . तसेच भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या वाहनांनाही कोणत्याही प्रकारचा टोल आकारला जात नाही. शिवाय, एनडीआरएफच्या वाहनांनाही टोलमधून सूट आहे. दरम्यान, सर्वसामान्य प्रवाशांसाठी अलीकडेच सरकारने टोल संदर्भात एक सकारात्मक निर्णय घेतला आहे. त्यानुसार, केंद्र सरकारच्या अखत्यारीतील महामार्गांवर प्रवास करण्यासाठी आता एक विशेष पास उपलब्ध करून देण्यात आला आहे. ३००० रुपयांचा हा वार्षिक पास असून या पासच्या माध्यमातून तुम्ही प्रवास करू शकता.










