Wednesday, June 7, 2023

विराटच्या जागी मी असतो तर लग्नच केलं नसत; शोएब अख्तरचे वादग्रस्त वक्तव्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली हा गेल्या काही दिवसांपासून आपल्या सर्वोत्तम फॉर्मात नाही. त्याच्या बॅट मधून हव्या तशा धावा निघत नाही. यावरून पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब आखतर ने विराट कोहली वर वादग्रस्त वक्तव्य केले आहे. विराट कोहलीने खूप लवकर लग्न केलंय. ज्याचा परिणाम त्याच्या खेळावर होत आहे असे विधान त्याने केलं.

शोएब म्हणाला, जर तो विराटच्या जागी असता तर त्याने कधीच लग्न केले नसते. लग्न केल्यानंतर तुमच्यावर आणखी जबाबदारी येते. शोएबच्या मते  क्रिकेट करिअर संपल्यानंतर लग्न करणे योग्य असते. शोएब म्हणाला, मी जर त्याच्या जागी असतो तर लग्न केले नसते.

विराट कोहलीने 120 शतके मारल्यानंतर लग्न करायला हवं होतं. जर मी भारतासारख्या देशात असतो आणि मोठा स्टार असतो तर मी माझ्या खेळावरच फोकस केला असता. आणि 400 विकेट्स घेतल्या असत्या. मी माझ्या जबाबदाऱ्या कधीच वाढवल्या नसत्या. हा माझा वैयक्तिक निर्णय असता”, असंही शोएब अख्तरनं म्हटलंय.