Pakistan Air Strike : पाकिस्तानात एअर स्ट्राईक!! तब्बल 8 बॉम्ब टाकले, 30 जणांचा मृत्यू

Pakistan Air Strike
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Pakistan Air Strike । भारताचा कट्टर दुश्मन असलेल्या पाकिस्तान मधून एक खळबळजनक माहिती समोर येत आहे. पाकिस्तानी हवाई दलाने आपल्याच देशाच्या नागरिकांवर एअर स्ट्राईक केला आहे. आज मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास हा एअर स्ट्राईक करण्यात आला. खैबर पख्तूनख्वा या भागात हे बॉम्ब टाकण्यात आले. या एअर स्ट्राईक मध्ये तब्बल ३० नागरिकांना जीव गमवावा लागला तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महिला आणि मुलांची संख्या जास्त आहे. संपूर्ण परिसराला राखेचं स्वरूप आलं आहे. पाकिस्तानी हवाई दलाने आपल्याच देशातील नागरिकांवर एअर स्ट्राईक केल्याने संपूर्ण पाकिस्तानात खळबळ उडाली आहे.

झोपेत असलेली लोक गाडली गेली- Pakistan Air Strike

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, खैबर जिल्ह्यातील तिरह भागात पाकिस्तानी लष्कराने नागरिकांच्या घरांना लक्ष्य केले आणि JF-17 लढाऊ विमानांमधून एकामागून एक आठ LS-6 बॉम्ब टाकले. बॉम्बस्फोटात गावाचा बराचसा भाग उद्ध्वस्त झाला. परिसरात मोठा गोंधळ उडाला. अनेक घरांचे नुकसान झालं आणि गाढ झोपेत असलेली लोक गाडली गेली. सर्वत्र फक्त ढिगारा उरला. गावातील रस्ते उद्ध्वस्त झाली. हल्ल्याच्या सुमारे १० तासांनंतरही स्थानिक आणि बचाव पथके सोमवारी दुपारी ढिगाऱ्याखाली मृतदेह शोधत आहेत . जखमींना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले असून मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो.

पाकिस्तान सरकारने अद्याप त्यांच्याच देशातील हवाई हल्ल्याबद्दल (Pakistan Air Strike) अधिकृत निवेदन जारी केलेले नसले तरी, ही घटना तथाकथित दहशतवादविरोधी कारवायांच्या नावाखाली या प्रदेशात पाकिस्तानी लष्कराच्या क्रूरतेचे आणखी एक उदाहरण आहे. तस बघितलं तर खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तान हे दोन असे पाकिस्तानी प्रांत आहेत जिथे पाकिस्तान सरकार आणि लष्कराविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे. या प्रांतांमधील अनेक सशस्त्र गट पाकिस्तानी लष्करालाही लक्ष्य करत आहेत. हे गट प्रांतासाठी अधिक अधिकार आणि संसाधनांमध्ये प्रवेशाची मागणी करत आहेत. तर दुसरीकडे, पाकिस्तान सरकार आणि लष्कर या बंडखोर गटांना दहशतवादी म्हणून संबोधतात.