वृत्तसंस्था । जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यातील डेगड सेक्टरमध्ये रविवारी (17 मे) सकाळी पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन केले. लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे ८:४० वाजता पाकिस्तानने डेगवार सेक्टरमधील नियंत्रण रेषेवरील युद्धबंदीचा भंग केल्याची घटना घडली. भारतीय सैन्य पाकिस्तानला प्रत्युत्तर देत आहे.
Pakistan violates ceasefire along Line of Control in Degwar sector in Poonch, Jammu & Kashmir. Indian Army is retaliating.
— ANI (@ANI) May 17, 2020
याआधी ९ मे रोजी सुद्धा पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर युद्धबंदीचे उल्लंघन केले होते. सायंकाळी ७:३० च्या सुमारास, पाकिस्तानी सैन्याने डेगवार सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर गोळीबार सुरू केला होता. भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर पाकिस्तानी सैन्याने माघार घेतली होती.
दरम्यान, ८ मे रोजी, पुंछ जिल्ह्यात पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबाराला उत्तर देताना भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले. भारतीय सैन्याने केलेल्या गोळीबारात पाकिस्तानी सैन्य दलाचे किमान ३-४ सैनिक ठार झाल्याचे बोलले जात आहे. तसेच पाच इतर जवान जखमी झाल्याचे सांगण्यात आले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.