Wednesday, February 8, 2023

काश्मीरमध्ये घुसखोरीचा जुना मार्ग पुन्हा सक्रिय करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न, 15 वर्षांनंतर हातलंगामध्ये घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या 3 दहशतवादद्यांना लष्कराने केले ठार

- Advertisement -

नवी दिल्ली । काश्मीरमध्ये पाकिस्तानमधून घुसखोरी करणाऱ्या 3 दहशतवाद्यांना लष्कराने ठार केले. ही घटना रामपूर सेक्टरच्या रुस्तम बटालियन भागातील हथलंगा जंगलाजवळ घडली. या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. नियंत्रण रेषेवर या प्रकारचे ऑपरेशन सामान्य असले तरी या दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हा लष्करामध्ये चिंतेचा विषय आहे कारण रुस्तम बटालियनच्या हातलंगा भागात घुसखोरीच्या प्रयत्नाची घटना सुमारे 15 वर्षांनंतर समोर आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नियंत्रण रेषेवर 2005 मध्ये कुंपण घातल्यापासून या भागात दहशतवादी घुसखोरीचे प्रमाण नगण्य आहेत. या भागात उपस्थित असलेल्या भारतीय लष्कराच्या चौकीतून दहशतवाद्यांच्या प्रत्येक हालचालीवर सहज नजर ठेवता येते.

- Advertisement -

आता प्रश्न असा उदभवला आहे की, या दहशतवाद्यांनी जवळपास दीड दशकानंतर घुसखोरीसाठी ही जागा का निवडली? तज्ज्ञांच्या मते, जी लोकं पाकिस्तानात दहशतवादी घुसखोरी करतात त्यांना असे वाटते की, ज्या ठिकाणी अशा प्रकारची घटना फार काळ घडली नाही तेथे भारत अलर्ट नसेल.

जुने घुसखोरी मार्ग पुन्हा सक्रिय करण्यासाठी पाकिस्तान स्थानिक लोकं आणि पीओकेच्या मार्गदर्शकांसोबत वारंवार बैठका घेत असल्याचेही गुप्तचर इनपुटने उघड केले आहे. या बैठकांमध्ये जुने मार्ग सक्रिय करण्यासाठी आणि नवीन मार्ग शोधण्यावर भर दिला जात आहे. भारतीय लष्कराला टाळत दहशतवाद्यांना काश्मीरच्या रिसेप्शन एरियामध्ये कसे पोहोचवायचे हा बैठकीं मागचा मुख्य मुद्दा होता.

गेल्या वर्षांतील घुसखोरीचे आकडे
जर आपण गेल्या काही वर्षांची आकडेवारी पाहिली तर 2018 मध्ये नियंत्रण रेषेवर दहशतवादी घुसखोरीचे एकूण 66 प्रयत्न नोंदवले गेले. यामध्ये 328 दहशतवादी घुसखोरीचा प्रयत्न करत होते, 32 जणांना लष्कराने ठार केले. सुमारे 150 दहशतवादी परत पळून गेले आणि 140 च्या आसपास घुसखोरी करण्यात यशस्वी झाले. 2019 मध्येही असेच दिसून आले. लष्कराने घुसखोरीचे एकूण 40 प्रयत्न नोंदवले.

219 दहशतवाद्यांनी आत घुसण्याचा प्रयत्न केला ज्यात लष्कराने 4 ठार केले तर जवळपास 75 पळून गेले आणि 141 दहशतवादी सीमेपलीकडे जाण्यात यशस्वी झाले. कोरोना मुळे पाकिस्तान कडून प्रयत्न होत होते मात्र त्यात पूर्वीसारखी कमतरता नक्कीच होती. एकूण 9 घुसखोरीच्या प्रयत्नांची नोंद झाली. या प्रयत्नांमध्ये सामील असलेले 19 दहशतवादी ठार झाले, तर सुमारे 30 पळून गेले आणि 50 नियंत्रण रेषेच्या वेगवेगळ्या ठिकाणांवरून घाटीत प्रवेश करण्यात यशस्वी झाले.

या वर्षी आतापर्यंत अर्धा डझन घुसखोरीचे प्रयत्न पाहिले गेले, त्यापैकी 4 दहशतवादी नियंत्रण रेषेवरच मारले गेले. गुरुवारी रामपूर सेक्टरच्या रुस्तम बटालियन भागात हातलंगा जंगल ऑपरेशननंतर 15 व्या कोर कमांडर लेफ्टनंट जनरल पांडे यांनी सांगितले की,”दहशतवादी ज्या प्रकारे घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत, ते पाकिस्तानच्या स्थानिक लष्करी कमांडरच्या संगनमतशिवाय शक्य नाही.”

कमांडर म्हणाले,”पाकिस्तानचे हेतू अजूनही साशंक आहेत”
कोर कमांडरने हे स्पष्ट केले आहे की, हे पाक सैन्याचे खरे वास्तव आहे जे जगासमोर स्वच्छ असल्याचे भासवतात. मात्र जी लोकं सीमेपलीकडून घुसखोरी करण्यात यशस्वी झाले त्यांनाही सुरक्षा दलांनी खोऱ्यात वेगवेगळ्या चकमकींमध्ये ठार केले. जर आकडेवारी पाहिली तर 2018 मध्ये 215, 2019 मध्ये 215, 2020 मध्ये 153, 2020 मध्ये 220 आणि या वर्षी 2021 मध्ये 31 ऑगस्टपर्यंत सुरक्षा दलांनी 110 हून अधिक दहशतवाद्यांना ठार केले. तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर अश्या प्रकारच्या घुसखोरीचा धोका आणखी वाढला आहे.