पाकिस्तानमध्ये रमजानच्या पहिल्या दिवशीच लोकांच्या बेजबाबदार वागणुकीने सरकारच्या चिंतेत भर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रमजान महिन्यातील कोरोनाव्हायरसच्या साथीमध्ये लोकांच्या वृत्तीमुळे पाकिस्तानी राज्यकर्त्यांच्या कपाळावर चिंता पसरली आहे. इम्रान सरकारने अनेक मार्गांनी लॉकडाऊन शिथिल केले आणि तरीही इतर लोकांनी नियमांचे उल्लंघन करणे थांबवले नाही,याचा परिणाम असा झाला की, देशात रमजान महिन्याच्या पहिल्याच दिवशी शनिवारी मशिदी आणि रस्त्यावर लोकांची गर्दी झाली आणि सोशल डिस्टंसिंगचा बोजवारा उडाला.

हे लक्षात घेता सरकारने लोकांना तातडीने चेतावणी दिली की जर ही प्रवृत्ती असेल तर रमजानमध्येच कोरोना विषाणूचा झपाट्याने प्रसार होईल आणि नंतर देशातील आरोग्य संघटना रुग्णांच्या गर्दीला हाताळू शकणार नाही.पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे आरोग्य खात्याचे सल्लागार डॉ. जफर मिर्झा यांनी पत्रकार परिषदेत हा इशारा दिला. ते म्हणाले, “रमजानच्या पहिल्या दिवशी लोकांनी जे काही केले ते निराशाजनक होते.लोकांनी अत्यंत बेजबाबदार वृत्ती दर्शविली. मी लोकांना गर्दीत भाग न घेण्याचे आवाहन करीत आहे,त्यांनी घरातच नमाज पढा.”

Imran Khan Mock PM Narendra Modi Now Become Victim of Corona Virus ...

मिर्झा म्हणाले, “संध्याकाळी दरवर्षी दुकानांमध्ये इफ्तारची गर्दी असते. शनिवारी संध्याकाळीही परिस्थिती दरवर्षी सारखीच दिसली. लोकांनी आपणहून हे समजून घेण्याची गरज आहे की आपण सुरक्षा उपायांचे पालन न केल्यास परिस्थिती आणखीनच बिकट होईल.पाकिस्तान यावेळी एका अत्यंत गंभीर अवस्थेतून जात आहे ज्यामध्ये या रोगाचा प्रसार झपाट्याने होऊ शकतो. लोकांना माझी विनंती आहे की तुमची इफ्तार, सहरी आणि मशिदीला भेट देण्याची तुमची दिनचर्या बदला. कृपया गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका. “

पाकिस्तानमध्ये कोरोनावर उपचार करण्यासाठी लस सुरू असल्याची अटकळही मिर्झा यांनी फेटाळून लावली. ते म्हणाले, “पाकिस्तान ही लस तयार करत नाही. परंतु, एका चिनी कंपनीने आम्हाला या लसीच्या चाचणीत भाग घेण्यास सांगितले आहे. आम्ही कंपनीकडून या संदर्भात कागदपत्रे मागितली आहेत. यास वेळ लागेल.”

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment