Pakistan Blasts : पाकिस्तानात 12 बॉम्बस्फोट!! लाहोर, कराची हादरलं

Pakistan Blasts
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताच्या एअर स्ट्राईक नंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का बसला आहे. पाकिस्तान मधील १२ मोठ्या शहरात बॉम्बस्फोट (Pakistan Blasts) झाल्याची माहिती समोर येत आहे. लाहोर, कराची, रावलपिंडी सारख्या शहरात हे बॉम्बस्फोट झालेत. या स्फोटाची जबाबदारी अजून तरी कोणी घेतलेली नाही. स्फोटानंतर संपूर्ण परिसर सील करण्यात आले आहेत. या हल्ल्यात किती नागरिकांचा मृत्यू झालाय याचीही माहिती अजून समोर आलेली नाही. परंतु पाकिस्तान मध्ये अंतर्गत मोठं काहीतरी घडतंय अशी शंका तयार झालीय.

कोणकोणत्या ठिकाणी झालेत बॉम्बस्फोट? Pakistan Blasts

पाकिस्तानच्या कराची, गुंजरावाला, लाहोर, चकवाल आणि घोटकी येथे ड्रोन अटॅक झालाय. रावळपिंडीत लष्करी मुख्यालयात देखील मोठा बॉम्बस्फोट झाला आहे. यानंतर लाहोरमधील नौदलाच्या तळाजवळ बाॅम्ब स्फोट झाला आहे. त्यानंतर पाकिस्तानची आर्थिक राजधानी मानली जाणाऱ्या कराची मध्येही ड्रोनव्दारे स्फोट झाला आहे. कराचीमध्येच पाकिस्तानच अणवस्त्र बॉम्ब स्टोर आहे. त्यामुळे या ड्रोन ब्लास्टमुळे (Pakistan Blasts) परिसरात भीतीचे वातावरण पसरलं आहे. तसेच पाकिस्तानच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

दरम्यान, या साखळी बॉम्बस्फोटानंतर पाकिस्तानने भारतावर आरोप केला आहे. हे सर्व बॉम्बस्फोट भारतानेच घडवून आणल्याचं पाकिस्तान आयएसपीआरचे महासंचालक ले.जन.अहमद शरीफ यांनी म्हंटल आहे. भारताने पाकिस्तानमधील 9 शहरांत ड्रोन हल्ले केले आहे. लाहोर, रावळपिंडी,कराची या शहारांत भारताकडून ड्रोन हल्ले करण्यात आले आहे. लाहोरमधल्या लष्करी तळावर भारतानं हल्ला केल्याचा पाकिस्तानने दावा केलाय. गुजरानवाला आणि अटक शहरांवरही भारताकडून ड्रोन हल्ले झाल्याचा दावा ले.जन.अहमद शरीफ यांनी केला आहे. तसेच आम्ही भारताचे 12 ड्रोन पाडल्याचा दावाही पाकिस्तानने केला आहे.