मालखेड गावच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी पकंज बुरंगे तर उपाध्यक्षपदी बाजीराव माने

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

मालखेड (ता.कराड) येथील महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी पकंज बुरंगे तर उपाध्यक्षपदी बाजीराव माने यांची एकमताने निवड करण्यात आली. गावाच्या विकासाची प्रक्रिया गतिमान व्हावी हा उद्देश ठेवून काही गावपातळीवरील निवडी या ग्रामसभेमध्ये जाहीर करण्यात आल्या. त्यापैकी गावातील तंटे गावपातळीवर शांततेच्या मार्गाने मिटावेत यासाठी निर्माण झालेल्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या मालखेड येथील निवडी ग्रामसभेत जाहीर करण्यात आल्या.

या निवडीबद्दल सरपंच इंद्रजीत ठोंबरे, उपसरपंच युवराज पवार,ग्रामपंचायत सदस्य तानाजी माने, भिमराव होवाळ, ग्रामपंचायत सदस्या अलका सावंत, अंजना बुरंगे, बाळूताई सुतार, निता माने, सारीका होवाळ, तसेच नवे मालखेडच्या पोलिस पाटील स्वाती शिवदास, जूने मालखेडचे पोलिस पाटील दादासाहेब पाटील, ग्रामसेविका ए.एस.पुजारी, मालखेड सेवा सोसायटीचे चेअरमन सुरेश पवार व्हा.चेअरमन मोहन होवाळ,माजी तंटामुक्ती अध्यक्ष जगन्नाथ मस्के, देवदास माने, सदाशिव भोसले, आनंदराव माने,निवास लोकरे,अशोक माने,अशोक होवाळ इत्यादिनी तसेच ग्रामस्थांनी यावेळी पकंज बुरंगे व बाजीराव माने यांचे या निवडीबद्दल अभिनंदन केले. त्यांच्या या निवडीबद्दल परिसरातील अनेक मान्यवरांनी त्याचे अभिनंदन केले.

पकंज बुरंगे म्हणाले, गावा-गावातील तंटे गावातच मिटविण्यासाठी ही समिती तयार करण्यात आली आहे. मालखेड गावात होणाऱ्या प्रत्येक तंट्याचा निपटारा गावात होण्यासाठी प्रयत्नशील राहू. गावात तंटा होवू नये यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.

Leave a Comment