पाकिस्तानकडून दोन्ही देशांमधील टपाल सेवा बंद; इतिहासात पहिल्यांदाच सेवा खंडित

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विशेष प्रतिनिधी । जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर पाकिस्तानकडून सातत्यानं कुरापती केल्या जात असून, आता दोन्ही देशांमधील महत्त्वाची सेवा बंद करण्याचं टोकाचं पाऊल पाकिस्ताननं उचललं आहे. गेल्या दीड महिन्यांपासून पाकिस्तानकडून दोन्ही देशातील टपाल सेवा बंद करण्यात आली असून, दोन्ही देशांच्या इतिहासात पहिल्यांदाच ही सेवा खंडित झाली आहे.

भारत-पाकिस्तान फाळणी झाली. त्यानंतर दोन्ही देशात तीन वेळा युद्ध झालं. त्यानंतरही दोन्ही देशात कायम तणाव कायम राहिला. पण, दोन्ही देशातील नागरिकांच्या संवादातील महत्त्वाचा दुवा असलेली टपाल सेवा अखंडित सुरू होती. ५ ऑगस्ट २०१९ रोजी केंद्र सरकारने जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारं कलम ३७० रद्द करण्याबरोबर राज्याचं विभाजन करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला विरोध करत पाकिस्ताननं भारताविरुद्ध कुरापती करण्यास सुरूवात केली. हा निर्णय घेतल्यापासून पाकिस्तानकडून सातत्यानं जागतिक स्तरावर आवाज उठवण्याबरोबरच सीमेवर तणाव निर्माण प्रयत्न केले जात आहे. गेल्या महिन्यात पाकिस्ताननं राजनैतिक संबंध तोडण्याचा निर्णयही घेतला होता.

आंतरराष्ट्रीय टपाल सेवेसाठी देशभरात २८ परदेशी पोस्ट ऑफिस कार्यरत आहेत. पाकिस्तानला पाठवल्या जाणाऱ्या आणि येणाऱ्या टपालाचं काम फक्त दिल्ली व मुंबई कार्यालयातून चालतं. तर राजस्थान, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरयाणा, पंजाब आणि हिमाचल प्रदेशमधील आंतरराष्ट्रीय पत्रव्यवहाराचं काम मध्य दिल्लीतील कोटला मार्गवरील नोडल संस्थेकडून केले जाते.

Leave a Comment