बलुचिस्तानमध्ये एका धक्कादायक घटनेत बलुच लिबरेशन आर्मी (BLA) ने जाफर एक्सप्रेस या प्रवासी ट्रेनला हायजॅक केले आहे. ही ट्रेन क्वेटाहून पेशावरकडे जात असताना बोलान जिल्ह्यातील माशकाफ जवळ ही घटना घडली. ट्रेनमध्ये सुमारे ५०० प्रवासी होते, ज्यात महिला आणि लहान मुलांचाही समावेश होता. हल्लेखोरांनी ट्रेनवर जोरदार गोळीबार केला, ज्यामुळे ट्रेनचा चालक जखमी झाला आणि ट्रेन थांबली. सुरक्षाकर्म्यांनीही प्रत्युत्तर दिले, मात्र आता या घटनेचा एक थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
स्फोटाचा थरारक व्हिडिओ व्हायरल
व्हायरल व्हिडिओमध्ये ट्रेन पुढे जात असताना अचानक मोठा स्फोट होतो आणि संपूर्ण परिसर धुरामध्ये हरवून जातो. या हल्ल्याद्वारे BLA ने ट्रेन थांबवून प्रवाशांमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. बलुचिस्तानमध्ये यापूर्वीही ट्रेन्स आणि सुरक्षादलांवर अनेकदा हल्ले झाले आहेत. या घटनेमुळे पाकिस्तानच्या सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
बलूचिस्तान लिबरेशन आर्मी ने पाकिस्तान में जाफर एक्सप्रेस को हाईजैक कर लिया है. ट्रेन में करीब 500 यात्री सवार थे. इन यात्रियों में ISI अधिकारी भी शामिल हैं. ट्रेन पर अटैक का वीडियो अब सामने आया है. #pakistantrainhijack#bla pic.twitter.com/FFGak6Nycq
— Rohan Sharma 🇮🇳 (@Rohan167_) March 11, 2025
पाकिस्तानवर टीका, प्रवाशांची चिंता
स्फोटाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी पाकिस्तानवर टीका करत या देशाचा दहशतवादाशी असलेला संबंध अधोरेखित केला आहे. एका यूजरने लिहिले, “हेच पाकिस्तानसाठी सामान्य आहे!” तर काही जण ट्रेनमध्ये अडकलेल्या प्रवाशांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करत आहेत. या घटनेने पाकिस्तानमध्ये वाढत्या अशांततेची झलक पुन्हा एकदा समोर आली आहे.