Wednesday, June 7, 2023

दोन्ही कॉंग्रेस आणि सेनाभाजप करपलेली भाकर : प्रकाश आंबेडकर

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी काय , शिवसेना -भाजप युती  काय या दोन्ही आघाड्या भाकरीच्या दोन वेगवेगळ्या बाजू आहेत. त्या एवढ्या करपलेल्या आहेत की त्या तव्यावर पुन्हा टाकल्या की वासही येत नाही त्यामुळे त्या आता फेकून देण्या लायक झाल्या आहेत अशी टीका बहुजन वंचित आघाडीचे नेते  प्रकाश आंबेडकर यांनी केली कराड येथे सातारा लोकसभा मतदार संघातील बहुजन वंचित  आघाडीचे उमेदवार सहदेव ऐवळे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते

पाणी गढूल झाले की ते पिता येत  नाही म्हणून फेकून देतो आणि ते भांडे पुन्हा धुतो व त्यात पुन्हा नवीन पाणी ओततो त्याच साठी 2019 च्या निवडणूकीत सहदेव ऐवळेच्या निमित्ताने नवीन पाणी ओतण्याची वेळ आली आहे असं आंबेडकर म्हणाले आहेत.

सोलापूर येथील मतदान पार पडल्या नंतर प्रकाश आंबेडकर यांनी राज्यभर उमेदवारांच्या प्रचाराचा धडाका लावला आहे. या प्रचाराच्या दरम्यान त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप, नरेंद्र मोदी यांच्या सह कॉंग्रेस आघाडीवर देखील कडाडून टीका केली आहे.