नवी दिल्ली । तब्ब्ल 18 वर्षांनंतर न्यूझीलंड संघाने पाकिस्तानच्या भूमीवर पाऊल ठेवले होते. पाकिस्तानमध्ये उत्सवाचे वातावरण होते कारण तो 3 सामन्यांमध्ये जगातील नंबर 1 वनडे संघाशी सामना करणार होता मात्र अचानक परिस्थिती बदलली, भावना बदलल्या, आनंद दु: खात बदलला. न्यूझीलंडने रावळपिंडी येथे पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वी स्टेडियममध्ये येण्यास नकार दिला आणि याच्या काही काळानंतर संपूर्ण दौरा रद्द करण्यात आला. न्यूझीलंडने पाकिस्तानच्या सुरक्षा व्यवस्थेचे कारण सांगितले. न्यूझीलंडने अचानक अशी मालिका रद्द केल्यानंतर पाकिस्तानी मीडिया आणि सेलेब्स किवी संघाला शिव्या देत आहेत. पाकिस्तानच्या एका क्रीडा पत्रकाराने न्यूझीलंडला ख्राईस्टचर्च येथील गोळीबाराची आठवण करून दिली.
पाकिस्तानी क्रीडा पत्रकार रोहा नदीमने ट्वीट करून लिहिले,”न्यूझीलंड विसरला आहे की, बांगलादेशचे खेळाडू ख्राईस्टचर्च मशिदीतील गोळीबारापासून काही मिनिटांच्या अंतरावर होते. तेव्हा तुमची गुप्तचर संस्था कुठे होती? जगाने ती गोष्ट विसरली आहे जणू काही घडलेच नाही, मात्र आजही ते पाकिस्तानला भेट देताना संकोच करत आहेत. 2019 मध्ये न्यूझीलंडच्या ख्राईस्टचर्चमध्ये असलेल्या एका मशिदीत गोळीबार झाला होता, ज्यात 49 लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. बांगलादेश संघ त्यावेळी न्यूझीलंडच्या दौऱ्यावर होता आणि संपूर्ण टीम त्याच मशिदीत नमाज पठण करणार होती, मात्र ते तिथे पोहचण्यापूर्वीच गोळीबार झाला.
कोविड दरम्यान पाकिस्तानने केला न्यूझीलंडचा दौरा
न्यूझीलंडवर उपकाराची भाषा वापरत एका पाकिस्तानी चाहत्याने सांगितले की,”कोविड -19 दरम्यान, पाकिस्तानने धोका पत्करून न्यूझीलंडला भेट दिली. कदाचित न्यूझीलंड ते विसरला असेल. न्यूझीलंडने ज्याप्रकारे पाकिस्तानचा दौरा रद्द केला आहे आणि त्यामुळे पीसीबी आणि पाकिस्तानी संघाचे हसू झाले आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी स्वतः न्यूझीलंडच्या पंतप्रधानांशी बोलणी केली होती, मात्र असे असूनही हा दौरा रद्द करण्यात आला.