सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्ह्यातील पाचगणी परिसरात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्व रस्ते जलमय झाले आहेत. अनेक रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले झाल्यामुळे रस्त्यावरील सर्व वाहतूक ठप्प झाली आहे. अतिवृष्टीमुळे पसरणी घाटामध्ये ठिकाणी दरडी कोसळल्या असून दगड-गोटे रस्त्यावर आले आहेत. त्यामुळे स्थानिक प्रशासनाच्यावतीने घाटरस्ता वाहतुकीसाठी बंद केला असून
प्रवाशांनी या घाट रस्त्यातून प्रवास न करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
पसरणी घाटात सध्या अतिवृष्टीमुळे दरडी कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या ठिकाणी असलेल्या दऱ्या-खोऱ्यांतील घरांमध्ये लोकांना जीव मुठीत धरून राहावे लागत आहे. तर पसरणी घाटात दर्दी कोसळलेल्या घडलेल्या घटनेत काहींचा जीवही गेल्याची शक्यता वर्तविली जात आहे. या घाट रस्त्यामार्गे जाणार्या प्रवाशानाही कोणत्याही क्षणी आपल्यावर दरड कोसळेल व आपला जीव जाईल याची भेटी वाटत आहे.
दरम्यान, पाचगणी पोलीस स्टेशनच्यावतीने हद्दीतील नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात आले आहे कि, पाचगणी परिसरात गेली दोन दिवसांपासून अतिवृष्टी होत असल्याने पसरणी घाट तसेच महाबळेश्वर जाणारा रस्ता याठिकाणी जागोजागी दरडी कोसळल्या आहेत. रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने रस्ता बंद असुन अजूनही दरड कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदर रस्त्याने कोणी प्रवास करू नये, असे आवाहन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पवार यांनी केले आहे.