रोहित शर्मा टॉपचा खेळाडू, त्याच्याशी माझी तुलना होऊ शकत नाही ; ‘या’ युवा पाकिस्तानी खेळाडूची प्रतिक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पाकिस्तान क्रिकेटमध्येही सध्या अनेक युवा क्रिकेटपटू घडत आहेत जे भविष्यात एक दिग्गज खेळाडू म्हणून ओळखले जाऊ शकतात. बाबर आझम, हसन अली, अबिद अली ही त्यामधीलच काही नावं आहेत. त्याच लिस्ट मध्ये आता अजून एक युवा क्रिकेटपटूचा समावेश होतोय तो क्रिकेटपटू म्हणजे आक्रमक फलंदाज हैदर अली….

पाकिस्तानचा युवा फलंदाज हैदर अलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून आपली छाप पाडली. पहिल्याच आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात दमदार अर्धशतक झळकावून त्याने भविष्यातील स्टार खेळाडू म्हणून छाप पाडली. त्याचवेळी, त्याच्या या एका खेळीच्या जोरावर अनेकांनी त्याची तुलना भारताचा ‘हिटमॅन’ रोहित शर्माशी (rohit sharma) केली.

यावर प्रतिक्रिया देताना हैदर अली म्हणाला,” माझी तुलना रोहितसोबत करणे योग्य नाही. रोहित टॉपचा फलंदाज आहे. त्यामुळे त्याच्याशी झालेली माझी तुलना मला बरोबर वाटत नाही. आमच्यामध्ये कोणतीच तुलनाच होऊ शकत नाही. त्याने याआधीच खूप काही यश मिळवले आहे.’हैदर पुढे म्हणाला की, ‘मी अनेक महान फलंदाजांचे व्हिडिओ पाहून शिकलोय. रोहित शर्माच्या फलंदाजीचे व्हिडिओ पाहूनही खूप शिकलो. त्याच्या फलंदाजीतून टीप्सही घेतल्या आहेत.’

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

 

Leave a Comment